मुंबई पोलिस खात्याने मुंबई महानगराचे अभिमानगीत (city anthem) तयार करण्यासाठी सोनू निगम यांना पाचारण केले आहे अशी बातमी ऐकली. हे गीत २६/११ च्या हत्याकांडात जीव गमावलेल्या शेकडो व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने तयार केले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी करू घातलेले हे गीत अर्थातच मराठीत नाही तर हिंदी भाषेत असेल आणि असेल अमराठी गायकांनी गायलेले आणि अर्थातच अमराठी भाषकांसाठी.
सी० रामचंद्र (रामचंद्र चितळकर) यांचे “ऐ मेरे वतन के लोगों” हे भारतीय सैनिकांना उद्देशून लिहिलेले गीत लता मंगेशकर यानी हिंदीमध्ये गायले, त्यामागची भूमिका आपण समजू शकतो. पण मुंबई हल्ल्यात प्राणाहुती देणार्या मराठी पोलिसांचे गीत मराठी ऐवजी परभाषेत का? कोलकात्यात, बेंगळुरूमध्ये, चेन्नईमध्ये अशीच घटना झाली असती तर ते श्रद्धांजलिपर गीत हिंदीतच केले असते का?
आपले मित्र श्री० सलील कुळकर्णी यांनी एका मराठी दैनिकाच्या संपादकांना लिहिलेले ह्या पत्राला संपादक महाशयांनी अर्थातच केराच्या टोपलीची वाट दाखवली. पण तरीही ते ह्या अनुदिनीद्वारे आम्ही सर्वसामान्य मराठी जनतेच्या पुढे सादर करीत आहोत. पत्र खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन_मुंबई महानगरीचे अभिमानगीत करताना मराठीची उपेक्षा_281209
पत्रात उल्लेखलेले वृत्त खालील दुव्यावर पाहू शकता.
अमृतमंथन_डीएनए वृत्त_मुंबईच्या अभिमानगीतासाठी बिग-बी स्वर देणार_041109
.
आपल्याला याबद्दल काय वाटते? अवश्य कळवा. आपले मत लेखाखालील रकान्यात नोंदवावे.
– अमृतयात्री गट
.
सलीलजी,
आपले या आधीचे लेख मी वाचले आहेत. त्यामागची कळकळ आणि आस्था जाणवल्यामुळेच मी आपल्या ’मराठी एकजूट’ उपक्रमात सहभागही नोंदवला आहे.
मात्र उपरोक्त बाबतीत काही आक्षेप घेण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. अशा फुटकळ मुद्द्यांवर विरोध करून आपण काय साधणार आहोत?
हिंदी ही राष्ट्रभाषा नसली, तरी सध्या मुंबापुरीवर तिचा असलेला प्रभाव आपण नाकारू शकत नाही.
कुणीतरी आपल्या खर्चाने कुठेतरी गाणे बसवते आहे, तर आपण केवळ ’भाषेच्या विरोधापाई’ त्यावर आक्षेप घेणे योग्य नाही असे मला वाटते.
आपले कौशल इनामदार मराठी अभिमानगीत बनवत आहेत, त्यांचे हात बळकट करूया. केवळ विरोधासाठी विरोध करून आपण आपले हसे करून घेऊ नये, असे प्रामाणिकपणे वाटते.
बाकी आपली मर्जी.
प्रिय श्री० ज्ञानेश पाटील यांस,,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिमताबद्दल आभार. आपण फार महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. अशा प्रकारच्या शंका मराठी माणसाच्या मनात येण्याची शक्यता आहेच. म्हणून आपल्या पत्राला सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पत्रात नसलेले काही इतर आनुषंगिक मुद्देदेखिल सर्वच वाचकांसमोर मांडण्याच्या दृष्टीने खाली नमूद केले आहेत.
मूळ लेख आमचे मित्र श्री० सलील कुळकर्णी यांचा असला तरी आम्ही आमच्या बुद्धीनुसार आपल्या पत्राला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. खालील मुद्द्यांचा विचार करावा. पटले तर घ्यावेत, नाहीतर सोडून द्यावेत. पण कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत मराठीच्या अभिमानाबद्दल एकी आहे तोपर्यंत लहानसहान मुद्द्यांचा मराठी एकजुटीवर परिणाम होऊ देऊ नये अशी अत्यंत कळकळीची विनंती.
१. सदर गीत कुणीतरी, कुठेतरी, स्वखर्चाने बनवीत नसून डीएनए वर्तमानपत्रातील मूळ वृत्ताप्रमाणे मुंबईचे पोलिसखाते (जे महाराष्ट्र राज्याच्या पोलिस खात्याच्या अधिकाराखाली येते), स्वखर्चाने (म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या करातून महाराष्ट्राच्या राज्यशासनाने पोलिस दलासाठी दिलेल्या निधीमधून) हे गाणे तयार करून घेणार आहेत. म्हणजे हा मूळ पैसा कोणाचा तरी खासगी नसून शंभर टक्के महाराष्ट्रीय जनतेचा आहे. तेव्हा महाराष्ट्रीय जनतेची भाषा, संस्कृती यांचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.
२. गाण्याचा उद्देश पोलिस खात्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली (tribute) अर्पण करणे असाच आहे. मुंबईच्या पोलिस खात्यातील सर्वच हुतात्मे झालेले पोलिसवीर मराठी होते हे आपण सर्व जाणतोच. त्यांना परकीय भाषेत श्रद्धांजली अर्पण करण्यामध्ये काय साध्य होणार आहे हे समजत नाही. तसे बंगाल तमिळनाडू, कर्नाटक इत्यादी कुठल्याही राज्यात घडू शकेल का हे स्वतःच्या मनालाच विचारून पहावे. मग राज्याराज्यात हा फरक का? ह्याचे कारण शोधू पाहिले म्हणजे घोडे मराठी माणसाच्या मूळ स्वभावावर येऊनच थांबते.
३. आपण म्हणता: “कुणीतरी आपल्या खर्चाने कुठेतरी गाणे बसवते आहे, तर आपण केवळ ’भाषेच्या विरोधापाई’ त्यावर आक्षेप घेणे योग्य नाही असे मला वाटते”. हिंदी भाषेला विरोध ही मूळ भावना आपण कधीही बाळगलेली नाही आणि कोणी बाळगूही नये. आपल्या भाषेची, तिच्या न्याय्य व नैतिक अधिकारांची, महत्त्वाची, सन्मानाची उपेक्षा करण्यासाठी जर एक साधन (tool) म्हणून दुसरी कुठलीही भाषा वापरली तर आपण त्याचा विरोध करू. तो विरोध त्या कृत्याचा असेल, कृत्यास जबाबदार व्यक्तींचा असेल, साधन म्हणून वापरलेल्या भाषेचा नाही. त्या जागी हिंदीच्या ऐवजी इंग्रजीचा किंवा इतर कुठल्याही भाषेचा वापर केला तरी त्या कृत्याचा (त्या भाषेविरुद्ध विरुद्ध मूलभूत आकस न बाळगता) विरोध करू.
४. संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतेक सर्व स्थानकांवर मराठीकडे दुर्लक्ष करणारे रेल्-वे प्रशासन महाराष्ट्रातील कर्नाटकाच्या सीमेजवळील स्थानकांवर कानडीचा, गुजराथजवळील स्थानकांवर गुजराथीचा व आंध्र प्रदेशाजवळील स्थानकांवर तेलुगूचा उदारपणे वापर करीत असते. हीच गोष्ट टपाल खाते, बॅंका या बाबतीत दिसून येते. अशा बाबतीत त्या भाषांना विरोध म्हणून नाही पण आमच्या भाषेचा अपमान करून त्याऐवजी दुसर्या भाषांचा सन्मान केल्याबद्दल आपण त्या संस्थांचा निषेध केला तर त्यात काही चुकले असे आम्हाला वाटत नाही. आमच्या राज्यात आमच्या भाषेला योग्य तो मान दिल्यावर व्यवहारानुसार इतर कुठलीही भाषा, अगदी फ्रेंच, तुळू, फारशी, स्वाहिलीसुद्धा, वापरण्यास आमची हरकत नाही. पण जिथे आमची भाषा हवी तिथे ते स्थान दुसर्या कुणालाही दिलेले आम्हाला रुचणार नाही. इतर कुठल्याही राज्यात (अगदी बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, देवास इत्यादी पूर्वीच्या मराठी संस्थानांच्या ठिकाणी सुद्धा) या संस्था सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या राज्यभाषेच्या जागी जर मराठीचा वापर करीत असतील (जे शक्य वाटत नाही) तर आपण तेसुद्धा चुकीचेच मानू.
५. रेल्-वे, टपाल खाते, बॅंका, मॉल, कॉल सेंटर, मोबाईल कंपन्या व इतर सर्वच जण मराठीची पायमल्ली करून जे माहितीफलक, फॉर्म, नामफलक इत्यादी बनवतात, घोषणा देणे, माहिती देणे, संवाद करणे इत्यादी गोष्टी करीत असतात ते सर्व स्वतःच्याच पैशाने करतात असे मानले (तसं म्हटलं तर ते सुद्धा खरे नाहीच, ते स्थानिक जनतेच्या पैशावरच संस्था चालवीत असतात) तर मग त्यांना तसे करू द्यावे असा निष्कर्ष काढायचा का? कुठल्याही संज्ञापनात (communication) मराठीला बाजुला काढल्यामुळे मराठी माणसाला नोकरी देण्याचीही त्यांना आवश्यकता नसते. मग अशा जागा त्यांनी स्वतःच्या (??) पैशाने परप्रांतीयांकरवी भरल्या तरी आपल्याला त्याबद्दल दुःख वाटू नये.
