भारतीय संस्कृतीचे मूळ हे अशा काही मोजक्या तत्त्वांत आहे असे मी समजतो, व त्यावरून आपली नैसर्गिक जीवनशैली ओघाने येतेच. इतका सहजपणा आणि विवेक मी अन्य कुठेही बघितला नाहिये. पण निसर्गाबरोबर एवढ्या समरसतेने राहूनही १५०० वर्षांपूर्वीचा आर्यभटाचे गणित आता आधुनिक समजल्या जाणार्या गणिताच्या तोडीचं निघालं, आणि कणादांनी २००० वर्षांपूर्वी अणूंची कल्पना मांडली. आयुर्वेद, हठयोग व अन्य स्वास्थ्यविषयक शास्त्रांचा प्रभावीपणा तर आपल्या सर्वांना माहितच आहे.
श्री० अतुल तुळशीबागवाले यांनी लिहिलेला हा विचारप्रवर्तक लेख वाचकांना स्वभाषा व स्वसंस्कृतीची उपयुक्तता व त्यांच्याबद्दलचा अभिमान यांचे काही नवीनच पैलू उलगडून दाखवतो. जगभर मुशाफिरी करीत असताना सतत डोळे व मन जागृत ठेवून जगभरातील मानवाच्या जीवनात त्याच्या भाषेचे व संस्कृतीचे स्थान यांचा अभ्यास व चिंतन करून सुचलेले काही नवीनच मुद्दे लेखकाने या लेखात आपल्यासमोर मांडले आहेत.
संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन- च्यायला आपल्या भाषेत असं ठेवलंय तरी काय_311209
.
आपली मते आपण लेखाखालील रकान्यात मांडू शकता.
– अमृतयात्री गट
.
kharach tumhi mhatalyapramane marathi saregama madhye kinwa maharashtracha superstar ya karykramat dekhil parikashakanna marathi sodun hindi kinwa englishcha adhar ghyawa lagto. solid, chabuk, kya baat hai ase shabd waranwar aiku yetat. English madhye bolayacha prayatn agdi kewilwana watato. sachin pilgaonkar, mahesh manjrekar, supriya pilgaonkar ugichch engrajimadhye bolayacha prayatn kartat. mazi sarwa parikashnna winnati ahe ki aple mat marathitunach vyakt karawe. karan he karyakram abalvruddhanpasun sarwajan pahat asatat. tumhi kay bolata he sarwanach agdi kalat nahi. aso.
baki lekh chhan jamun ala ahe. marathicha agrah dharalach pahije. kuni nawe thewali tari chalel karan tyashiway bhasha tiknar nahi ase mala watate. mala ha lekh marathitun type karayacha hota pan font downloading jamla nahi. pudchya weli matra nakki marathitunach pratikriya dein. dhanyawad.
प्रिय श्री० परेश काशीद यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्य़ा भावना पूर्णतः पटतात. पण सारेगमप (हिंदीप्रमाणे सारेगामापा नव्हे) व त्यासारख्या इतर दूरदर्शन कार्यक्रम करणार्यांना जनतेला तशीच भाषा आवडते असे वाटत असावे. त्यांचा गोड, सोयीस्कर गैरसमज दूर करण्यासाठी आपण सर्वांनी अशा विविध कार्यक्रमांबद्दल एकावरएक स्पष्टपणे निषेधपर पत्रे, ई-मेल लिहिले पाहिजेत. आमच्या काही मित्रांनी तसे सुरू केलेले आहे. आपण सर्वांनीही तसे करावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
CHHAN LEKH
प्रिय श्री० परेश काशीद यांसी,
सप्रेम नमस्कार.
होय. अत्यंत विचारपूर्वक लिहिलेला हा लेख नक्कीच गंभीरपणे चिंतन करण्यासारखा आहे.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Please go ahead. It will take quite a time to imbibe importance of Marathi as mother toungue.
Regards.
Dr [ Engr] Neelknath Patwardhan [ 76+]
प्रिय डॉ० नीलकंठ पटवर्धन यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या शुभेच्छांबद्दल अत्यंत आभारी आहोत.
आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्य मिळालेल्याच्या लागलीच नंतरच्या काळातील परिस्थिती प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्यावेळी मातृभूमीबद्दलच्या प्रेमाचेच मातृभाषेबद्दलचे प्रेम, मातृसंस्कृतीबद्दलचे प्रेम असे विविध अविष्कार दिसून येत होते. स्वातंत्र्योत्तर सुमारे पाव शतकाच्या काळातही ह्या भावना बर्यापैकी टिकून होत्या. पण पुढे त्या भावनांचा लोप व्हायला लागला व स्वतंत्र भारत देशात वरवरून स्वातंत्र्य व मनातून भावनिक न्यूनगंड व गुलामगिरी ह्या भावना वाढीस लागल्या. भारतीय संस्कृती, भारतीय भाषा ह्यांच्याबद्दल न्यूनगंड निर्माण झाला. आणि हे गुण काही कारणाने महाराष्ट्रात अधिकच प्रकर्षाने दिसून येऊ लागले. ज्यांना आपण हसत होतो अशा काही भारतीय संकल्पनांच्या महत्तेची ओळख आपल्याला पाश्चात्यांनीच करून द्यावी लागली. आयुर्वेद, योग (योगा?) व तदनुषंगिक सर्वच अष्टांगयोगाधारित तत्त्वज्ञान, शाकाहार, वैदिक गणित असे अनेक विषय सांगता येतील. अर्थात त्या सर्वांमध्ये शिरोमणी म्हणजे संस्कृत भाषा. तिचे व्याकरण, उच्चार, शिस्तबद्धता तसेच लवचिकता, वर्णमाला व लिपी (तुलनेने अर्वाचीन), तीमधील समास-संधी-उपसर्ग-नामधातु व इतर उत्तमोत्तम वैशिष्ट्ये जाणून घेतली की पाश्चात्यांनाच स्वतःच्या भाषांचा न्यूनगंड वाटू लागतो. आणि अशी महान संस्कृत भाषा ज्यांची आई आहे अशी आपली मायबोली मराठी व आपल्या इतर सर्वच मावश्या म्हणजे भारतीय भाषा ह्यासुद्धा श्रेष्ठ नाहीत असे आपण कसे म्हणू?
अर्थात बर्याच वेळा स्वतःकडे असलेल्या संपत्तीबद्दलचे अज्ञान आपल्याला स्वतःबद्दल निरभिमान निर्माण करतो, तसाच हा प्रकार झाला आहे. त्यातील सत्य समजल्यावर तरी भारतीय माणूस व विशेषतः मराठी माणूस सुधारतो का ते पाहू. अर्थात आपले कार्य मुख्यतः मराठी माणसाच्या पातळीवर आहे. इतरांना आपापल्या भाषा व संस्कृतीसाठी काम करूदे. ह्यात आपणा सर्वांना यश आले तर आपण सर्व मिळून भारत देशाची प्रगती घडवू शकू.
असो. आपल्यासारख्या अनुभवी, ज्ञानवृद्ध व्यक्तींची मते वेळोवेळी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
This article covers vast canvass. I feel if we realy want to propagate Marathi we should be in the business, occupy the high posts in the government as well as in private sector. Then we can proudly speak Marathi. Since we are lacking in these fields we are nowhere in the reckoning.Another important point is as soon as Marathis have some money, fame or position they become cosmopolitan. Sachin Tendulkar is a glaring example. I do not think Saurav Ganguli would have uttered what Tendulkar said.
