अशोक ‘सिंग’ चौहानांना उत्तरेकडील सदिच्छांची गरज (ले० डॉ० श्रीपाद पांडे)

आपले मराठी-अभिमानी मित्र (ऍक्सिस बॅंकेला नमवून मराठी बोलायला लावणारे) डॉ० श्रीपाद पांडे यांनी महाराष्ट्राच्य़ा सध्याचे मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण यांच्या नांदेडमध्ये राज्यभाषेची उपेक्षा करून कसा धडधडीत अपमान केला जात आहे या बद्दल एक टिपण व सोबत पुराव्यादाखल नांदेड रेलवे स्टेशनावरील काही छायाचित्रे पाठवली आहेत, ती पहावीत.

ह्याच मुख्यमंत्री महाशयांनी मुख्यमंत्रीपद मिळताच बाहेर येऊन पहिली मुलाखत संपूर्णपणे हिंदी भाषेत देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांबद्दल आपल्याला असलेली बेपर्वाई व उत्तरेच्या दिशेने असलेली निष्ठा सिद्ध केली होती हे तर सर्व महाराष्ट्राने दूरदर्शनावर पाहिलेच होते. अशा या मुख्यमंत्र्याच्या गावात नूतनीकरणाच्या नावाखाली रेलवे प्रशासनाने नांदेड स्टेशनात मराठीचे संपूर्णपणे दफनच केले यात आश्चर्य ते काय?

डॉ० श्रीपाद पांडेंचे टिपण खालील दुव्यावर पहावे.

अमृतमंथन-अशोक सिंग चौहानांना उत्तरेकडील सदिच्छांची गरज आहे_191209

.

डॉ० श्रीपाद पांडेंनी ऍक्सिस बॅंकेला शिकवलेल्या मराठीच्या धड्याच्या माहितीसाठी याच अनुदिनीवरील ’०३.३ बित्तंबातमी’ या प्रवर्गातील ’मराठीसाठी अशीही लढाई’ हे वृत्त पहावे.

आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा.

– अमृतयात्री गट

.

16 thoughts on “अशोक ‘सिंग’ चौहानांना उत्तरेकडील सदिच्छांची गरज (ले० डॉ० श्रीपाद पांडे)

  1. Ashok Chavan is not any different from other Congress or Nationalist Congress leaders. He wants to get as many votes of Hindi speaking migrants as possible. As regards votes of Marathi people, his ‘chamchas’ arrange that by hook or crook. Moreover, being the residednts of the erstwhile Hyderabad State, these Chavans or Chauhans have love for Hindi and Urdu more than Marathi.

    • प्रिय श्री यशवंत कर्णिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार. अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील उच्चपदस्थ राजकारण्यांचे एक प्रातिनिधिक रूप आहे. थोड्याफार फरकाने जवळजवळ प्रत्येक मराठी राजकारणी तसाच स्वार्थी, निरभिमानी, जनतेच्या भावनांबद्दल अनास्था असणारा, सत्ता व पैसा यापुढे इतर कसलेही तत्त्व न मानणारा असाच आहे. इतर राज्यांत निदान भाषा आणि संस्कृतीच्या बाबतीत तरी सामान्य जनतेचा राजकारण्यांवर वचक असतो. तो महाराष्ट्रात नाही. हाच महाराष्ट्र व इतर राज्ये यांच्यातील सर्वात मोठा फरक आहे. आपण मराठीप्रेमी, स्वाभिमानी माणसे जर मराठीसाठी एकत्र येऊ शकलो तरच ह्यात काही बदल घडवू शकू. अन्यथा हे सर्व केवळ अरण्यरुदनच ठरेल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. It is ironical that a cm of the maharashtra state speaks in hind/english in maharstra while on official public visits. I think best solution is boycott his speeches till he speaks in his mothertounge, marathi.
    The nanded railway station is such an example where blatantly marathi language is bypassed.
    I along with the people of maharashtra object to this behaviour.
    ddpanse

    • प्रिय श्री डी० डी० पानसे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

      श्री० यशवंत कर्णिकांच्या पत्राला दिलेले उत्तर पहावे. आपण सामान्यजन तेवढ्या एका मार्गानेच ही परिस्थिती बदलू शकू. भाषणांवर बहिष्कार हा एक मार्ग आहेच. पण हल्ली खुल्या पटांगणात भाषणे न होता ती दूरदर्शनवरच पाहिली जातात. अर्थात आपली मोठ्या प्रमाणात एकजूट झाली तर आपण परिस्थितीप्रमाणे योग्य उपाय योजू शकू. मराठी एकजूट – हा एकमेव अमोघ उपाय आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. अशा बऱ्याच जागा आजही आहेत.. पण ही बातमी मात्र खरंच विचारकरण्यासारखी आहे. महाराष्ट्रात मराठीचे वाभाडे, आणि ते पण् मुख्यमंत्र्याच्या गावात.. … दुर्दैव.. अजुन काय!!!!
    व्होडाफोनची मनमर्जी अजुनही सुरु आहेच.. एफ एम रेडीओ अजुनही हिंदी बोलतात.. आपण रहातो कुठे हाच प्रश्न पडतो- महाराष्ट्र की बिहाराष्ट्र??

    • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

      श्री० यशवंत कर्णिक आणि श्री० डी० डी० पानसे यांच्या पत्रांना दिलेली उत्तरे पहावीत. आपण सामान्यजन मोठ्या प्रमाणात एकजूट करून तेवढ्या एका मार्गानेच ही परिस्थिती बदलू शकू. मराठी एकजूट – हा एकमेव अमोघ उपाय आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० श्रीहरी गोडबोले यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

      राजकारण्यांना वहाण दाखवण्याची संधी आपल्याला पाच वर्षांतून एकदा मिळते. पण तिथेही चांगला प्रतिनिधी निवडण्यापेक्षासुद्धा त्यातल्या-त्यात कोण कमी हलकट वाटतो त्याची निवड करण्याचा तो प्रकार वाटतो. अगदी अपराधी मंडळीही निवडणुकीला उभे राहून आपले नेतृत्व करू शकतात. मग सामान्य माणसाला निवडणुकीच्या तमाशाबद्दल अनास्था वाटली तर त्यात काय आश्चर्य?

      रेलवे स्थानकांवरील असे चित्र हे नियमाला अपवाद नसल्यामुळे; किंबहुना महाराष्ट्रात तोच नियम असल्यामुळे त्या एका अधिकार्‍याबद्दल तक्रार करून काही घडेल असे वाटत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निषेधात्मक कृती व्हायला हवी. आपण सामान्यजन मोठ्या प्रमाणात एकजूट करून तेवढ्या एका मार्गानेच ही परिस्थिती बदलू शकू. मराठी एकजूट – हा एकमेव अमोघ उपाय आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० दी० दी० (दीपक दीनानाथ?) पानसे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल आभार. आम्हाला आपले तत्त्व १०० टक्के योग्य वाटते. “माझी यंगर डॉटर मराठी वर्डस लर्न करायला व्हेरी डिफिकल्ट फाईंड करते” अशा प्रकारचे मराठी (ह्याला आपण मराठी म्हणू शकतो का?) बोलण्यात भूषण मानतात. पण ते आपण चालचून घेतो एवढेच नाही तर अशा प्रकारचे मराठी बोलाणार्‍या दूरदर्शन वाहिन्यांवरील सूत्रधारांना मराठी प्रेक्षक (चुकीचा हिंदी शब्द दर्शक) डोक्यावर घेतात.

      म्हणूनच “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट” या श्री० सलील कुळकर्णी याच्या लेखात मराठीसंबंधित समस्यांचे पहिले दोन मुद्दे याच मूलभूत तत्त्वाशी निगडित आहेत. कृपया तो लेख वाचावा व आपण मराठी एकजुटीसाठी सहकुटुंब-सहपरिवार नोंदणी करावी, ही नम्र विनंती.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. Whether Mr. Ashok Chavan was contacted on this issue? What was his reaction or response?
    Is there any reaction from regional political parties?
    What Railway Board and Railway ministry have to say about this?
    Can President of India do anything?
    Is there any possibility of charging a case in court?

    • प्रिय श्री० उदय वैद्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार.

      जनतेच्या जिव्हाळ्याच्या, भावनांशी निगडित असलेल्या स्वभाषा आणि स्वसंस्कृतीविषयक प्रश्नांच्या बाबतीत इतर राज्यांत शासन दक्ष असते. प्रत्येक लहानसहान गोष्ट शासनाच्या लक्षात आणून द्यावी लागत नाही. शिवाय इतर राज्यांत शासन दक्ष आहे हे माहित असल्यामुळे रेलवे व इतर संस्थासुद्धा अशा संवेदनशील मुद्द्यांच्या बाबतीत काळजी घेतात. पण महाराष्ट्रात शासनही दक्ष नाही व आपण सामान्य माणसेसुद्धा फार मोठ्या प्रमाणात असंतोषाच्या प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. त्यामुळे कोणालाही महाराष्ट्रीयांच्या भावनांबग्गल फिकीर नसते.