६. आपण म्हणता: “हिंदी ही राष्ट्रभाषा नसली, तरी सध्या मुंबापुरीवर तिचा असलेला प्रभाव आपण नाकारू शकत नाही”. अजुनपर्यंत तरी मुंबईत मराठी भाषक बहुसंख्येने आहेत. हिंदी भाषक राज्यांच्या व्यतिरिक्त पंजाब, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, सिंध प्रांत इत्यादी ठिकाणांहून मुंबईत आलेले बरेच परप्रांतीय मुंबईत स्वतःची मूळ भाषा विसरून घरीसुद्धा हिंदी भाषा वापरतात. पण त्यांच्या सकट सर्व हिंदी भाषकांची मुंबईतील संख्या ही मराठी भाषकांपेक्षा कमीच आहे. त्याउलट बेंगळूरूमध्ये कानडी भाषकांपेक्षा मूळचे तमिळ कितीतरी अधिक आहेत. मग तिथे पोलिस खात्याने त्या शहरापुरती राज्यभाषा बदलून तमिळ लागू करायची का? त्यांना तो अधिकार आहे का? तसेच केंद्र सरकारच्या कुठल्याही खात्याला, बॅंकांना, इतर संस्थांना, कुठल्याही शहरात, गावात, गल्लीत राज्यभाषेऐवजी दुसरी भाषा अधिक बोलली जात असली तरी तिला राज्यभाषेच्या ऐवजी लागू करण्याचा अधिकार आहे का? कायदा हा कोणीही, कधीही, स्वतःच्या सोयीप्रमाणे बदलायचा नसतो. महाराष्ट्राची अधिकृत भाषा ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकच आहे. आणि जोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातून वेगळी काढली जात नाही तो पर्यंत मुंबईची अधिकृत भाषासुद्धा मराठीच असेल. हिंदी भाषक मुंबईत दुसर्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर (बेंगळूरूप्रमाणे) गेले तरीही मुंबईची अधिकृत भाषा ही मराठीच असेल हे अगदी स्पष्टपणे लक्षात घ्यावे.
७. अर्थात उद्या मुंबईच महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याचा घाट यशस्वी झाला तर मात्र मुंबईची अधिकृत भाषा मराठी राहणार नाही. एवढेच नव्हे तर शोधूनशोधून मुंबईतून सर्व क्षेत्रातून मराठीला सावकाशपणे दूर केले जाईल हे पक्के समजून रहावे. जी पद्धत बेळगावात अवलंबली आहे, तीच मुंबईत अवलंबली जाईल. मुंबईमध्ये मराठी संस्कृती नसल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न अमराठी लोकांचा स्वातंत्र्यापासूनच चालू आहे. नेहरू व कॉंग्रेसने त्यांना पाठिंबाच दिला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांनी नेहरूंचा नाईलाज केला व म्हणूनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. पण आपणापैकी काही मराठी माणसांना तो आपला अधिकार न वाटता आपल्यावर केलेले उपकारच वाटतात. म्हणून मुंबईवर मराठी संस्कृतीची नाही तर हिंदी संस्कृतीचाच प्रभाव अधिक आहे असे त्याला वाटते. ज्याप्रमाणे कधीमधी चायनीज खाल्ले म्हणून आपण चीनी होत नाही व हिंदी गाण्यांवर प्रेम केले म्हणून उत्तरप्रदेशी होत नाही त्याचप्रमाणे गेल्या तीस-चाळीस वर्षांत हिंदी भाषक मोठ्या संख्येने मुंबईत आले म्हणून मुंबईची मूळ अनेक शतकांची संस्कृती पूर्णपणे बदलून हिंदी झाली हे आम्हाला पटत नाही. तसं म्हटलं तर हिंदीपेक्षा गुजराथीचा प्रभाव थोडा अधिक असेल, अर्थात मराठीपेक्षा खूपच कमी.
८. शिवाय हिंदी संस्कृती म्हणजे कुठली संस्कृती? उ-प्र, बिहार, म०प्र०, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल या मुंबईत प्रामुख्याने हिंदी बोलणार्या सर्वांची संस्कृती वेगळी आहे. त्यांच्यापैकी कोणाच्या संस्कृतीचा मुंबईवर प्रभाव आहे असं आपण म्हणायचं?
९. खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी भाषा व मराठी संस्कृतीचा मुंबईमधून र्हास होऊ लागण्यास आपलेच तथाकथित विशालहृदयी स्वभाव व मोठ्या तसेच लहानसहान बाबींच्या बाबतीत अनास्था व औदासिन्य हे उच्च व श्रेष्ठ गुण कारणीभूत आहेत. “भटाला दिली ओसरी, आणि भट हातपाय पसरी” ही म्हण तर आपण अनेक कंपन्या, नोकर्या, कंत्राटे, रोजगार, व्यवसाय यांच्याबाबतीत अनुभवतो. एक-एक चिरा काढून मोठा किल्लादेखिल पाडला जाऊ शकतो. तरीही आपण प्रत्येक मुद्दा फुटकळ म्हणून उदार मनाने सोडून देणार असलो तर मराठीचा, मराठी माणसाचा र्हास कोणीही थांबवू शकणार नाही.
१०. आपल्या स्वाभिमानासाठी, स्वभाषेसाठी, स्वसंस्कृतीसाठी लढा द्यायचा तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्यापासून आपल्याला बरेच शिकण्यासारखे आहे. व्यूहनीतीसाठी (strategy) आपण महाराजांसारख्या कुशल नेत्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवायला हवा. त्याबाबतीत आपण प्रतापराव गुजराचे खोट्या उदारपणाचे उदाहरण हे टाळण्यासाठी लक्षात ठेऊ.
११. आपण म्हणता, “आपले कौशल इनामदार मराठी अभिमानगीत बनवत आहेत, त्यांचे हात बळकट करूया.”. कौशल इनामदारांची या विषयावरची भाषणे, आवाहने आपण ऐकली असतीलच. मुंबईमधील एफ०एम० रेडियो वाहिन्यांवर हिंदी, इंग्रजी, पंजाबी व इतर भाषिक गाणी लागतात पण मराठी गाण्यांना बंदी आहे, याच्या कारणाबद्दल काय म्हणतात? ह्या उच्चभ्रू अमराठी माणसांना मराठी भाषा ही डाऊनमार्केट वाटते. म्हणजे नक्की काय वाटते व ती तशी का वाटते? चेन्नई, कोलकात्याच्या वर्तमानपत्रात स्थानिक साहित्यिक, अभिनेते यांच्याबद्दल मोठ्या बातम्या, पानभर लेख छापून येतात; पण मुंबईत तसे घडत नाही. चेन्नई, कोलकाता विमानतळावर प्राधान्याने स्थानिक भाषेत उद्घोषणा ऐकू येतात, विमानात स्थानिक पद्धतीचे खाद्य मिळते, स्थानिक भाषेतील वर्तमानपत्रे मिळतात. पंचतारांकित हॉटेलात स्थानिक भाषेत चौकशी, सूचना देऊन आपण इतरांसारखीच उत्तम दर्जाची सेवा मिळवू शकतो. त्यामुळे स्थानिक भाषा ही अपमार्केट ठरते. त्यामधील साहित्य वाचून हे सर्व ठरत नसते. तर ती भाषा कुठे वापरली जाते व कुठे नाही यावर ते ठरले जाते. मुंबईत मात्र मराठी ही फार झालं तर घरगुती मोलकरणींशी बोलायची भाषा (आज तर तेवढेही नाही) अशीच सर्वांची (मराठी माणसांसकट) भावना असते. ती आवश्यक आहे असे कोणालाही वाटत नाही. तसे का? कारण आपण आपली भाषा समाजात सर्वत्र दृश्य, श्राव्य केलेली नाही. महाराष्ट्रात मराठी आवश्यक, अपरिहार्य ठेवलेली नाही. आणि आपली ही अनास्था, हे औदासिन्य, आपण विशालहृदयीपणा या उदात्त नावामध्ये लपेटून सर्वत्र मिरवतो. मुंबईत स्थानिक भाषेत बोला असे सांगितले तर काहींना राग येतो. पण इतर राज्यात हा मुद्दा विवाद्य असूच शकत नाही. तो सर्वमान्य व वादातीतच असतो. बंगालात स्थानिक पोलिसांना देण्याची श्रद्धांजली ही बंगालीव्यतिरिक्त इतर कुठल्याही भाषेत असू शकते असे कोलकात्याच्या हिंदी भाषक पोलिस आयुक्ताच्या स्वप्नातही येणार नाही. आपण मात्र त्याला सहर्ष पाठिंबा देतो.