Shrikant Pundlik
प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिमताबद्दल (feedabck) अत्यंत आभारी आहोत. आपण म्हणता:
१. {{I feel if we realy want to propagate Marathi we should be in the business, occupy the high posts in the government as well as in private sector. Then we can proudly speak Marathi. Since we are lacking in these fields we are nowhere in the reckoning.}}
भाषा ही propogate करणे म्हणजे काय हे नक्की समजले नाही. आपण आपल्या आईला propogate करावी लागते का? आपणापैकी प्रत्येकाला तिच्याबद्दल नैसर्गिक, निस्सीम प्रेम असले, अभिमान असला, तो आपण मुक्तपणे, कुठल्याही दडपणाशिवाय व्यक्त केला, आणि जिथे जिथे शक्य तिथे व तेव्हा तिच्या संपन्न करण्याचा प्रयत्न केला की तेवढे पुरे झाले. प्रत्येक माणूस श्रीमंत किंवा गरीब, धंदेवाईक-नोकरदार-व्यावसायिक-बेकार, पुरुष-स्त्री, तरूण-प्रौढ, प्रत्येकालाच अशी भावना असू शकते, किंबहुना असायलाच पाहिजे. त्यासाठी धंदेवाईक असणे, उच्चपदस्थ असणे ही अत्यावश्यक अट असूच शकत नाही. धंदेवाईक, श्रीमंत असणे एवढे पुरेसे असते तर मारवाडी, गुजराथी, सिंधी या भाषा सर्वाधिक संपन्न असत्या. पण वस्तुस्थिती त्याउलटच आहे. बंगाली, कानडी, तेलुगू, तमिळ, मलयाळम ही मंडळी धंद्यात अग्रेसर नाहीत. हल्ली सर्वच राज्यात शासकीय नोकर्यात हिंदी लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे. पण म्हणून ती भाषा या भाषांच्यापेक्षा अधिक संपन्न मानली जात नाही. स्वभाषा, स्वसंस्कृती या मुद्द्यांवर प्रचंड स्वाभिमान व त्यांचा अपमान झालेला दिसताच पेटून उठणे, आपली भाषा आणि आपली संस्कृती यांना कुठल्याही परिस्थितीत अंतर न देणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
२. {{Another important point is as soon as Marathis have some money, fame or position they become cosmopolitan. Sachin Tendulkar is a glaring example. I do not think Saurav Ganguli would have uttered what Tendulkar said.}}
आपली वरील वाक्ये आपल्या आधीच्या विधानाच्या विरुद्ध आहेत व त्याखालील स्पष्टीकरणाची पुष्टीच करतात असे आपल्याला वाटत नाही का?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
लेख छानच. आपण आपल्या संस्कृतीच्या बाबतीत बचावात्मक असण्याचे कारणही नाही. व तसे असून चालणारही नाही.आधुनिक जीवनातही उपयोगी असे आपल्या संस्कृतीत असेल नव्हे, आहेच. आधुनिक काळाशी सुसंगत अशी त्याची मांडणीही लो. टिळक, विवेकानंदांपासून दीनदयाळ उपाध्यायांपर्यंत अनेकांनी केलीही आहे. मात्र हे तत्वज्ञान न राहता जेव्हा आपण मनात कोणताही किंतु मनात न बाळगता आचरणात आणू तेंव्हाच आपली कमीपणाची भावना नष्ट होईल. धन्यवाद.
प्रिय श्री०उपेंद्र जोशी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या सारखाच स्वाभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा. आपण मॅक्स मुल्लर यांचे “India: What it can teach us” हे पुस्तक वाचले आहे काय? त्यातील इंग्रजी पाठ्य व मराठी भाषांतर ’वरदा प्रकाशनाने’ प्रकाशित केले आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
लेख वेगळा आहे. बातमे कुछ दम है. र् य हा -य असा लिहिता येतो.
प्रिय श्री० गिरिधर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
लेखामध्ये र्य असेच लिहिले होते. वर्ड धारिणीची खिडकी (window) लहान होऊन पुन्हा मोठी झाली की कधीकधी र्य चा आपोआपच र्य होतो. काहीतरी सॉफ्टवेयरचा दोष (कीडा? bug?) असावा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
परेश जी आपण म्हणता ते खरं आहे.मराठी बोलण्याचा प्रयत्न करणा-या इत्तरभाषकाना आपण प्रोत्साहन देउया ,त्यांचे बोलणे जरी मोडके तोडके असले तरी त्याना न हसता मराठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.जे मराठी भाषक धेड्गुअजरी मराठी बोलत असतील त्याना प्रेमाने,जिव्हाळ्याने विनवूया म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्या अपेक्षेनुसार बदल घडून येइल.त्यांचा रागराग करून किंवा द्वेष करून हा प्रश्न आपल्या अपेक्शेनुसार सुट्णार नाही.
प्रिय श्री० सावधान यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले प्रतिमत योग्यच आहे. ज्यांना मराठी नीट येत नाही पण शिकायची इच्छा आहे अशांना आपण मदत करायलाच पाहिजे.
