अबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध किराणा घराण्याचे संवर्धक-प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या महाराष्ट्र व मराठी संस्कृतीला दिलेल्या योगदानाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला अबू आझमीला देण्यासाठी श्री० जावेद नकवी ह्या पाकिस्तानातील डॉन या अग्रगण्य दैनिकाचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक ह्यांनी लिहिलेला हा इंग्रजी लेख.

जरी श्री० नकवी यांची काही राजकीय मते आपल्याला कदाचित पटणार नाहीत; पण तरीही त्यांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संपन्नता आणि प्रगल्भतेबद्दलची जाण आणि आदरभावना ह्या गोष्टी आश्चर्यचकित करतात आणि अटकेपार झेंडे रोवलेल्या मराठ्यांच्या कीर्तीचे पडघम अजुनही दूरपर्यंत वाजताहेत हे समजल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.

ज्या उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांचे उदाहरण लेखकाने अबु आझमीला घालून दिले आहे ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक मूळचे उत्तर प्रदेशातील किराणा ह्या ठिकाणचे रहिवासी. त्यांच्या गायन कलेच्या प्रसिद्धीमुळे ते प्रथम बडोदे संस्थानाला आले आणि नंतर ते मुंबई, पुणे इथे व शेवटी मिरजेस वास्तव्याला होते. त्यांची द्वितीय पत्नी ताराबाई माने ही बडोदे संस्थानातील सरदार मारुतीराव माने यांची कन्या. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे गुरू पंडित सवाई गंधर्व, सुरश्री केसरबाई केरकर, रोशन आरा बेगम, तसेच त्यांची स्वतःची अपत्ये सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे ही त्यांच्या अत्यंत कीर्तिवंत शिष्यांपैकी होत. करीम खान साहेब हे भाषा, कला, संस्कृती अशा सर्वच दृष्टीने महाराष्ट्राशी एकरूप झाले व आपल्या कलेने महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीमध्ये मौलिक भर घातली. याच करीम खानांचा कित्ता गिरवण्याचा सल्ला श्री० जावेद नकवी यांनी अबु आझमीला दिलेला आहे. केवळ काही दशकांपूर्वी उत्तर प्रदेशाहून रिकाम्या हाताने आलेल्या या कला आणि विद्याविहीन अबू आझमीने हल्लीच निवडणूकीच्या वेळी अधिकृतपणे दीडशे कोटीची संपत्ती घोषित केली होती. त्यानंतर पोटापाण्याच्या उद्योगामुळे मराठी शिकणे राहून गेले असे म्हणणार्‍या आणि दुबईसारख्या ठिकाणी अंमली पदार्थाच्या संबंधात पकडल्या गेलेल्या आपल्या पराक्रमी चिरंजीवास पैसा आणि राजकीय संबंधांच्या बळावर सोडवून आणणार्‍या या माणसाची करीम खान साहेबांच्या पायाशीही बसण्याची लायकी नाही ही गोष्ट तर कोणीही मान्य करील.

श्री० नकवी यांचा पूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावयास मिळेल.

अमृतमंथन-अबू आझमीने उस्ताद करीम खानांचा कित्ता गिरवावा_जावेद नकवी_दै० डॉन_191109

आपले मराठीप्रेमी मित्र डॉ० श्रीपाद पांडे तसेच श्री० सौरभ देशमुख ह्या दोघांनी ह्या लेखाचा दुवा पाठवला आहे.

.

प्रस्तुत लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा.

– अमृतयात्री गट

13 thoughts on “अबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)

  • प्रिय श्री० महेश यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   पाकिस्तानी पत्रकारासही मराठी भाषेची व संस्कृतीची जेवढी जाण आहे तेवढी दिल्लीश्वरांपुढे उठाबशा काढणार्‍या मराठी राजकारण्यांना नसेल हा ह्यातील सर्वात सुरस (interesting) मुद्दा आम्हाला वाटतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • प्रिय प्रदीप मोरे,

    सप्रेम नमस्कार.

    अत्यंत आभारी आहोत. असाच लोभ असू द्या.

    आपल्याला आवडलेले लेख जास्तीतजास्त मराठीप्रेमी मित्रमंडळींपर्यंत पोचवावेत. स्वाभिमानाचा वणवा सर्वकडे पसरवून मराठी माणसाची एकजूट बांधून अन्यायाविरुद्ध एकत्रपणे आवाज उठवू.

    क०लो०अ०

    – अमृतयात्री

  • प्रिय अपर्णा लालिंगेकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   जी गोष्ट परदेशी, तेसुद्धा पाकिस्तानी, जाणू शकतात; ती आपलेच, आपणच निवडून दिलेले आमदार, खासदार, मंत्री, संत्री जाणू शकत नाहीत, किंबहुना त्यांच्या गळी उतरवण्यास आपण अक्षम ठरतो. मराठी माणसाने एकजुटीने त्यांना वठणीवर आणायला हवे.

   आपल्याला आवडलेला प्रस्तुत लेख आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना, मराठी व अमराठीसुद्धा, अग्रेषित करावा. मराठी माणसाच्या स्वाभिमानाला उत्तेजन देणारे ते कार्य ठरेल.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. पाकिस्तानी पत्रकारांना आपल्या बद्दल किति माहिति आहे. आणि ते आपल्या इथे घडाणार्‍या प्रसंगा बद्दल लिहितात. लेख वाचनीय आहे.