१२. सत्यजित राय (रे?) ह्यांना फ्रांस देशाने सन्मानित केले तो सन्मान एका भारतीयाचा उच्च सन्मान मानला तर तो भारत देशाचाच बहुमान होता. पण फ्रान्सच्या मंडळींना उद्देशून त्यांनी इंग्रजीत नव्हे तर बंगालीत भाषण केले. फ्रेंच मंडळींसाठी दुभाष्यांनी भाषांतर केले. (नाहीतर दुभाषे असतात कशाला?) रहमानने ऑस्कर पारितोषिक स्वीकारताना स्वभाषेचा अभिमानपूर्वक उल्लेख केला. त्याला त्याचा गंड वाटला नाही. अनेकदा आंतरराष्ट्रीय चर्चाबैठकींमध्ये बहुतेक (अगदी लहानसहानसुद्धा) देशातील प्रतिनिधी आपापल्या भाषांत भाषणे करतात. भारतीय प्रतिनिधी मात्र कटाक्षाने आपल्या पूर्वजेत्यांच्या भाषेत परकीय भाषण करतात. तिथे त्यांनी हिंदी भाषेचा अभिमान दाखवायला हवा. त्याने आपणा सर्वांनाच आनंद होईल. पण तसे घडतच नाही. म्हणजे हिंदीचा अभिमान हा फक्त आपल्याच देशात महाराष्ट्रासारख्या गरीबगाय (?) लोकांवर दबाव आणण्यापुरताच असतो का? तो इतर राष्ट्रांच्या समोर का गळून पडतो?
१३. काहींच्या मते २६/११ चा हल्ला ही देशविरोधी कृती असल्यामुळे त्यासंबंधीचे गाणे हिंदीमध्ये असायला हवे. हा आणखी एक पूर्वापारच्या गैरसमजाचा, न्यूनगंडाचा परिणाम. देशपातळीवरील भावना, राष्ट्रीयत्व, देशप्रेम इत्यादी भावना हिंदीमध्येच व्यक्त करता येतात इतर भाषांत नाही हा कायदा कोणी, केव्हा केला? असा कायदा असेलच तर तो फक्त महाराष्ट्रालाच लागू आहे की बंगाल, तमिळ नाडू व इतर सर्वच अहिंदी राज्यांनाही लागू आहे? हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. नेहरू व शास्त्रीजींनी तर आठव्या परिशिष्टातील सर्वच भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे. मग कुठली भाषा कधी वापरायची? तर त्या-त्या राज्याच्या संदर्भात ती-ती राज्यभाषा ही राष्ट्रभाषा ठरते. या नियमानुसारही महाराष्ट्रात (मुंबईला महाराष्ट्राचा भाग मानण्यास हरकत नसेल तर) मराठी भाषेलाच सर्वच अधिकृत विषयात प्राधान्य मिळायला पाहिजे, विषय कितीही फुटकळ वाटत असला तरीही. प्रश्न तत्त्वाचा आहे आणि महाराष्ट्रात आपण कुठल्याही नियमाला अपवाद होऊ देता कामा नये. कारण आधीच राज्यभाषेविषयक बहुतेक नियम हे इथे अपवादानेच पाळले जातात.
१४. हिंदीबद्दल काहीही बोलताना आपल्याला अडखळायला होते. ती राष्ट्रविरोधी भावना ठरेल असे वाटते. असे असेल तर श्री० कुळकर्णींचा ’एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट’ हा लेख वाचून पहावा. लेख ह्या अनुदिनीवरही उपलब्ध आहे.
१५. खरं म्हणजे प्रस्तुत विषय हा फुटकळ विषय नक्कीच नाही. राज्यशासन, पोलिस खाते, २६/११ हल्ला, पोलिसांचे हौतात्म्य, अभिमानगीत, कायमचे, भविष्यकाळात नेहमी गायले जाईल असे. अशी गीते एकदाच बनतात व कायम होतात. हे मुद्दे फुटकळ नक्कीच नाहीत.
१६. प्रेम-अभिमान-श्रद्धा या अमूर्त, तरल भावना आहेत. अशा भावनांच्या आधारासाठी माणूस प्रतीके शोधत असतो. मग त्या भावना स्पष्ट स्वरूपात जाणवायला लागतात. ही मानवी स्वभावाची सवय आहे. देशप्रेमासाठी झेंडा, नकाशाची चित्रे, व इतर अनेक प्रतीके असतात. तसेच आपल्या भाषेला सर्वत्र वाचू, ऐकू लागलो तर आपल्या मनात तिच्याबद्दलची जाणीव वाढू लागते. ती सर्वत्र अनुपस्थित असली तर तिच्याबद्दल हीनतेची, न्यूनगंडाची भावना मनात निर्माण होते. एक ढोबळ उदाहरण द्यायचे तर एखाद्या नेत्याच्या सभेला प्रचंड गर्दी जमली की तो फार लोकप्रिय आहे असे वाटू लागते. मग ती गर्दी भाड्याने किंवा धाकदपटशा दाखवून जमवलेली असली तरीही. तमिळ भाषेला परप्रांतीय वचकून राहतात व ती त्या राज्यात सर्वत्र दृश्य, श्राव्य होते. तिच्याशिवाय राज्यात सामान्य व्यवहार करणे अशक्य होते. आणि ते पाहिल्यावर सर्वांना ती खरोखरच संपन्न, लोकप्रिय, आवश्यक, अपमार्केट वाटू लागते. त्यांच्या स्वाभिमानाच्या अतिरेकालाही कोणी संकुचितपणा म्हणत नाही. त्याउलट परिस्थिती मराठीसारख्या उदारमतवादी, दुर्बळ लोकांची. आपण संकुचित ठरू, आपले हसे होईल या भीतीने आपण आपले कायदेशीर, नैतिक अधिकारही बजावायला घाबरतो. आणि कधी काळी तसे केले तर तमील लोकांच्या स्वभाषाभिमानाचे कौतुक करणारी मंडळीच मराठी माणसाला संकुचित, उद्धट, हास्यास्पद ठरवतात. हे ठरवणारे लोक स्वतःच्या राज्यात कसे वागतात? मराठीएवढी वाईट परिस्थिती आसाम, ओरिसा अशा मागास राज्यांतील भाषांच्या बाबतीतही आढळत नाही. कारण मराठी वगळता इतर प्रत्येक भाषक आपल्या स्वाभिमानाबद्दल, अधिकारांबद्दल जागरूक असतो. इतर परप्रांतीय आपल्याला हसतील म्हणून बिचकत नाही. त्यामुळे त्याला हसायचे धाडस परप्रांतीय करीत नाहीत. मात्र भित्या मराठी माणसांच्या पाठी ब्रह्मराक्षस कायमचाच लागलेला असतो.
१७. मधुवंती सप्रे या मराठीतील ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आहेत. त्या सुमारे १५ वर्षांपूर्वी लोकसत्तेत एक सदर लिहित. राज्यशासनाच्या विविध विभागात मराठीचे काय स्थान याबद्दल सविस्तर लेख लिहित. त्यांच्या दृष्टीने इतर खात्यांच्या मानाने पोलिस खाते हे बर्यापैकी मराठीमध्ये चाले. पण गेल्या १५ वर्षात परिस्थिती खूपच बदलली आहे. पोलिस खात्याच्या संकेतस्थळावरील मराठीचे स्थान पहा. जणू हे खाते सामान्य माणसांच्या सेवेसाठी नाहीच. मुंबईतील वाहतुक-रहदारी संबंधीच्या पाट्यासुद्धा हल्ली इंग्रजीतच दिसू लागल्या आहेत. No Parking, No Entry, One Way अशा अनेक. मराठी माणसाने मला केवळ राज्यभाषा समजते. इतर भाषेतील नियम मला समजत नाहीत असे म्हटले तर चालेल का? पूर्वी अशा पाट्या सर्वच्या सर्व मराठीत असत. ही गोष्ट म्हटली तर फुटकळ, म्हटली तर लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध. लोकशाहीत शासनकारभार लोकांसाठी चालवायचा असतो. तो लोकांच्या भाषेत नसेल तर त्याचा काय उपयोग?
१८. ज्या माणसाचे पोट भरले आहे त्याने लहानसहान फुटकळ पदार्थ पानात वाढून घेण्यास नकार दिला तर आश्चर्य नाही. पण सदा अर्धपोटी ठेवल्या जाणार्याने तसे करू नये. एक फुटकळ पदार्थही फुकट घालवू नये. फाटक्या खिशाच्या माणसाने औदार्य दाखवण्याचा मोठेपण न करणेच शहाणपणाचे. मराठी माणसाने फुटकळ विषयांवरही ढील देऊ नये. आपला अधिकार सर्वच विषयात गाजवला पाहिजे. आणि प्रस्तुत विषय तर फुटकळ आहे असे आम्हाला वाटत नाही.
१९. आम्हाला मनापासून असे वाटते की अभिमानगीत वगैरे नखरेबाजी करण्यापेक्षा शासनाने हुतात्म्यांच्या कुटुंबाला जास्तीतजास्त मदत, शिक्षण-रोजगारासाठी मदत कृती प्रथम करावी. त्यामुळे हुतात्म्यांच्या आत्म्यांना थोडी तरी शांती लाभेल. आश्वासन दिलेली मूळ रक्कमही अजुन वर्षभरानंतरही पूर्णपणे देऊन झालेली नाही. मग ही गाण्याची भंपकबाजी कशाला?