आम्ही तर त्यापुढे जाऊन असेही म्हणू इच्छितो की आनि-पानी हे अशुद्ध मराठी नव्हेच. ती महाराष्ट्राच्या काही भागात बोलली जाणारी एक बोली म्हणावी लागेल. मात्र आवश्यक आणि अपरिहार्य नसतानाही परभाषिक शब्द वापरणे हे अयोग्य. “माझी डॉटर मराठी वर्ड्स लर्न करायला डिफिकल्ट फाईण्ड करते” हे भयंकर मराठी पूर्णतः चुकीचे. श्री० परेशरावांना अशा धेडगुजर्या मराठीची चीड आहे. अगदी साधे, सामान्य विचार व्यक्त करण्यासही मराठीमध्ये शब्द नाहीत, इतकी आपली भाषा कुचकामी आहे, असे या उच्चभ्रू महाभागांना वाटते काय? दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांसाठी ही मंडळी पैसे घेतात. मग त्यासाठी त्यांनी योग्य तयारी करावी. इंग्रजी कार्यक्रमात (जर यांना संधी मिळालीच तर) हीच मंडळी इतके अशुद्ध इंग्रजी बोलतील काय? मग मराठीला आणि मराठी प्रेक्षकांनाच का गृहित धरले जाते. या प्रश्नाचे उत्तर “कारण आपण आपल्या भाषेची अवहेलना चालवून घेतो म्हणून” असेच नाही काय?
ज्यांना खरोखरीच मराठी भाषा येत नाही अशा परभाषकांना आपण जरूर मदत करू. पण खोटाच आव आणून मराठीचे अज्ञान केवळ फॅशन म्हणून दाखवणार्या या मंडळींवर टीका व्हायला पाहिजे. हीच मंडळी काही गंभीर कार्यक्रमात (उदा० २६/११च्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात) अचानक शुद्ध मराठी कसे बोलू शकतात? त्यांच्याबद्दल त्या वाहिन्यांवरही टीका व्हायला पाहिजे. आपण करतो ती फॅशन जनतेला आवडते व आपण तसेच करायला पाहिजे अशा गैरसमजात त्यांनी राहू नये.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
अतुल तुळशीबागवालेंचा
प्रिय श्री० गिरिधर पाटील यांसी,
सप्रेम नमस्कार.
पत्र चुकून अर्धवटच राहिलेले दिसते. पूर्ण करावे. वाट पाहतो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
सर्वांना टिपणांबद्दल धन्यवाद! अमृतमंथन गटालापण हा लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!
अतुल
माननीय लेखकराव,
सप्रेम नमस्कार.
आपल्या टिपणाबद्दल अत्यंत आभारी आहोत.
आपल्या विविध वाचकमित्रांनी नोंदलेल्या प्रतिमतांवर आपणच स्वतः भाष्य केलंत, आपल्या लेखामागची भूमिका स्पषट केलीत तर अधिक चांगले. चांगल्या अर्थाने मला आपली जुनी म्हण वापरावीशी वाटते की – सोनारानेच कान टोचलेले बरे, (ते लोहाराचे काम नव्हे).
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
श्री. तुळशीबागवाले साहेब यांचा लेख फारच छान आहे!
“भारतीय संकृतीचे मूळ हे ा काह मोजया तवांत आहे असे मी समजतो, व यावन आपली नैसिगक जीवनशैली ओघाने…”ही मोजकी तत्वे कोणती हे कृपया कळेल का, श्री. तुळशीबागवाले साहेब?
प्रिय श्री० आर्य यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले कौतुक स्वीकारायला व आपल्या शंकांना उत्तर द्यायला आम्ही श्री० अतुल तुळशीबागवाले यांना विनंती करतो.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
आर्य,
मी ह्या तत्वांबद्दल एक वेगळा लेख लिहायच्या विचारात आहे, पण सर्वसाधारणत: गीतेच्या दुसऱ्या व तिसऱ्या अध्यायातल्या कर्मयोग विषयक श्लोक (ज्याचे दुर्दैवाने अनेक विपरीत अर्थ काढले गेले आहेत) हे मूळ तत्वद्न्यान, व योगसूत्र (पतंजलि), न्यायशास्त्र (गौतम), अशा काही लहानश्या पुस्तकांत दर्शविलेली तत्वे मला अभिप्रेत आहेत. ह्या तत्वांचा पुढे विकास होऊन शैव पंथ, नाथपंथाद्वारे आज आपण जी ‘पारंपारीक जीवन पद्धती’ मानतो ती घडली असण्याची दाट शक्यता आहे. ह्या सर्वांना समांतर चालत आलेल्या अदभूत पुराणकथा, व फलप्राप्तिसाठी कर्मकांडात अडकवणारे अनेक ग्रंथ ह्यातून अंधश्रद्धा व कर्मठपणा आला असण्याची शक्यता आहे असे मी मानतो. ह्या सर्वांचा श्लेश करून एक सहज, वैचारीक, विवेकी संस्कृतीचा साचा तयार करण्याची गरज मला दिसते की ज्याने आपली पाळेमुळे पुन्हा रुजू शकतील व भाकड अंधश्रद्धेपासून आपली सुटका होईल.
अतुल
प्रिय श्री० अतुल तुळशीबागवाले यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण स्वतः उत्तर दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहोत.
उत्तर अत्यंत योग्य व महत्त्वाचे आहे. लेखकाने स्वतःच, स्वतःच्या लेखामागची भूमिका, पार्श्वभूमी स्पष्ट करणे हे कधीही सर्वयोग्य ठरते.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
mast lekh. jastit jast marathi bandhawapryant pohochwinyacha prayatn karin.
प्रिय श्री० शरद यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण केलेले कौतुक मूळ लेखकापर्यंत पोचवूच. आभारी आहोत.
असे लेख अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत पोचवण्याच्या उद्देशानेच इथे प्रकाशित केला. आपणही शक्य तेवढा हातभार लावलात तर उत्तमच होईल. अशी प्रसारशृंखलाच निर्माण व्हायला पाहिजे. मराठी+एकजुटीचा हासुद्धा एक भाग असू शकतो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Majha reply delete karnyas karan?
प्रिय श्री० कपिल यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले पत्र वगळले आहे, काढून टाकले आहे असे कसे शक्य आहे? आपल्यासारख्या मराठीप्रेमी मित्रांनी मिळूनच मराठीची चळवळ चालवायची आहे. आपणा सर्वांचे ध्येय एकच आहे.
पत्र गैरसमज निर्माण करणारे, मराठी+एकजुटीत फूट पाडणारे, किंवा इतर कुठल्याही प्रकारे अयोग्य असले तरच आपण ते कदाचित प्रकाशित न करण्याचा विचार करू. आपल्या पत्राच्या बाबतीत ते कसे शक्य आहे?
आपले पत्र परवाच प्रकाशित केलेले आहे व त्याखाली उत्तरही दिलेले आहे. आपल्या नजरेतून चुकले की काय? पुन्हा तपासून पहावे. आणि गैरसमज तर मुळीच करून घेऊ नये.
बर्याच वेळा पत्रोत्तरास विलंब होतो. त्याबद्दल कृपया राग मानू नये.
आपल्याला लिहिलेल्या उत्तरात आमचे म्हणणे एवढेच होते की तमिळ, बंगाली व इतर राज्ये भाषाभिमानाचा कितीतरी अतिरेक करतात पण त्यांना कोणीही संकुचित, देशद्रोही म्हणत नाही. आपण निदान कायदेशीर अधिकार बजावताना तरी लोक संकुचित म्हणतील, हसतील म्हणून सारखे बिचकून राहू नये.
लोकसभा अध्यक्ष हा सर्व देशाचा, राज्य, भाषा, प्रांत इत्यादी पातळींच्या पेक्षा वरचा समजला जातो. पण त्या पदावरील सोमनाथ चॅटर्जींनी सौरव गांगुलीच्या बजुने लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायची धमकी दिली होती, ते आठवतं का? अशा परिस्थितीत बंगाली नेत्यांना किंवा जनतेला कोणी कधी संकुचित, अतिरेकी, देशद्रोही म्हणतात का? आणि जरी कोणी मनातल्या मनात म्हणत असतील तरी त्यांनी त्याची का पर्वा करावी? उघडपणे मराठीसोडून कोणालाही अशी विशेषणे लावली जात नाहीत. कारण भित्यापाठीच ब्रह्मराक्षस.
तेव्हा मराठी गड्या, आपण जोपर्यंत आपण अनैतिक, बेकायदेशीर काही करत नाही तोपर्यंत कुणाच्याही म्हणण्याचा फार विचार करण्यापेक्षा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीचाच विचार करू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
लेख वाचनीय आहेत, धन्यवाद
प्रिय श्री० हर्षद खंदारे,
सप्रेम नमस्कार.
आपला अभिप्राय लेखकापर्यंत पोचवू.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] च्यायला, आपल्या भाषेत असं ठेवलंय तरी क… […]