  • प्रिय श्री० किशोर दीक्षित यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले म्हणणे खरेच आहे. पाकिस्तानी विद्वानांनासुद्धा पूर्वीच्या हिंदुस्थाना बद्दल बरीच माहिती असते आणि तशी अधिकाधिक माहिती मिळवण्याची त्याम्ना इच्छाही असते. कारण पाकिस्तानातील संस्कृतीचा इतिहास हा त्यांनी उर्दू भाषा व मुघल संस्कृती एवढाच मर्यादित ठेवला तर पाचशे वर्षांच्या मागे त्यांना जाताच येणार नाही. अमेरिकेसारखीच ती शोकांतिका ठरेल. हिंदुस्थानाला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे तेही जाणतात. पाकिस्तानात इतिहास संशोधनासाठी आजही संस्कृतचा अभ्यास होतो. इतर कुठल्याही भाषक गटापेक्षा मराठ्यांनीच इंग्रज व विविध मुसलमान राजवटींना प्रखर सशस्त्र विरोध केला. अटकेपार जाण्यासाठी मराठे पाकिस्तानपार गेले होते. हे सर्व तेही स्वतः जाणतातच. मराठ्यांच्या इतिहासाबद्दल संपूर्ण भारतीय उपखंडात आदर बाळगला जातो. पण एवढे असूनही आपणाला स्वतःला आणि आपल्या @#% राजकारण्यांना स्वतःबद्दल अत्यंत न्यूनगंडच वाटतो. आणि त्या न्यूनगंडाच्या भावनेमुळेच आज सर्वत्र आपली उपेक्षा होते आहे.

   मराठा एकजुटीने पेटून उठला तर आपण खूप काही करू शकतो. त्यासाठी बेकीचा शाप प्रथम संपवला पाहिजे आणि एकीने सर्व क्षेत्रात आपल्या हितशत्रूंशी लढा द्यायला पाहिजेत.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० किरण खेडेकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   “प्रत्यक्षात कृती व्हायला हवी” हे आपले म्हणणे पूर्णपणे अचूकच आहे. पण कृती ही नीट विचार करून व्हावी. कृती करण्याआधी मराठी माणसाने एकजूट करून, व्यूहनीती आखून, मोजक्या व कुठल्या लक्ष्यांवर हल्ले करायचे ते ठरवून मगच थेट कृती करावी. चर्चेचा अर्थ हा एवढाच. चर्चा ही कृतीला पर्याय ठरणार नाही हे खरेच. पण फोडा आणि झोडा अशा डावपेच आखणारे ह्या शासनकर्त्यांना आपण पुरून (अक्षरशः जमिनीखाली पुरून) उरायला पाहिजे.

   प्रथम लहान गोष्टींनी सुरुवात करून मग मोठी आव्हाने स्वीकारणे हे योग्यच आहे.शिवाजी महाराजांनीसुद्धा प्रथम तोरण्याने सुरुवात केली, कोंडाणा, राजगड अशा मोठ्या किल्ल्यांनी नव्हे.

   गंगा नदीसुद्धा उगमाजवळ एखाद्या ओहोळाप्रमाणे असते, पुढे तिचा महाकाय नद बनतो.

   उशीरा सुचलेल्या शहाणपणाबद्दल म्हणाल तर आपण याच अनुदिनीवरील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख वाचावा. आपल्याहून वाईट परिस्थितीतून अभिमानाने व जिद्दीने त्यांनी इंग्रजीला बाहेर काढली व मगच तिची भरभराट होऊ शकली.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० संदीप सबनीस यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   श्री० किशोर दीक्षित यांचेही मत आपल्यासारखेच आहे. कृपया त्यांच्या पत्राला लिहिलेले उत्तर पहावे.

   शेवटी आपल्या सर्वांची मते बरीचशी सारखीच आहेत. मात्र आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. Someone please tell me how to reply in Marathi.

  In the meantime please accept these comments.

  There is a widespread misconception that Muslims served Indian classical music more than Hindus. The fact is that during Moghul rule the Hindu Singer Pundits who were serving the earlier Hindu Rulers were told that if they expected Royal patronage they had to get converted to Islam in return. They had no choice . There were a few exceptions like Swami Haridas who preferred to live in poverty instead. A large majority accepted Islam , some secretly continued worshiping Hindu deties.

  The situation is similar to many Pundits who are singing praise of English language !

  Vishvas Deshmukh.

  • प्रिय श्री० विश्वास देशमुख यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   मराठीत लिहिण्यासाठी आपण जी-मेलवर मराठी हा पर्याय निवडून तिथे उपलब्ध असलेली लिप्यंतराची (transliteration) सुविधा वापरू शकता. अधिक चांगले म्हणजे थेट मराठीतच टंकलेखन करणे. त्यासाठी आपण याच अनुदिनीवरील खालील दुवा वापरावा.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/

   आपण फार विपुल प्रमाणात लेखन करणार नसाल तर बराहा अन्यथा इन्स्क्रिप्ट पद्धत वापरावी. अर्थात कुठल्याही पद्धतीने लिहिण्यास थोडा प्रयत्न, धीर हे सर्व पाहिजेच. लहानपणी आपण प्रथम पेन्सिलीने लिहिणे शिकतो त्या मानाने हे सर्व बरेच सोपे आहे.

   स्वामी हरिदासांचे पट्टशिष्य तानसेन हे सुद्धा आपण सांगितल्याप्रमाणेच मुसलमान झाले. मगच त्यांचा समावेश अकबराच्या नवरत्नात झाला असावा.

   आपले निरीक्षण योग्यच आहे. आपलेही उच्चभ्रू अशाच प्रकारे बडेजावाच्या खोट्या कल्पनेने भाषा व संस्कृती बदलून पाश्चात्य (इंग्रज) झाले की मग इतरांना वाटू लागते की इंग्रजी शिवाय या जगात ज्ञान अशक्यच आहे.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s