२०. इतर लढ्यात, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वगैरे बळी पडणार्या पोलिसांच्या जीवाला काहीच किंमत नाही का? त्यांना कितीशी मदत मिळते? संसदेवरील हल्ल्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा सैनिकांच्या कुटुंबियांनाही इतक्या वर्षानंतर केंद्र सरकारने आश्वासित रक्कम दिलेली नाही. त्यांच्या बलिदानामुळे ज्यांचे जीव वाचले त्या खासदारांनी आपले भत्ते, पगार, विमान प्रवासादी सोयी वाढवून घेतल्या. पण हुतात्म्यांची आठवण मात्र कोणालाही झाली नाही. असे हे सर्वच राजकारणी फक्त देशप्रेमाचे देखावे करण्यात हुशार असतात. अभिमानगीत हात्यातलाच एक प्रकार.
आणखी काय व किती लिहावे? या विषयावर शंभर पाने लिहिली तरी ती अपुरी होतील.
असो. पण वरीलपैकी कुठल्याही विधानाबद्दल वैयक्तिक पातळीवर गैरसमज करून घेऊ नये एवढीच कळकळीची विनंती. तसे होणार असेल तर आम्ही आधीच आपली क्षमा मागतो. मराठी माणसांनी काहीही करून परंपरागत फूटीचा शाप टाळलाच पाहिजे.
कळावे. असलेला लोभ अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा ही मनःपूर्वक विनंती.
– अमृतयात्री गट
प्रिय अमृतयात्री गट,
सर्वप्रथम माझ्या आधीच्या प्रतिसादाची आपण इतक्या तातडीने व विस्तृत दखल घेतलीत, त्याबद्दल आपले आभार मानतो. आपले बहुतांश मुद्दे मला मान्य आहेत, आणि खरं तर ते माझेही मुद्दे आहेत.
माझ्या बाजूने काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो-
“पण कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत मराठीच्या अभिमानाबद्दल एकी आहे तोपर्यंत लहानसहान मुद्द्यांचा मराठी एकजुटीवर परिणाम होऊ देऊ नये अशी अत्यंत कळकळीची विनंती”
हा आपला मुद्दा.
आपल्या विपरीत मत एखाद्याने मांडले म्हणजे तो फुटीर, असा समज कृपा करून, करून घेऊ नये. लिखाणाच्या शेवटीही आपण ’परंपरागत फूटीचा शाप टाळला पाहिजे’ असे म्हटले आहे. माझे मत हे माझे व्यक्तिगत मत आहे, आणि मतमतांतरे असू शकतात, त्यामुळे लगेच एकजूटीला बाधा येत नाही, येऊ नये.
आपले मुद्दा क्रमांक १,२,३,४ पूर्ण पटले. त्याबाबत आपल्याशी सहमत आहे.
मुद्दा क्र.५- यात आपण असे म्हटले आहे, की “रेल्-वे, टपाल खाते, बॅंका, मॉल, कॉल सेंटर, मोबाईल कंपन्या व इतर सर्वच जण मराठीची पायमल्ली करून जे माहितीफलक, फॉर्म, नामफलक इत्यादी बनवतात, घोषणा देणे, माहिती देणे, संवाद करणे इत्यादी गोष्टी करीत असतात ते सर्व स्वतःच्याच पैशाने करतात असे मानले (तसं म्हटलं तर ते सुद्धा खरे नाहीच, ते स्थानिक जनतेच्या पैशावरच संस्था चालवीत असतात) तर मग त्यांना तसे करू द्यावे असा निष्कर्ष काढायचा का? कुठल्याही संज्ञापनात (communication) मराठीला बाजुला काढल्यामुळे मराठी माणसाला नोकरी देण्याचीही त्यांना आवश्यकता नसते. मग अशा जागा त्यांनी स्वतःच्या (??) पैशाने परप्रांतीयांकरवी भरल्या तरी आपल्याला त्याबद्दल दुःख वाटू नये.”
दोन सर्वस्वी भिन्न गोष्टींची तुलना होते आहे. सदर पोलिसाचे होवू घातलेले गीत हा कायदा नाही, तर एक उपक्रम आहे. देशपातळीवर असे उपक्रम अनेक वेळा होत असतात, त्यांना तेवढे महत्त्व दिले जात नाही. कारण ’भाषा’ वगैरे मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे नसून ’शहीदांना श्रद्धांजली’ ही भावना महत्त्वाची आहे.
परदेशात स्थायिक झालेले मराठी लोक तिथे ’विश्व मराठी संमेलन’ भरवतात, याबद्दल आपले काय मत आहे?
सवाई गंधर्व महोत्सवात अवध,भोजपुरिया गाणी गायली जातात. त्यांनाही विरोध करावा का?
मुद्दा क्र. ६-
यात आपण म्हणता- “मुंबईची अधिकृत भाषा ही मराठीच असेल हे अगदी स्पष्टपणे लक्षात घ्यावे.”
मी कुठेही असे म्हटलेले नाही, की मुंबईची अधिकृत भाषा हिंदी आहे. मी फक्त ’हिंदीचा प्रभाव’ असल्याचे म्हटले आहे.
मुद्दा क्र. ८-
यावर माझा तीव्र आक्षेप आहे. यात आपण म्हणता- “शिवाय हिंदी संस्कृती म्हणजे कुठली संस्कृती? उ-प्र, बिहार, म०प्र०, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल या मुंबईत प्रामुख्याने हिंदी बोलणार्या सर्वांची संस्कृती वेगळी आहे. त्यांच्यापैकी कोणाच्या संस्कृतीचा मुंबईवर प्रभाव आहे असं आपण म्हणायचं?”
’हिंदी संस्कृतीचा प्रभाव’ हा शब्दही मी वापरलेला नाही. त्यामुळे हा मुद्दा अनाठायी मांडला गेला आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
मुद्दा ९, १५ आणि १८- माझ्या आधीच्या प्रतिसादातील ’फुटकळ’ हा शब्द आपल्याला रुचलेला नाही, हे मी समजू शकतो.
पण आज इतर मुद्द्यांच्या तुलनेत (ते मुद्दे, जे आपण क्र. ५ मधे मांडले आहेत) या गाण्याचा मुद्दा खरोखर फारसा महत्त्वाचा नाही. याहून मोठे प्रश्न आपल्यापुढे आहेत, त्यांना प्राधान्य दिले पाहिजे असे माझे मत आहे. केवळ लहानसहान गोष्टींना विरोध करत बसल्याने आपण (यात मी सुद्धा आलो) हास्यास्पद ठरू आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवेळी आपल्याला गांभीर्याने घेतले जाणार नाही, असे मला वाटते.
मुद्दा क्र. १४-
“हिंदीबद्दल काहीही बोलताना आपल्याला अडखळायला होते. ती राष्ट्रविरोधी भावना ठरेल असे वाटते. असे असेल तर श्री० कुळकर्णींचा ’एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट’ हा लेख वाचून पहावा.”
सलीलजींचा सदर लेख मी वाचला आहे. या लेखाचा माझ्या परीने इंटरनेटवर प्रचारही केला आहे, आणि अनेकांना या उपक्रमात सहभाग नोंदवण्यास उद्युक्त केले आहे.
मला स्वत:ला ’हिंदी’ भाषेचा पुळका नाही. हिंदी आणि राष्ट्रभावनेचा काही संबंध नसल्याचेही मी जाणतो. फक्त हिंदीबद्दल ’काहीही’ बोलले जाऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.
मुद्दा क्र. १९, २०- पूर्णपणे सहमत.
सदर चळवळीला माझा संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा आहे, हे पुन्हा एकदा नमूद करतो. केवळ चर्चेच्या हेतूने कुणी विरोधी मते मांडली, म्हणून लगेच ’एकजूटीत फूट’ वगैरे समजण्यात येऊ नये.
आपला प्रत्येक मुद्दा योग्यच असेल, असा दुराग्रह कुणीही करू नये. माझेही असंख्य मुद्दे चुकीचे असू शकतात, याची मला नम्र जाणीव आहे.
ही चळवळ आपण समन्वयानेच पुढे न्यायची आहे, हे लक्षात ठेऊयात.
सबब, गैरसमज नसावा.
लोभ आहेच, आणि यापुढेही राहील.
तूर्त इथेच थांबतो.
प्रिय ज्ञानेश पाटील यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रगल्भ व परिपक्व उत्तराबद्दल आभार. त्या अनुषंगाने जे सुचते ते खाली लिहित आहोत. आपल्याला पत्रालाच उद्देशून आहे असे मानून घेऊ नये.
१. आम्हाला असे वाटते की सध्यातरी आपल्याला स्वभाषाभिमान व स्वसंस्कृत्यभिमान या विषयांत थोडीशी जरी शंका वाटली तरी आपण आपल्या मनालाच विचारावे की अशा परिस्थितीत बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक अशा इतर भारतीय अहिंदी व स्वाभिमानी राज्यांमध्ये काय घडले असते? या प्रश्नाचे जे प्रामाणिक उत्तर आपले मन देईल तोच कौल समजावा. सध्या तरी आपण स्वाभिमानाच्या बाबतीत निदान इतर राज्यांच्या पातळीला तरी पोचायचा प्रयत्न करू. तेवढे झाल्यावर मग त्यांच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न करू.
