कुठल्याही एका भाषेतून दुसर्या भाषेत अनुवाद करायचा म्हणजे केवळ शब्दकोशाप्रमाणे शब्दाला शब्द योजून उपयोगी नाही. अर्थानुवाद, किंवा त्याही पुढे जाऊन भावानुवाद, उत्तम रीतिने जमण्यासाठी दोन्ही भाषांतील शब्दांच्या विविध अर्थच्छटा व त्यांच्या खाचाखोचा यांची चांगली जाण पाहिजे आणि त्या दोन्ही भाषांवर प्रभुत्व तर असायलाच पाहिजे परंतु दोन्ही भाषांमागील संस्कृती व परंपरांचेही उत्तम ज्ञान असायला हवे.
अशा या सर्वगुणांनी संपन्न अशा मराठीतील महाकवी ग० दि० माडगुळकर उर्फ गदिमा यांनी केलेला संस्कृतमधील श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा सविस्तर मराठी भावानुवाद आणि तो देखिल पद्यात, खालील दुव्यावर सापडेल.
अमृतमंथन- श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा गदिमाकृत अनुवाद_111209
.
कृपया आपले प्रतिमत लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. आभारी आहोत.
– अमृतयात्री
अतिशय सुंदर
प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे यांसी,
सप्रेम नमस्कार.
अत्यंत आभारी आहोत.
आपण हा अनुवाद मनापासून संपूर्ण वाचलात हेच आश्चर्य. अशा लेखांना फारशा प्रतिक्रिया मिळत नाहीत. संस्कृत व मराठी अशा दोन्ही भाषांबद्दल आपल्याला प्रेम असावे व दोन्ही भाषांतील अभिजात साहित्याची आवड दिसते आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
आपले शतशः आभार! मी सुमारे २/३ वर्षांपूर्वी या अनुवादाविषयी एक लेख वाचला होता(केवळ उल्लेख, प्रत्यक्ष अनुवाद नव्हता!,तेव्हापासून मी त्याच्या शोधात होतो. अखेर आज मला तो येथे मिळाला. आभारी आहे !!!!!
प्रिय श्री० जयेंद्र जोशी यांसी,
सप्रेम नमस्कार.
उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.
आमचेही काहीसे आपल्यासारखेच झाले. दीर्घ काळापासून आम्ही या यथामूल अनुवादाच्या शोधात होतो. शेवटी चौल या गावात वास्तव्य करणार्या प्रा० मा० ना आचार्य या संस्कृत विद्वानाशी संपर्क झाला आणि त्यांच्याकडून हा अनुवाद मुद्दाम लिहून घेतला.
आपण खालील लेख वाचले आहेत का? वाचून पहा. आवडतील.
पुस्तक परीक्षण – ‘ध्वनितांचें केणें’ (ले० मा० ना० आचार्य) –} http://wp.me/pzBjo-dn
श्रीगणपति-अथर्वशीर्षाचा गदिमाकृत पद्यानुवाद –} http://wp.me/pzBjo-6P
भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions) –} http://wp.me/pzBjo-mz
मातृभाषेसंबंधीचे लेखही पहावेत. इतर लेखांवरूनही नजर फिरवावी.
अमृतमंथनाशी नेहमी संपर्कात रहावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट