मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी (वृत्त आणि आवाहन)

कौशल इनामदार या तरुण व उभरत्या अशा आपल्या संगीतकार-मित्राने आपल्या मराठी भाषेला एक अभिमानगीत देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी त्याने मराठीतील श्रेष्ठ कवी सुरेश भटांची ’लाभले अम्हांस भाग्य’ ही अत्युत्तम, मराठी माणसाच्या स्वभाषा व स्वसंस्कृती बद्दलच्या भावना अचूकपणे मांडणारी, आपल्या सर्वांची आवडती व वाचताना आपल्याला मराठीच्या अभिमानाने बेभान करणारी कविता त्यांनी निवडली आहे. या कवितेला उत्तम संगीताचा साज लेववून तिला मराठी अभिमानगीत म्हणून जगापुढे सादर करण्याचा कौशलचा मनोदय आहे.

हा प्रकल्प म्हणजे मराठी माणसांचे औदासिन्य व मरगळ झटकून टाकण्यासाठी स्वभाषा व स्वसंस्कृतीबद्दल वाटणार्‍या स्वाभिमानाचे एक इंजेक्शन ठरावे. मराठीला ह्या उपक्रमाला आपल्यापैकी प्रत्येकाने हातभार लावावाच; शिवाय आपल्या ओळखीच्या जास्तीतजास्त मराठीप्रेमी मित्रबांधवांपर्यंत हा संदेश पोचविण्याचा प्रयत्न करावा.

अशा या मराठीच्या अभिमानगीताच्या उपक्रमासंबंधी सविस्तर वृत्त खालील दुव्यांवर वाचा.

अमृतमंथन-मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती-लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी_101209

दै०प्रहार-मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती-लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी_101209

.

कुठल्याही प्रकारची अधिक माहिती हवी असल्यास amrutyatri@gmail.com या पत्त्यावर निःसंकोचपणे लिहा.

आपल्या भावना व मते या लेखाखालील रकान्यात अवश्य नमूद करावीत. आम्हाला उत्तर न देता येण्यासारखी काही महत्त्वाची, विशेष शंका असेल तर तिचे उत्तर आपण स्वतः कौशल इनामदारांकडून आपण घेऊ.

– अमृतयात्री

3 thoughts on “मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी (वृत्त आणि आवाहन)

    • प्रिय श्री० भाऊ जोगळेकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अधिक माहितीसाठी आपण श्री० मंदार गोगटे यांच्याशी ९८२०८ ७७२७९ या चलध्वनीवर संपर्क साधावा.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. […] माहिती याच अमृतमंथन अनुदिनीवरील “मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – ला…” या लेखात वाचायला […]

आपला अभिप्राय इथे नोंदवा.