२. बंगलोरमध्ये कानडींपेक्षा तमिळ भाषक सरळ सरळ अधिक आहेत. आजकाल आय०टी०मुळे हिंदीसुद्धा घुसले आहे. मग बंगळूरमध्ये असे गीत हिंदी किंवा तमिळमध्ये बनू शकेल काय?
३. भाषाविषयक नियमांच्या बाबतीत केंद्र सरकारने काही नियमांमध्ये तमिळनाडूचा स्पष्ट अपवाद केला आहे हे सर्वसामान्यांना माहित नसते. शिवाय चेन्नई दूरदर्शनावर सुरूवातीलाच असंतोष निर्माण झाल्यापासून हिंदी बातम्या दिल्या जात नाहीत. पण त्याचा गाजावाजा होत नाही. अशा अनेक गोष्टी गुपचुप होत असतात पण त्याबद्दल तमिळ लोकांना संकुचित, देशद्रोही इत्यादी विशेषणे लावल्याचे कोणी कधी ऐकले आहे काय? तमिळ लोकांना इतर लोक आपल्याला हसतील असे का वाटत नाही?
४. कधीच दारू न पिणार्याने कधीमधी घोटभर प्याली तरी त्याची “पक्का दारूडा बनला” अशी नालस्ती होते. पण नियमित पिणार्या माणसाबद्दल लोक काहीही बोलत नाहीत. तसाच हा प्रकार मानावा का? स्वाभिमानाची झिंग तुम्हा-आम्हा सर्वच मराठी माणसांना चढू दे व स्वाभिमानाच्या नशेचे व्यसनच आपल्याला लागू दे, अशीच आमची इच्छा. त्या बाबतीत तरी कोणी आपल्या स्वाभिमानाच्या व्यसनाला हसेल म्हणून आपण तमा बाळगण्याचे कारण नाही.
५. आधीच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे आपण शिवाजी महाराजांच्या कणखर स्वाभिमानाचा आदर्श धरू, सेनापती प्रतापराव गुजरांच्या खोट्या विशालहृदयीपणाचा नाही.
६. स्वाभिमान, तत्त्व, प्रेम, चारित्र्य, अशा पवित्र भावनांच्या बाबतीत शाळेप्रमाणे ४० टक्के ही उत्तीर्ण होण्याची मर्यादा नाही. तिथे १०० टक्के पूर्ण यशच मिळवले पाहिजे. आमच्या आईच्या बाबतीत लहानसहान प्रमाद आम्ही दुर्लक्षित करू, मोठ्या प्रमादांविरुद्धच निषेध व्यक्त करू असे शक्य नाही. प्रत्येक प्रमादाविरुद्ध निषेध व्यक्त व्हायलाच हवा. गळक्या छप्पराचे लहानसे भोक दुर्लक्षित राहिले तरी ते लवकरच मोठे होते व छप्पर कोसळू शकते.
७. इतर कुठल्याही भाषेप्रमाणेच हिंदीचा द्वेष करू नये व इतर कुठल्याही भाषेप्रमाणेच तिला डोईजड होऊ देऊ नये. आपल्याला हिंदी भाषेबद्दल विशेष राग नाहीच. पण दुर्दैवाने राजकारणी लोक हिंदीचा वापर करून आमच्या भाषेचे अधिकार हिरावून घेतात म्हणून आम्हाला हिंदीला बाजूला सारावीच लागते. इतर अहिंदी राज्यांत शेपूट घालणार्या श्रेष्ठींच्या पुढे आपले मराठी नेते शेपूट घालतात त्याला काय मनाचा मोठेपणा म्हणायचे?
८. कालच (२१ जानेवारी २०१०) मुख्यमंत्री अशोकराव देशमुखांनी मंत्रीमंडळाने आधीच असलेल्या कायद्याच्या केलेल्या पुनरुच्चाराचे आडवळणाने चुकीचे प्रतिपादन करून एका दिवसात आपले म्हणणे बदलले व मर्द मराठा आज कसा नामर्द मराठा झाला आहे याचे प्रत्यंतर घडवले. राज्याचा मोटार वाहन कायदा हा मूळ केंद्रीय कायद्याच्या प्रारूपावर आधारित असतो. त्यानुसार राज्यभाषा मराठी ही इतर स्थानिक भाषांसह अनिवार्यच आहे. पण डोक्यात सोनियाचे लाटणे आदळल्यामुळे मति भ्रष्ट झाल्यावर मराठी वीराने शेपूट घालून त्या विषयी सपशेल माघार घेतली. अशा प्रकारच्या ’माघारी’ प्रत्येक लहानमोठ्या आघाडीवर घेत राहिल्यामुळेच मराठी माणसाची एवढी ’पिछेहाट’ झाली आहे. (यांच्याच पूज्य वडिलांनी संजय गांधीचे जोडे उचलले होते. अशाच निष्ठेचे बक्षिस यांना मिळते.)
९. अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णाने लहानसहान पथ्याच्या बाबतीतही अति दक्षता बाळगायला पाहिजे. अति मधुमेह्याने “थोडीफार साखर खाल्ली तर काय झाले” असा विचार केला तर तो आत्मघातकी ठरू शकतो.
१०. संपूर्ण देशात मराठी भाषेवर (संपन्न असूनही) जेवढा अन्याय होतो आहे तेवढा इतर कुठल्याही भाषेवर होत नाही ह्यात कोणालाही संशय वाटतो काय? अगदी आसाम, ओरिसा अशा गरीब राज्यांतही अधिक अभिमानी जीवन जगतात.
११. हिंदी, मारवाडी (राजस्थानी), पंजाबी अशा उत्तरेकडील राज्यांनी जर उदारपणे महाराष्ट्रात आपली माणसे पाठवून निःस्वार्थीपणे महाराष्ट्राची प्रगती घडवून दिली असेल तर आता तसे करणे ताबडतोब थांबवावे व यापुढे स्वतःची माणसे स्वतःच्याच राज्यात ठेऊन स्वतःच्या राज्यांची प्रगती घडवावी. परोपकाराचा एवढाच पुळका असेल तर आपली माणसे, अंदमान, निकोबार, ओरिसा, आसाम इथे पाठवावी व त्यांची प्रगती घडवावी. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती यांच्या प्रभावाची आम्हाला मुळीच आवश्यकता नाही.
१२. हिंदी राज्यांचा प्रभाव हा त्यांना लागून असणार्या बंगाल, आसाम, ओरिसा, अशा सर्वच राज्यांना नको असतो. महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात बंगाल व आसाममध्ये उत्तर प्रदेशी व बिहार्यांना चोप मिळतो. पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेशातही बिहार्यांचा तिरस्कार होतो. मात्र बभ्रा फक्त महाराष्ट्राचाच होतो कारण आपण त्याला दबतो.
१३. राज्यभाषा न येणारा टॅक्सी चालक बंगाल, तमिळनाडू, ओरिसा, कर्नाटकात, तमिळभाषी बंगळूरमध्ये चालू शकेल काय? नाही ना? मग आम्हालाही नाही. सध्या आपण त्यांचेच आदर्श बाळगू, बिलंदर, स्वार्थी, मराठीचे हितशत्रू असलेल्या मराठी राजकारण्यांचे नाही.
१४. वरील सर्वच मुद्दे आमच्या डोक्यात आले तसे लिहित गेलो. आपणाला सर्वच पटणारे आहेत हे माहित आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत जराही ढील देऊ नये एवढेच आमचे म्हणणे. चुकायचे असलेच तर स्वाभिमानाच्या अतिरेकाच्या दिशेने चुकूया, औदासिन्याच्या, निरभिमानाच्या दिशेने नको. नापास व्हायची परिस्थिती आल्यावर थोडा अधिक अभ्यास झाल्यास हरकत नाही, शंभर गुण तरी निश्चित मिळतील. पण जराही कमी अभ्यासामुळे पुन्हापुन्हा नापास व्हायची जोखिम नको.
मनातील चीड, त्वेष अशा भावनांचा आपल्यासारख्या समविचारी मित्रांसमोर निचरा झाला की तात्पुरते तरी बरे वाटते. पुन्हा नवीन बातम्या ऐकल्या की हृदयातील जळजळ सुरू होते.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
I apologize for not posting this message in Marathi (although my earlier messages have been in my Marathi)for want of time. This decision of Mumbai police of inviting a non-Marathi person to write a city anthem in a non-Marathi language must be condemned with severest of terms and any such move must be thwarted determinedly. This is a part of the old ploy of anti-Marathi forces, who find it difficult to digest the fact that Mumbai belongs to Marathi manoos and are hell bent on snatching it away from him. Marathi+Ekajoot motion must unitedly approach the Mumbai police and bring to their notice how this thoughtless(or malicious) decision would hurt feelings of Marathi manoos and would only serve to consolidate his doubt about the mal-intentions of the anti-Marathi forces. Such a decision would only add to responsibilities of the already over burdened Mumbai police of maintaining law and order of the city anticipating the people’s unrest resulting out this decision. Somebody from the Marathi+Ekajoot motion with poetic talent should write a Marathi poem honoring the role played by the Mumbai police during the tragic incident making special references to the police officers like Hemant Karkare, Vijay Salaskar and the like and present it to the Mumbai police and impress upon them that enough talent is available within Marathi people themselves.
