व्यर्थ न हो बलिदान ! (ले० डॉ० दत्ता पवार)

डॉ० दत्ता पवारांनी महाराष्ट्र राज्याच्या रजत जयंतीच्या वेळी लिहिलेल्या या लेखातील समस्यांनी आज राज्याच्या सुवर्ण जयंतीच्या वेळी फारच भयानक स्वरूप धारण केलेले दिसते. अर्थात यातील प्रत्येक समस्येला मूलतः मराठी माणूस स्वतःच कारणीभूत आहे.

आपले राजकारणी असे वागतात कारण आपण त्यांना तसे वागू देतो. इतर राज्यांत सर्व राजकारणी एकत्रितपणे भाषा आणि संस्कृतीच्या जोपासना-संवर्धनासाठी काम करतात. केवळ महाराष्ट्रातच अगदी त्याउलट घडते कारण आपण तसे घडूनही काहीच प्रतिक्रिया दाखवत नाही. आपली अनास्था, औदासिन्य आणि न्यूनगंडच या सर्व परिस्थितीला कारणीभूत आहे, हे आपण जाणून घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी योग्य पावले ताबडतोब उचलली पाहिजेत, अन्यथा महाराष्ट्र राज्याच्या अमृतमहोत्सवाच्या वेळी फार उशीर झालेला असेल. या बाबतीत स्वाभिमानाने व जिद्दीने बदल घडवून आणण्यासाठी ’मराठी+एकजूट’ आवश्यक आहे.

डॉ० दत्ता पवारांचा संपूर्ण लेख पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन_व्यर्थ न हो बलिदान_ले० डॉ

डॉ० दत्ता पवारांचा हा उत्तम लेख आपले मराठी+एकजुटीच्या फेसबुकवरील चर्चागटातील मित्र श्री० जयदीप ढमाल यांनी पाठवला. त्यांचे मनःपूर्वक आभार.

.

लेखाविषयीचे आपले प्रतिमत (feedback) लेखाखाली नोंदवा. आभारी आहोत.

– अमृतयात्री गट

6 thoughts on “व्यर्थ न हो बलिदान ! (ले० डॉ० दत्ता पवार)

 1. This article should receive wide publicity in all Marathi media (newspapers, radio, TV etc). There should be discussions in all possible wide circulation , coverage type fora. Let all Marathi Manase get to know what the real problem is. I think the problem is Maharashtra-wide. In all cities and industrial areas Maharashtrians are secondary; ownership is in non-Maharashtrian hands.
  We should have another P.K.Atre now to take a lead!
  Protests won’t suffice. Maharashtrian intellegentsia has to assume leadership. It is a long struggle!
  Start now and perhaps in twenty-thirty years of enlightened selfless leadership we can see teh result.
  Can we do it?

  • प्रिय श्री० मोरेश्वर संत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या बाबतीत आम्हीसुद्धा आपल्याइतकेच अनभिज्ञ आहोत. किंबहुना जे उत्तर असेल असे व्यावहारिक, तर्काधिष्ठित निकषांवरून वाटते ते भावनाशील मन स्वीकारणार नाही. म्हणूनच तर ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा एक महत्त्वाचा लेख आम्ही प्रसिद्ध केला. त्याच प्रमाणे या लेखालासुद्धा शक्य तेवढी प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. ह्यापेक्षा अधिक काही करण्यात आमचा अमृतमंथन गट असमर्थ आहे. मराठी+एकजूट जमली तर काही आशा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० देसाई यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   डॉ० दत्ता पवारांच्या दूरदृष्टीला दाद द्यायला तर हवीच. पण त्यांनी ताकीद देऊनही आपण मराठीजनांनी स्वाभिमान बाळगून योग्य ती काळजी न घेतल्याबद्दल स्वतःचा दोषही मान्य केलाच पाहिजे. शेवटी राजकारणी काय? सत्तेसाठी-खुर्चीसाठी काहीही करतील. पण तसे आपण करायला लावायला पाहिजे. परंतु त्याच बाबतीत आपण आपले कर्तव्य करीत नाही आहोत. एकजुटीने आपण त्यांना धडा (योग्य शिक्षण, योग्य दिशा) शिकवला पाहिजे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० विनायक ठकार यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अगदी अचूक बोललात. मराठी माणसातील आपापसातील फुटीमुळे, आणि स्वभाषेविषय-स्वसंस्कृतीविषयक न्यूनगंडाच्या, अनास्थेच्या भावनेमुळेच आपले विरोधक आपल्यावर मात करतात. पानिपतापासून आपण काहीच शिकणार नाही काय?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s