      प्रस्तुत प्रकरणात आमच्या एका मराठीप्रेमी मित्राने सुमारे आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ई-मेल पत्त्यावर माहिती पाठवली आहे. पण अजुन तरी त्यास अनुकूल प्रतिसाद मिळालेला नाही.

      आपण ’हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!’ हा लेख वाचलात का? त्यात स्पष्ट केल्याप्रमाणे कायद्यानुसार कुठल्याही राज्यात तेथील स्थानिक भाषा सर्वश्रेष्ठच आहे. पण त्यासाठी माहिती अधिकार किंवा न्यायालयाचे दरवाजे ठोठवायला पाहिजेत. आम्ही टपाल खात्याविरुद्ध गेले काही महिने माहिती अधिकाराखाली आवएदन, अपील इत्यादी प्रक्र्या करीत आहोत. पण महाराष्ट्रात ही मंडळी पूर्णपणे बेदरकार असतात. आपल्याला नुसते खेळवतात व आपली दमछाक होण्याची वाट पहातात. त्यांच्यावर राज्यशासन किंवा केंद्र सरकारचा बडगा उगारला जात नसल्याने किंवा लोकक्षोभाचीही फारशी चिंता नसल्यामुळे हा मुजोरपणा !! म्हणूनच मोठ्या प्रमाणात मराठी एकजूट साधून आपण शासन व इतरांवर दबाव आणायला पाहिजे. त्यासाठी आपल्या विचारमंथनातूनच आपण काही कृतियोजना ठरवू.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. I am ashamed of our bhaiyya cm always speaking in hindi as if he is not a marathi manoos and originated and belong to staunch hindi bhashak. i think he has forgotten that he has marathi as his mother tounge. We always find that other ministers from maharashtra also copy him in such a poor hindi that i switch off the tv! I think the best to do is, marathi media patrakar should walk out when he starts speaking hindi when giving the interview.
    ddpanse

    • प्रिय श्री० डी० डी० पानसे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार. हल्लीच शरद पवार व विलासराव देशमुख ह्या दोघांनीही आपल्या उत्तरभारतभेटीमध्ये दोन स्वतंत्र सभांमध्ये हिंदी हीच भारताची राष्ट्रभाषा आहे व ती नाकारणारे विघटनवादी, देशद्रोही असे ठासून सांगितले. अर्थात अशी ही विधाने ही मंडळी बंगाल, तमिळनाडू अशा इतर स्वाभिमानी अहिंदी राज्यांत करीत नाहीत.

      मराठी पत्रकारांना (वृत्तपत्रांमधील व चित्रवाणीवरील) सुद्धा थोडे अपवाद वगळता फार काही मराठीचा कळवळा आहे असेही वाटत नाही. वृत्तपत्रातील लेख, पुरवण्या, चित्रवाणी वाहिन्यांवरील मराठी कार्यक्रमातील मराठीचा दर्जा इ० पाहिले तर त्याबाबतीतही फार आशादायी चित्र दिसत नाही. आपण सामान्य जनतेने इतर राज्यांप्रमाणे ह्या सर्वांवर दबाव आणायला पाहिजे.

      सप्रेम नमस्कार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. nanded chi chitran pahilee. bahutek Nagpur la te aale naaheet. AAle asteel tar camera javaL nasel. Kimva Nagpur la maharashtraat dharat naahit (aataapaasoonach?)
    RaajkaarNaatle karaN, sarkarche dhoraN, traaslelya shetkaryanche maraN, gareeb bhoLyanche daLaN, vaadhate nakshalprakaraN,
    ekuN magaaslepaN, junya prantache aathavaN, maraathiche durlaksheekaraN hey ithlya marathinche maharaashtra paasoon vegaLepaN.

    • प्रिय श्री० भास्करभट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      डॉ० पांडे आंध्र प्रदेशातील करीमनगर येथे राहतात. तरीही महाराष्ट्रासाठी बरेच करीत असतात. त्यांना सर्व महाराष्ट्रात प्चणे शक्य नाही हे तर खरेच आहे. पण तसं म्हटलं तर आम्ही महाराष्ट्रातील मंडळी, विशेषतः मुंबई-पुण्यातील स्वतःला सुशिक्षित म्हणवणारी मंडळी, अर्वरित महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबबत कितपत जागरूक आहोत? मुंबईत बसून विदर्भातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दलचे अंदाज बर्‍याच वेळा चुखीच्या समजावर आधारित असतात.

      (उत्तरास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व.)

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s