प्रिय श्री० आर्य यांस,
सप्रेम नमस्कार.
आपल्या सूचना उत्तमच आहेत. सर्वात प्रथम आपण सर्वांनी मुंबई पोलिसांच्या संकेत स्थळावर किंवा त्यांच्या मुख्यालयाच्या पत्त्यावर पोलिस आयुक्तांच्या नावे पत्र लिहून प्रस्तुत बेकायदेशीर, अप्रस्तुत, राज्यभाषा मराठीची उपेक्षा करून मराठी माणसाच्या भावना दुखावणार्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध करून ती योजना ताबडतोब मागे घेण्यास सांगू. पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, आमदार, पत्रकार इत्यादींनाही पाठवू. हे सर्व पत्ते शोधून काढून आपण एकमेकांना देऊ शकतो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
mahaashay,
mumbai police chya 100 hya no. var hindi, english madhye tape waajte, maraathit vicharnaa keli jat naahi he aapanaas maahit aahe ka?
a.p.j. abdul kalamni pahile presidential speech aadhi tamil nantar english madhye kele,hindit ajibaat naahi he aaplyaalaa maahit aahe ka?
प्रिय रुता चित्रे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकाबद्दलचे व अब्दुल कलामांबद्दलचे निरीक्षण योग्यच आहे. श्री० ज्ञानेश यांच्या पत्राच्या उत्तरातील मुद्दा क्र० १७ पहा.
आपण सर्वजण मुंबई पोलिसांच्या खाली दिलेल्या संस्थळावर आपला निषेध नोंदवू. असे मोठ्या संख्येने घदले पाहिजे.
http://www.mumbaipolice.org/complaint.htm
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
प्रिय रुता चित्रे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले मुंबई पोलिसांच्या १०० क्रमांकाबद्दलचे व अब्दुल कलामांबद्दलचे निरीक्षण योग्यच आहे. श्री० ज्ञानेश यांच्या पत्राच्या उत्तरातील मुद्दा क्र० १७ पहा.
आपण सर्वजण मुंबई पोलिसांच्या खाली दिलेल्या संस्थळावर आपला निषेध नोंदवू. असे मोठ्या संख्येने घडले पाहिजे.
http://www.mumbaipolice.org/complaint.htm
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Mulat aplya sarkarla Marathi Manasabaddal ani Marathi baddal ajibat prem nahi.Sarva rajyakarte lachar ani binkanyache ahet.
Te Marathi ani Hindi ashya donhi bhashamadhe gane ekach velela sadar karu shakle asate.
Pan mulat apla mhanje rajyakartyancha tasa agraha hava.
Hya pratikriya vartamanpatrat ka chhapat nahi mhanje nidan marathi jantechya tivra bhavana tari tyana pochtil
प्रिय श्री० विनय आठले यांस,
सप्रेम नमस्कार.
आपली सर्व विधाने पटली. केवळ एकाच बद्दल थोडी शंका वाटते.
आपण म्हणता: Te Marathi ani Hindi ashya donhi bhashamadhe gane ekach velela sadar karu shakle asate.
मुंबई अजुनही (अजुनतरी?) महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची अधिकृतभाषा, राज्यभाषा, स्थानिक भाषा केवळ मराठीच आहे. मग इथे हिंदीला काय स्थितीजन्य अधिकार (locus standi) आहे?
श्री ज्ञानेश पाटील यांच्या पत्राचे उत्तर पहावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मुळात आपन हे सर्व मराठित लिहा,मग सरकारला उपदेश करा ! आपला पुणेकर
प्रिय श्री० तुषार यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण म्हणता ते योग्यच आहे. भाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे.
पण आपला आधी संगणकाशी संबंध आला नसेल तर सुरुवातीस त्याचा वापर करण्यास आपल्याला तेवढा विश्वास वाटत नाही. थोडी भीतीच वाटते. अर्थात काही कारणाने संगणकाचा वापर करायला शिकावंच लागलं तर मात्र मग आपण स्वतःलाच हसतो, “हात्तिच्या! ही एवढी सोपी गोष्ट होती आणि मी विनाकारण त्याला घाबरत होतो/होते.” आणि एकदा संगणकावर काम करण्याची सवय झाली, महाजालावर स्वैर हिंडण्याचा आणि विरोपाद्वारे (ई-मेल) पटापट मित्रमैत्रिणी आणि इतर संबंधितांशी पत्रव्यवहार करण्याचा छंद (व्यसन?) लागला की मग त्याचे फायदे कळतात आणि मग या आधुनिक मेघदूताची वेळोवेळी भेट न घडल्यास चुकल्याचुकल्यासारखे वाटते. म्हणूनच अशा आधुनिक मेघदूताशी आपण लवकरात लवकर संधान बांधायला हवे.
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे….
संगणकावर मराठीमध्ये लेखन करण्यासाठी आवश्यक ती माहिती जाणून घेण्यासाठी खालील दुव्यावरील लेख वाचा.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/
आपण याचा जरूर फायदा करून घ्या आणि आपल्या इतर मित्रांनाही मायबोलीत लिहिण्याचा आग्रह करा. वरील दुवा आपण मुक्तपणे अग्रेषित करू शकता. त्याने आपल्या मायबोलीच्या प्रसार संवर्धनास हातारच लागेल.
शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.
कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. आपले युनिकोड-तज्ज्ञ मित्र आपल्याला सर्व प्रकारच्या अडचणीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतील. शुभस्य शीघ्रम्I
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
२६/११ च्या हल्य्यात धारातीर्थी पडलेल्या मुंबई पोलिसांच्या स्मृती प्रीत्यर्थ एक अभिमान गीत मराठी ऐवजी हिंदी मधून तयार करणे ही खरच लाजिरवाणी गोष्ट आहे. जो पर्यंत मराठी माणूसच स्वतःचा अपमान करत राहील तो पर्यंत इतर मराठीला महाराष्ट्रात योग्य तो मान मिळणार नाही. निवडणुकांच्या वेळीच विचार करायला हवा. कोण मराठी माणसांची मते फोडून कॉंग्रेस वाल्यांना सत्तेवर आणतो आणि मग त्या राजकारणी (मराठी व अमराठी) लोकांकडूनच मराठीची गळचेपीहोते.
अपर्णा
प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या सर्वच भावना आम्ही समजू शकतो.
श्री ज्ञानेश पाटील यांच्या पत्राच्या उत्तरामध्ये आपल्याच भावना सविस्तरपणे मांडण्याचाप्रयत्न केला आहे. कृपया वाचून पहावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मराठी भाषेला मुंबईत किती नागरीक ओळखतात ह्याबद्दल माहिती मिळेल काय? २६/११ वर अभिमानगीत लिहीतांना त्यामुळे मराठी व अमराठी ह्या दोन्ही जनसमुदायांच्या भावनांची कदर होईल असा विचार करून ते हिंदीत लिहीण्याचा सूद्न्य निर्णय घेतल्याबद्दल तसेच ते अमराठी गायकाकरवी गाऊन घेण्याचा निर्णयही ह्याच उच्च स्तरावरून ठरविल्याबद्दल मुंबईतील महाराष्ट्रीय उच्च अधिकार्यांचे अभिनंदन! दिल्लीतील हाय कमांडमध्ये त्याची योग्य दखल घेतली जाईल व त्यांची वाहवा होईल नपक्षी हायहाय झाली असती हे श्री. कुलकर्णींच्या मराठीप्रेमामुळे त्यांच्या लक्षांत येऊ नयॆ ह्याचा खेद वाटतो.
बाळ संत
प्रिय श्री० मोरेश्वर संत यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या या उपहासगर्भ पत्रातील मूळ भावना सर्वांना समजतील अशी आशा बाळगतो. नाहीतर भलतेच होऊन बसेल.
माणसाला जेव्हा कमालीची, चीड, अस्वस्थता, वैफल्य, अशा भावनांनी ग्रासले जाते तेव्हा तो उपहासाचा अवलंब करतो. आपल्या भावना आम्ही नक्कीच समजू शकतो. खाली श्री० ज्ञानेश पाटील यांच्या पत्राच्या निमित्ताने आम्हीही आपल्या भावना ’ओकल्या’ आहेत. उत्तर पाहून घ्यावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
This is a total apathy of the political parties in Maharashtra specially those trying to be saviour of the Maharashtrian people. All they need is “JODONI MARAVYA PAIJARYA”. We have gathered our marathi pride for wrong people for decades and this is the result. Our pride is used as a steam coming out of a pressure cooker and we were never given a chance of success. Should ever Shivaji come back again to fight against these odds or a Ramdas would come to highten the pride of the distressed? people.
Please remain as a whistle blower and try to let us know the injustice in this land to let us die with our language and marathi cullture.
प्रिय श्री० अनंत सावंत यांसी,
सप्रेम नमस्कार.
आम्ही आपल्या तीव्र भावना नक्कीच समजू शकतो. पण आपल्या बहुसंख्य मराठी माणसांच्या अशा भावना शासनकर्ते (व इतर राजकारणीसुद्धा) यांच्यापर्यंत पोचत नाहीत हेच मोठे दुःख आहे. राजकारण्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांशी काहीच देणे-घेणे नसते कारण त्यावर आपली खुर्ची अवंलबून आहे असे त्यांना वाटत नाही. हाच महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील एकमेव फरक आहे. आपण एकमेकात चिडून बोलतो, चरफडतो, बोटे मोडतो. पण त्यामुळे त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. आपल्या तीव्र भावना शासनापर्यंत व समाजापर्यंत पोचवण्यासाठी आपण थोडा त्रास घेऊ. जिथेजिथे मराठीचा पर्याय उपलब्ध असेल तिथे हटकून मराठीची पायमल्ली होत असते तिथे फोनवर, पत्राद्वारे निषेध व्यक्त करणे, वर्तमानपत्राला पत्र लिहिणे, औपचारिक-अनौपचारिक चर्चांमध्ये मते मांडणे, अशा प्रकारचे व इतर विविध मार्गांनी आपण आपला निषेध व्यक्त करीत राहिले पाहिजे. निवडणुकीच्या वेळी झाडा विचारण्याची आपल्याला संधी असते. तेव्हा इतर धर्म-जात, वैयक्तिक फायदे असे मुद्दे बाजुला ठेऊन मत द्यायला पाहिजे.
आपले मत आपण मुंबई पोलिसांच्या खालील दुव्यावरील संकेतस्थळावर नोंदवू शकता.
http://www.mumbaipolice.org/complaint.htm
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
I have already registered my fumming reply. But now with calm mind, I feel that as we do not retort to such moves of the government, the government does not bother.
So, to retort against we must compile and compose a Marathi song and play it at the same location of government sponsored programme but calling host from the State governments of Tamilnadu or Bengal, where their own languages are respected.
Thanks.
With regards,
Anant M. Sawant.
प्रिय श्री० अनंतराव यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या धगधगीत स्वाभिमानाने ओतप्रोत भरलेल्या दुसर्या पत्राला लिहिलेले उत्तर पहा. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर आपण सर्वांनी आपल्या तक्रारी लिहूया. संकेतस्थळावर मराठीची उपेक्षा केल्याबद्दल श्री० कुळकर्णींनी एक तक्रार नोंदवली आहे.आपणही तसे करावे व आपल्या सर्व मित्रांना तसे आवाहन करावे.
अमृतमंथनावरील ज्या वाचकांना इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही सर्व बाबतीत राज्यभाषेला प्राधान्य मिळालेच पाहिजे असे वाटत असेल त्यांनी अवश्य आपल्या भावना मुंबई पोलिसांना कळवाव्या. केवळ मनातल्या मनात किंवा आपापसातील गप्पात शासनाचा निषेध केल्यास शासनाला त्याची काहीच पर्वा वाटत नाही हे लक्षात घ्यावे.
आभार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
गीत मराठीच असावें आणि इतर भाषिक वाक्यें त्यांत असावींत. उदा. आठशे खिडक्या नऊशे दारं हे अवधूत गुप्तेचें गाणें आहे तस्सें. त्यामुळें मराठीचीहि शान राहील व राष्ट्रीयत्त्वहि जोपासलें जाईल.
प्रिय श्री० सुधीरराव यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्यापत्राबद्दल आभार.पण आपण आपल्याच राज्यात अशी तडजोड का करावी असे आपल्याला वाटते? बंगाल, आसाम, तमिळ नाडू, केरळ अशा इतर कुठल्याही राज्यात असे घडेल असे आपल्याला वाटते का? इतर राज्यात अतिरेकी हल्ले झाल्यावर त्यांनी इतर भाषांमध्ये कुठेही लेखन, वक्तव्य, कविता, असे काहीही केले का? आणि तसे त्यांनी करण्याची कोणी अपेक्षाही केली का? आपण आपला स्वाभिमान चोरटेपणाने, अपराधबुद्धीने, घाबरत-चाचरत, तडजोड करीत का व्यक्त करायचा?
मराठीभाषेतील गीतात राष्ट्रीयत्व जपले जात नाही असे आपल्याला का वाटते? घटनेप्रमाणे मराठीभाषा इतर २१ भाषांएवढीच महत्त्वाची असूनही? आपण “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा” हा लेख वाचून पहावा. त्यात सर्व घटनात्मक स्पष्टीकरणे आहेत. राष्ट्रीयत्वासाठी हिंदी व इतर भाषांच्या कुबड्या लागतात असे म्हणणे हा स्वातंत्र्यलढ्यात झटलेल्या, हौतात्म्य पत्करलेल्या अनेक मराठी देशप्रेमींचा अपमान ठरेल, हे आपण कृपया लक्षात घ्यावे.
आपण श्री० ज्ञानेश यांच्या पत्राचे उत्तर पाहिले का? त्यातील काही मुद्द्यांमध्ये आपल्या प्रतिपादनाच्या विषयाबद्दलच्या कायदेशीर व नैतिक बाजूसुद्धा चर्चिल्या आहेत. कृपया ते उत्तर पहावे. मराठी माणसाला आपली भाषा हिंदी एवढीच राष्ट्रभाषा आहे व आपल्या राज्यात ती सर्वोच्च आहे ही तत्त्वे पचायला कदाचित थोडा वेळ लागेल. पण ते एकदा (म्हणजे केव्हा?) झाले की मर्द मराठा आपल्या स्वाभिमानाचा चमत्कार सर्वांना दाखवून देईल.
’मराठीचा स्वाभिमान’ यासारख्या विषयात अवधूत गुप्तेंसारख्या निव्वळ व्यावसायिकाचा आदर्श बाळगणे आम्हाला तरी योग्य वाटत नाही.
कृपया गैरसमज करून घेऊ नये. आपल्या स्वभाषाप्रेमाबद्दल कोणालाही किंचितशीही शंका नाही. पण तशी ती आपणही बाळगू नये व मुक्तपणे, आनंदाने आपला स्वाभिमान जगभर दाखवावा, फैलावावा, ही एकच विनंती.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Namaskar,
hee phar khedachi bab aahe ki ashaa ghatana ghadta ahet, ni apan sarva Marathi
lok hhe sarvakahi badhirp, phaheje kii hhe karanarayani daha vela vichar kela phahiije itki Dahashat basel aase kahitarii karun dakhavayachi vel aali aahe.maza kadadun virodha aahe kii ,sonu nigam la konitarii personally bhetun yacha khulasa kelacha pahije.Mrs.vidya Gadgil,Pune.
‘मुंबई महानगराचे अभिमानगीत’? मुंबईच्या कुठल्या गोष्टीचा अभिमान गाणार आहे हे गीत? दहशतवादी हल्ल्याची पूर्वसुचना मिळूनही मुंबई तो टाळू शकली नाही ह्या गोष्टीचा? की अनिर्बंध स्थलांतरा मुळे शहराच्या पायाभुत सुिधांवर ताण येऊन अशा व अनेक संकटांना तोंड देण्यास शहर असमर्थ होते हे माहित असूनही मुंबईकरांनी व शासनाने आजवर काहीही ठोस पावले उचलली नाहीत ह्या गोष्टीचा? अलिकडेच झालेल्या भैय्याविरोधी आंदोलनाच्या वेळी एक मराठी विरोधी उ. भारतीय नेता जेव्हा पोलिसात तक्रार नोंदवायला गेला तेव्हा त्याला तक्रार मराठीतूनच लिहून द्यायला हवी नाहीतर तक्रार स्वीकारली जाणार नाही असे त्याला पोलिसांनी बजावले. मग आताच का मुंबई पोलिसांनी कच खावी? या हल्ल्यात मुंबई पोलिसांचा रीतसर बळी दिला गेला हे सर्वांना ठाऊक आहे. असले गीत लिहीण्यासाठी एका अमराठी माणसाला निवडण्याच्या निर्णयामागे कुठले दबाव तंत्र आहे ते प्रकाशात आणून मोडून काढलेच पाहिजे.
प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले टिपण मार्मिकच आहे. “‘मुंबई महानगराचे अभिमानगीत’? मुंबईच्या कुठल्या गोष्टीचा अभिमान गाणार आहे हे गीत?”
ही एवढी दोन वाक्ये बरेच काही बोलून जातात.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मी पोलिसांच्या संकेत स्थळावर निषेध नोंदवला आहे. परंतु अशा प्रकारे नुसता निषेध नोंदवून भागेल का?
प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्याप्रमाणे आमच्यापैकी काही मित्रांनीही आपला निषेध नोंदवला आहे. अमृतमंथनावरील आवाहनानंतर आणखी काही वाचकमित्रांनीही तसे केले असेल अशी आशा बाळगू. वर्तमानपत्रांनाही पत्रे लिहू. ते छापतील की नाही याची खातरी नसली तरीही.
विविध क्षेत्रात सामान्य माणसाला शासनाचे औदासिन्य दिसते. त्यामुळे अशी भावना मनात येतेच व म्हणूनच आपल्या देशात इतर देशांच्या मानाने सामान्य माणूस आंदोलन, चळवळ असे उपक्रम हाती घेण्याच्या बाबतीत अनुत्साही असतो.
पण आपण आपली नाराजी, चीड जर शासनापर्यंत पोचवलीच नाही तर त्यांना ती समजणारच कशी? त्यांना सर्वच आलबेल आहे व आपली प्रत्य्के कृती योग्यच आहे असे वाटते.
आजकाल माहिती अधिकाराखालीही अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो. त्यांना एक महिन्यात उत्तर द्यावेच लागते. त्याचाही आपण उपयोग करू शकतो.
हल्लीच मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य करणार असे म्हणून दुसर्या दिवशी कोलांटउडी मारली. कॉंग्रेसचे मुंबईतील बाहेरून आलेले हिंदी मतदार बिथरतील म्हणून दिल्लीहून त्या भूमिकेत बदल करण्याविषयी निरोप आला असे म्हटले जाते. पण महाराष्ट्रात तर सोडाच पण मुंबईतही मराठी भाषक हिंदी भाषकांहून अधिक असूनही मराठी भाषक भाषेच्या/संस्कृतीच्या मुद्द्यांवर बिथरणार नाहीत, त्यांना स्वाभिमानच नाही, ते अशा बाबतीत पूर्णपणे उदासीन आहेत, हे सर्वांनी गृहितच धरले आहे असाच त्याचा सरळसरळ अर्थ नव्हे काय?
असे महाराष्ट्रातच का होते? इतर राज्यांत, अगदी अशिक्षित व गरीब राज्यांत देखिल स्थानिक माणसाला एवढे गृहित धरले जात नाही, याचे कारण काय? आपण सर्वांनीच विचार करायला हवा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Saprem Namaskar,
Kshama asavi pan.. engraji aksharacha wapar karat ahe. (karan lavkar lihita yeta)
Ya purvi che sarva lekh changle hote.. ani tyaat marathi bhasha abhimaan hota pan eetar bhashecha ani eetar bhashik lokancha dvesh navta.
Pan ata atee hot ahe!!!
26/11 ha fakta maharashtra war navhe tar purna deshasathi nindadayak baab hoti.
kimaan tyaat tari marthi marathi ghusavu naka.
Marathi madhey gana nahi.. pan mag kuna marathi gayakala he suchla nahi ka?? ka mhanun policanee marathich gayak nivadayla pahije. hyatun eka drushtine eetar bhashik lokancha dwesh disun yeto. tumchyakadun ashe vaakya apekshit nahi.
jari hi ghatna mumbai madhye ghadli hoti tari purn desh halhalala hota. so plz he ati hot ahe!
ani ho.. hindi hi rashtrabhasha nahi asa nirvala kendrane dila.
pan hindi mule ek vegli olakh jagamadhye ahe. tyachach udaharan dyacha jhala tar ata Manmohan Singh US la gele tevha Obamani tyancha hindi bhashet swagat kela.. (aapka swagat hai). jagasathi hindi hi bhartachi sarvashrut bhasha ahe asa samajle jate. ani tyaat kai gair nahi.. barobar?
varil parishishtamule tumhala watel ki mala marathi bhashebaddal abhiman nahi ki kai..
me swatala matra marathi abhimani manato.. pan marathi-andh matra nishchit nahi !
Me mumbait asto.. ani nehami 1-2-3 funda vaparto.
1: Me swata hun sarvapratham nehami marathi madhye bolto. tyaas karan mhanje marathi mansacha kana sadhya rabaracha zala ahe.. pudhchi vyakti jya bhashet bolen tya bhashet bolna suru karto.. mhanun me marathi madhye bolalo ani pudhchi vyakti marathi asel tar hamkhas marathi bolte.
2: Samoril vyakti ne marathi na bolta itar bhasha vaparli tari me marathi madhye bolto (karan 1 madhye dile ahe)
3: varil 1 kivha 2 hyache anukaran kele ani tarihi jar marathi vatnarya vyaktine hindi/english bolale tari me marathi madhey bolato. ani bahutek weles te safal hote.
pan jar nantarhi hindi madhye samvad suru jhala tar hindi bolnyamadhye dekhil mala abhiman watato. karan bhasha hi ek khup mahatvachi gosht ahe ji apan bhartiyana bandhun thevte.
Me aplyala ek dolas vyakti samajto. Krupaya marathi cha atirek naka hou deu. aplyala marathi-hindi-english hyacha samtol sambhalaicha ahe.. Krupaya tumche lekhan pan samtol asu dya.
aaplach,
marathi premi
प्रिय श्री० कपिल यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार. खरं सांगायचं तर आपल्या सर्वांच्याच मतांत फार काही फरक नाहीच. थोडेफार मतांतर आहे. पण त्या सर्वच मुद्द्यांच्या बाबतीत आमची मते आम्ही विविध वाचकांच्या प्रतिमतांना उत्तरे देताना व्यक्त केली आहेत. ती कृपया पहावीत. विशेषतः श्री० ज्ञानेश यांच्या पत्राला उत्तर देताना आम्ही अनेक आनुषंगिक अतिरिक्त मुद्दे मुद्दामच लिहिले. ते सर्व वाचून घ्यावे. तरीही न पटल्यास आपण आपल्या विमताबाबत सहमती मान्य करू. (Let us agree to disagree.)
– मात्र एवढे पुन्हा नक्कीच म्हणू की:
– कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षणात कानडी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या रिट याचिकेत राज्य शासनाची बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘कोणाला आवडो अथवा न आवडो, परंतु या देशात भाषावार राज्यरचना व्यवस्थित प्रस्थापित झाली आहे. अशा भाषावार राज्यरचनेचा उद्देश असाच आहे की प्रत्येक राज्यातील लोकांची त्यांच्या राज्यातील भाषेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.’
– आपल्याला कुठल्याही परभाषेचा द्वेष करायचा नाही. इतर कुठल्याही भाषेप्रमाणेच हिंदीचा द्वेष करू नये व इतर कुठल्याही भाषेप्रमाणेच तिला डोईजड होऊ देऊ नये. आपल्याला हिंदी भाषेबद्दल विशेष राग नाहीच. पण दुर्दैवाने राजकारणी लोक हिंदीचा वापर करून आमच्या भाषेचे अधिकार हिरावून घेतात म्हणून आम्हाला हिंदीला बाजूला सारावीच लागते. इतर अहिंदी राज्यांत शेपूट घालणार्या श्रेष्ठींच्या पुढे आपले मराठी नेते शेपूट घालतात त्याला काय मनाचा मोठेपणा म्हणायचे?
– हिंदी भाषेला विरोध ही मूळ भावना आपण कधीही बाळगलेली नाही आणि कोणी बाळगूही नये. आपल्या भाषेची, तिच्या न्याय्य व नैतिक अधिकारांची, महत्त्वाची, सन्मानाची उपेक्षा करण्यासाठी जर एक साधन (tool) म्हणून दुसरी कुठलीही भाषा वापरली तर आपण त्याचा विरोध करू. तो विरोध त्या कृत्याचा असेल, कृत्यास जबाबदार व्यक्तींचा असेल, साधन म्हणून वापरलेल्या भाषेचा नाही. त्या जागी हिंदीच्या ऐवजी इंग्रजीचा किंवा इतर कुठल्याही भाषेचा वापर केला तरी त्या कृत्याचा (त्या भाषेविरुद्ध विरुद्ध मूलभूत आकस न बाळगता) विरोध करू.
– आपणाला सर्वच पटणारे आहेत हे माहित आहेच. पण सध्याच्या परिस्थितीत जराही ढील देऊ नये एवढेच आमचे म्हणणे. चुकायचे असलेच तर स्वाभिमानाच्या अतिरेकाच्या दिशेने चुकूया, औदासिन्याच्या, निरभिमानाच्या दिशेने नको. नापास व्हायची परिस्थिती आल्यावर थोडा अधिक अभ्यास झाल्यास हरकत नाही, शंभर गुण तरी निश्चित मिळतील. पण जराही कमी अभ्यासामुळे पुन्हापुन्हा नापास व्हायची जोखिम नको.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
वरील सर्व चर्चा वाचली.मराठी माणसा जागा हो,रात्र वै-याची आहे,न्यूनगंड झटक ,स्वाभिमानी हो.मुंबई परीसरात शासकीय कार्यालयात मी काम केले आहे. आणी जाणीव् पुर्वक याच अमराठी भाषकाकडून मराठीत पत्रव्यवहार करवून घेतला आहे.निश्चयाचे बळ,तुका म्हणे तेची फळ !
एक्दीड वर्षापूर्वी न्या.कोचर यानी स्पष्टपणे सांगितले होते की महाराष्ट्रातील वकील वर्ग मराठीतून बचाव करीत नाहीत,जिल्हा स्तरावरील सर्व न्याया्धीश निकाल मराठीतून लिहिण्याचे टाळत्तात ,ही त्यांची बेपर्वाई आहे.मराठीच्या उपेक्षेस हे लोक सुद्धा तितकेच जबाबदर आहेत.
त्यावेळी याविषयी वर्तमानपत्रातून/दूरदर्शन वरुन बरीच चर्चा ही झाली होती.नेमका दिनांक मला आत्ता आठवत नाही.
प्रिय श्री० सावधान यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अचूक व सुयोग्य उत्तराबद्दल अत्यंत आभारी आहोत. आपले विश्लेषण पूर्णपणे पटते.
आपल्यासारख्या अनुभवी माणसांनी इतरांना नेहमी मार्गदर्शन करावे. तरुणांच्या शक्तीला ज्येष्ठांच्या युक्तीचीही जोड मिळाली पाहिजे. तरच आपण यशस्वी होऊ.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट