अमृतमंथन

Icon

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…

महाराष्ट्र शासनाचे गुजराथीला १ कोटी आणि मराठीला २५ लाख? (वृत्त: दै० महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, दि० ३ डिसें० २००९)

दिनांक ३ डिसेंबर २००९च्या महाराष्ट्र टाईम्समधील बातमीवरून असे कळते की नेहमीच ’माय मरो आणि मावशी जगो’ असे धोरण पाळणारे आपले महाराष्ट्र राज्यशासन मराठी साहित्य सम्मेलनास २५ लाखाचे अनुदान देत असे; पण गुजरात साहित्य अकादमीस मात्र ३५ लाख देत असे. आणि आता आयजीच्या जिवावर बायजी उदार होऊन गु०सा०अ०ची अनुदानाची रक्कम वाढवून तिला तब्बल १ कोटीचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. याला काय म्हणावे? शब्दच सुचत नाहीत. %@&#%#**…. !!!

गायकवाडांच्या बडोदे संस्थानात तर मराठी भाषा तर अत्यंत डौलाने मिरवत होती. आजही गुजराथेत मराठी माणसे मोठ्या प्रमाणात आहेत आणि मराठी भाषाविषयक आणि संस्कृतीविषयक अनेक संस्था आहेत. अशा या गुजराथ राज्यात तेथील राज्यशासन मराठी संस्थांना किती अनुदान देते? विशेषतः स्वतःच्या राज्यभाषेपेक्षा कितीतरी अधिक अनुदान मराठीला देते काय? हे शोधून पाहणे फार सुरस आणि रंजक ठरावे.

म०टा०मधील संबंधित बातमी खालील दुव्यावर पाहू शकता.

अमृतमंथन-गुजराथीला १ कोटी आणि मराठीला २५ लाख_महाराष्ट्र टाईम्स_031209

या वृत्ताच्या अनुषंगाने खालील प्रश्न मनात येतात.

१. गुजरात राज्यशासन व गुजरात आणि महाराष्ट्रातील गुजराती उद्योगपती व इतर श्रीमंत माणसांनी मदत करण्याच्या ऐवजी मराठी शाळांतील शिक्षकांच्या पगारांसाठीदेखिल गेल्या काही वर्षांचे अनुदान देण्यास पैसे नसलेल्या गरीब महाराष्ट्र शासनाने गु०सा०अ० ला एवढी मदत देणे कितपत योग्य आहे?

२. गु०सा०अ० ला अनुदान द्यायचेच असेल तर त्याच प्रमाणात आपली अधिक जवळची भाषाभगिनी असलेल्या कानडीला का नको?

३. या दोघांना अनुदान द्यायचेच असेल तर त्यांच्या कमीत कमी पाचपट अनुदान मराठी साहित्य संमेलन व इतर मराठी भाषाविषयक संस्थांना मिळाले पाहिजे. स्वतःच्या घरच्या कुटुंबियांना उपाशी ठेऊन पाहुण्याचा आदरसत्कार-पाहुणचार करणे पूर्णतः अनुचित आहे.

आपल्याला काय वाटते?

ही बातमी आपले मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० प्रसाद परांजपे यांनी अग्रेषित केली आहे.

.

आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट


About these ads

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक, ०४.१ सविस्तर वृत्त, , , , , , , , , , , , , , , , ,

38 Responses

 1. आपल लेख वाचला.मला वाटते मराठीला सरकार नाकारत असेल, तर आपनच प्रयत्न करुन तिला वाढवावे. आपले अन्यायाविरोधी लेख असेच सुरु ठेवावे. त्याकरिता शुभेच्या.

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० अक्षय सावध यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   शासन खर्च करते तो जनतेचा पैसा असतो, राजकारण्यांचा स्वतःचा नव्हे. राज्यातील जनतेचा पैसा मुख्यतः राज्यातील जनतेच्या हितासाठी खर्च व्हायला पाहिजे. स्वतःच्या घरच्या मुलाच्या पोटाला पुरेसे खाऊ घालण्याची ऐपत नसणार्‍यांनी दानधर्म व परोपकार करून शेजार्‍याच्या मुलाची जबाबदारी घेऊ नये.

   शासन आपण दिलेल्या करातून जमलेला पैसा जर योग्य पद्धतीने खर्च करीत नसेल तर त्यांना तसे करायला लावले पाहिजे. कराचा पैसा शासनाने फुकट घालवला म्हणून आणखी किती पैसा आपण जमवणार?

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

 2. Sant Moreshwar says:

  I wish to know if there is any state govt. other that that of Maharashtra which gives any donation to Marathi Sahitya Sammelan. If yes, what is the amount?
  This question is aimed at knowing who in the Maharashtra Govt. got this wonderful idea of donating to a language which is not commonly used in Maharashtra?
  Or, is there any evidence that Gujarati is today more commonly used in Maharashtra than Marathi?

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० मोरेश्वर संत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले मत मांडल्याबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   स्वतःच्या पोरास दोन वेळ पोटाला खाऊ न घालू शकण्याएवढी हलाखीची परिस्थिती असणार्‍यांनी शेजार्‍याच्या पोराला मेजवानी देण्याचा प्रयत्न करू नये. गुजराथीला मदत करण्याआधी तेवढीच कानडीला करावी कारण तीसुद्धा मराठीची भाषा भगिनी आहे आणि आर्थिक दृष्ट्या गुजराथीहून गरीब आहे. या दोघांनाही मदत केल्यास त्यांच्या काहीपट मदत मराठीला करायला हवी. पण शासनकर्ते हे स्वतःला आपल्या मर्जीचे मालक व जनतेला आपले नोकर समजतात ह्याचीच चीड येते.

   गुजराथी भाषक मुंबईत मराठ्यांच्या एक पंचमांशही नसतील व उर्वरित महाराष्ट्रात नगण्य. जे पूर्वीपासून राहतात व इथल्या भाषेशी व संस्कृतीशी सामावून गेले आहेत ते आमचे मराठी बंधूच आहेत. त्यांना आपण परके किंवा गुजराथी म्हणूच शकत नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. पहिली गोष्ट साहित्य सम्मेलनाचा हा सरकारी तमाशा पुर्ण बंद केला पाहिजे. काहीही फायदा होत नाही या सम्मेलनाचा. आणि मराठी साहित्य सम्मेलनाचे कर्ते करविते ते कवतिक राव ढोले पाटील..त्या माणसाचं बोलण,वागणं , स्टेटमेंट्स पाहिले की संताप येतो. असे साहित्याशी अर्था अर्थी संबंध नसलेले लोकं जेंव्हा साहित्य सम्मेलनाचे शरद पवार होतात तेंव्हा त्यातुन काय निष्पन्न निघणार?
  साहित्य सम्मेलनात तर हे स्वघोषित साहित्यिक एक्मेकांची उणीदूणी काढत आमची करमणूक करतात, म्हणुन काय त्यांना सरकारने करमणुक कर.. की
  बाबा, तुम्ही लोकांची करमणूक केली म्हणुन तुम्हाला २५ लाख — दिले असं आहे कां?

  गुजराथ्यांना काय कमी आहे? इकडे स्वतःची धुवायला पाणि नाही, आणि चालले बागायती करायला…

  महाराष्ट्रामधे विदर्भातला शेतकरी अजुनही मरतो आहे. अरे माकडांनो, असे पैसे खर्च करण्यापेक्षा जर ते काही नविन स्ट्रॅटेजी आखुन काही काम केलं तर काही शेतकऱ्यांचे प्राण वाचतिल नां…अरे कशाला इतके पैसे द्यायचे? . माझं तर मत आहे साहित्य सम्मेलनं बंद करुन टाकावी आता . अती होतंय हे सगळं..

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० महेंद्र यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   आपल्या भावना व चीड समजू शकतो. परंतु कौतिकरावांसारखी मंडळी आहेत म्हणून ती संस्थाच बंद करायला निघालो तर आज त्याच्याही आधी इतर अनेक संस्था बंद कराव्या लागतील. आणि शासन, पोलिस, विधानसभा यांचे काय? अनेक भ्रष्ट विभागातील अधिकार्‍यांचे काय? सर्वच बंद करून समाज काही-शे वर्षांनी मागे न्यावा लागेल.

   शासनाला व राजकारण्यांना मरणार्‍या शेतकर्‍यांच्या, नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा होणार्‍या पोलिसांच्या व नागरिकांच्या जिवाची काय किंमत? साहित्य संमेलनाचे २५ लाख वाचवून त्यात काहीच फरक पडणार नाही. तमिळनाडू शासनाने तमिळ भाषेसाठी ३०० कोटीची तरतूद केली. विश्वास बसेल?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. Ninad Kulkarni says:

  महा. शासनाचा हा कारभार अगदीच अनाकलनीय आहे. सरकारी पातळीवरच मराठीची ही अनास्था पाहून संताप येतो.
  संबंधित अधिकाऱ्यांचे धिंडवडे काढले तरी कमीच ठरेल..

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० निनाद कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   आपल्या भावनांशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. निदान भाषा व संस्कृतीच्या बाबतीत तरी इतर राज्यातील राजकारणी स्थानिक जनतेला थोडेफार तरी दबून असतात. पण महाराष्ट्रात मराठी जनतेला सर्वच गृहित धरतात. फारतर बडबडतील व थकून झोपी जातील आणि पुढल्या दिवशी पोटापाण्याच्या चिंतेमागे सर्व विसरून जातील, याची सर्वांना खात्री असते. हे त्यांचे आराखडे एकजुटीने खोटे ठरवू शकलो तरच काही घडू शकेल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. Mangesh Nabar says:

  This undue grant is not unusual. I hate to discuss this matter, because the way this grants are spent is equally not accptable.However,the point raised here is debatable.
  Mangesh Nabar

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   मूळ मुद्दा असा आहे की जनतेचा पैसा शासनकर्ते कुणाशीही विचारविनिमय न करता, स्वैरपणे कसा खर्च करू शकतात? अशा खर्चाबाबत काही मार्गदस्र्क तत्त्वे सुद्धा नाहीत. मंत्र्यांची लहर (आणि काही पडद्यामागच्या घडामोडी) एवढ्यावरच हे निर्णय ठरतात हीच चीड आणणारी गोष्ट आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 6. shraddha says:

  maze spashta ase mat ahe ki aple rajkarni agdi nirarthak udar matwadi ahet.swatacha rajyacha vikas sodun he lok dusryana itka support kontya khushit kartat tech smjat nhi,yach rajyatle,yana aplya rajyacha vikas krayla kay laj vate ka? marathi sahityatun kharokhar shiknyasarkhe khup ahe mla dusrya rajyacha sahityavishyi kahi mhne nahi pan aplech rajyakrte aplyay duyyam sthan detat te hi quality asun mag dusranvishyi kay mhanave. ya ashamulech aplyala aplyach rajyat bhik magaychi vel yete yache far vait vate.

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्रद्धा तळेले यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   मराठी भाषा ही सर्व भारतीय भाषांपैकी सर्वोत्तम, सुसंस्कृत आणि संपन्न भाषांपैकी एक आहे. पण शासनाला त्याची पर्वाच नाही. मराठी शाळांचेसुद्धा खच्चीकरण करण्याचेच धोरण शासनाने स्वीकारले आहे.

   औदार्य हे श्रीमंताने दाखवावे. स्वतःच्या कुटुंबास उपाशी ठेवणार्‍याने नव्हे. पण यांची आपली गणिते काही वेगळीच असावीत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 7. padmakar shirsat says:

  sarkari anudanavar jagnarya marathi sahitikana kanach nahi. asha sarkarcha sarva upalabdh madhyamatun tivra dhikkar vhayala hawa. ajunparyant akahi vartamanpatrane hya vishayi agralekhatun nished nondawala nahi yatach sarvar ale.

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० पद्माकर शिरसाट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली चीड आम्ही समजू शकतो.

   १. आजकाल बरेच पत्रकारही विकाऊ असतात व ते ’ब्रेकिंग न्यूज’साठी काहीही तत्त्वहीन कृती करतात. त्यांना मराठीच्या प्रेमाशी फार-काही घेणे-देणे नसते.

   २. गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांना निषेधाबद्दल काहीही न वाटण्याइतके ते निर्ढावलेले आहेत. त्यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते असे वाटले तरच ते काही चांगली कृती करतील. आपण एकजुटीने त्यांच्यावर इतर राज्यांतील जनतेप्रमाणे काही दबाव आणू शकलो तरच काही उपयोग. त्यासाठी सामान्य जनतेतील तुमच्या-आमच्यासारख्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन एकजूट बांधायला पाहिजे.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 8. Anand Mhaskar says:

  An observation after observing another big democracy in action: Here in U.S. whenever a bill is proposed for discussion and voting, it is immediately made public. It is a right of information act. Don’t you get to know ahead of time, what bills are being proposed, when will they be voted on? Then don’t you have time to organize enough time to organize people and have them send letters to representatives, ministers to send letters expressing their opinions on the subject? And then if your representative does not vote your way, can you ask in public to explain his reasons?

  Why do you alweays wait until the bill is passed and then cry??

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० आनंद म्हसकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   आपले म्हणणे पूर्णतः योग्य आहे. इतर प्रगत, सुसंस्कृत व लोकशाही राष्ट्रांप्रमाणे आपले शासनकर्ते स्वतःला उत्तरदायी समजत नाहीत. मंत्र्याच्या लहरीवर व अंतरिक हेतुंवर सर्व निर्णय अवलंबून असतात, हेच तर आपले दुर्दैव.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 9. Vinay U Athalye says:

  Namaskar,

  Delhichya Hujaryankadun hyapeksha vegli apeksha kay karanar?.

  AMaharashtrane Gujarat var purache sankat ale tevhahi madat keli pan Mumbai var purache sankat ale tevha ekahi rajyane aplyala madat keli nahi.Ata aplya sarkarchya murkhapanala kay mhanave?

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० विनय आठल्ये यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. पत्रोत्तरास उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी.

   आपले म्हणणे पटते. पण धूर्त राजकारण्यांना मूर्ख म्हणणे म्हणजे आपला बालिश निरागसपणा ठरेल. त्यांनी उचललेले प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच उचललेले असते. त्यामागच्या स्वार्थाचे गणित आपल्यासारख्या सामान्यांना कळत नाही कारण तशा गणितात त्या पाताळयंत्री राजकारण्यांनी पी०एच०डी० कमावलेली असते आणि आपण साधी प्राथमिक शाळासुद्धा पार करू शकत नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 10. महाराष्ट्र सरकारने गुजरातीला (“गुजराथी” नव्हॆ!) एक कॊटीचे वरदान
  द्यावे आणि मराठी मायबॊलीची “बॊळवण” त्याच्या निम्मपटीत करावी
  हा “दुजाभाव” अनाकलनीय आहे. माझ्यासारख्या परदेशीय, मराठीचा
  आग्रह धरणार्‍याला धक्का देणारी अशीही वार्ता आहे.
  माझा प्रश्न असा की, गुजरातीप्रमाणे महाराष्ट्र इतर भाषक राज्यांनाहि
  असे अनुदान देते काय? व इतर राज्येही “परतफेड” म्हणून महाराष्ट्राला
  तेवढीच मदत देतात काय? माझ्यामते इतर राज्यांना आर्थिक मदत देणे
  योग्य नाही. य़ासंदर्भात आवाज उठविण्याची काळाची गरज आहे.
  — डा. अविनाश बा. जगताप, बिनिंगेन (स्वित्झर्लंड)

  • अमृतयात्री says:

   प्रिय डॉ० अविनाश जगताप यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.

   आपले म्हणणे शंभर टक्के योग्यच वाटते. आपण म्हणता तसा आवाज उठवण्यात महाराष्ट्र दुर्बळ ठरतो हेच आपले सर्वात मोठे दुर्दैव. इथे सामान्य मराठी माणसाचं स्वाभिमानाचं बळ कमी पडतं. आणि राजकारण्यांची गणितं वेगळीच असतात.

   ता०क० गुजराथ-गुजराथी हे जुनेच मराठी शब्द आहेत; जसे बडोदे (वडोदरा), कानडी (कन्नडा), ग्वाल्हेर (ग्वालियर?), इंदूर (इंदौर), झाशी (झॉंसी), मंगळूर-बंगळूर इत्यादी. या सर्व ठिकाणी मराठी मंडळी मोठ्या प्रमाणात होती व तेव्हाच रूढ झालेले हे शब्द असावेत. कानडी, गुजराथी, हिंदी भाषांतही मराठी नावे वेगळ्या, अपभ्रष्ट स्वरूपांत रूढ असणार. आपल्याला काय वाटते?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 11. Sudhir Kale says:

  यालाच “आ बैल मुझे मार” प्रवृत्ती म्हणतात!

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० सुधीर काळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार.

   पण तसे म्हणणार्‍या राजकारण्यांचे तो बैल काहीच नुकसान करणार नसतो. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणार्‍या या राजकारण्यांची परभाषिक धंदेवाल्या बैलांशी वेगळीच समीकरणे जुळलेली असतात. शेजार्‍याच्या बैलाला कडबा आणि हिरवे गवत घालताना घरच्या गाय-वासरांना उपाशी ठेवल्याबद्दल त्या सदसद्‌विवेकबुद्धीहीन राजकारण्यांना काहीही खेद वा खंत वाटत नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 12. purushottam says:

  kripaya yethe marathi lhinyachi soy jashi eSakalwar aahe tashi karnyat yavi hi pahili namra vinanti.
  Itar kontyahi bhaase aadhi Marathis Pradhany Dyayalach Pahije. bakichyancha vichar nantar karava ase sangane avshyak aahe.

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० पुरुषोत्तम यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

   या अनुदिनीवरील सर्व सुविधा वर्डप्रेस यांनी पुरवलेल्या आहेत. इतर मोठ्या संस्थळावरील सोयी इथे देणे आम्हाला शक्य नाही. बरेच वाचक आपले प्रतिमत मराठीत देत आहेत. आपणही त्यासाठी बराहाचा उपयोग करू शकता. त्यासाठी कृपया याच अनुदिनीवरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख वाचावा.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 13. Kiran says:

  He sarkar HARAAAMKHOR aahe… delhi la yancha dhunganawar laatha basat astil tari tyach laatha chatayala he dhanyataa manataat… thodya divasani bihari bhojpari bhashela anudan detil aani apala 25 lakhahun 25 hajaranvar yeil… aplyach gharat aplyala pahunyan pramane rahava lagel….
  Kuthe tari badal vhayala hava….

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० किरण खेडकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   “कुठेतरी बदल व्हायला हवा…”

   पण बदल हे आपोआप घडतील का? नाही, ते घडवायलाच लागतील. सर्व संवेदनशील, स्वाभिमानी मराठी मावळ्यांनी एकजुटीने व निश्चयाने ते बदल घडवायला हवे.

   याबद्दल आपापली मते सांगण्यास आम्ही सर्वच वाचकांना या व्यासपीठावर चर्चेसाठी आमंत्रित करीत आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • Kiran KheDEkar says:

    याबद्दल आपापली मते सांगण्यास आम्ही सर्वच वाचकांना या व्यासपीठावर चर्चेसाठी आमंत्रित करीत आहोत.

    charcha karun kahi hi sadhy hott naahi.. kruti vhayala havi na… krupa karun asa samju naka ki hi tika aahe… kruti vhayala havi he maza matt aahe…
    apan faar motha drastic change nahi ghadavu shakat lagech..pan chhotya chhotya goshti karun.. tyancha paath purava karun nakkich badal ghadau shakato… aani mala sangayala thodasa vaait dekhil watata pan apan sagalyana he ushira suchalela shahanpan aahe..

    • अमृतयात्री says:

     प्रिय श्री० किरण खेडेकर यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     “प्रत्यक्षात कृती व्हायला हवी” हे आपले म्हणणे पूर्णपणे अचूकच आहे. पण कृती ही नीट विचार करून व्हावी. कृती करण्याआधी मराठी माणसाने एकजूट करून, व्यूहनीती आखून, मोजक्या व कुठल्या लक्ष्यांवर हल्ले करायचे ते ठरवून मगच थेट कृती करावी. चर्चेचा अर्थ हा एवढाच. चर्चा ही कृतीला पर्याय ठरणार नाही हे खरेच. पण फोडा आणि झोडा अशा डावपेच आखणारे ह्या शासनकर्त्यांना आपण पुरून (अक्षरशः जमिनीखाली पुरून) उरायला पाहिजे.

     प्रथम लहान गोष्टींनी सुरुवात करून मग मोठी आव्हाने स्वीकारणे हे योग्यच आहे.शिवाजी महाराजांनीसुद्धा प्रथम तोरण्याने सुरुवात केली, कोंडाणा, राजगड अशा मोठ्या किल्ल्यांनी नव्हे.

     गंगा नदीसुद्धा उगमाजवळ एखाद्या ओहोळाप्रमाणे असते, पुढे तिचा महाकाय नद बनतो.

     उशीरा सुचलेल्या शहाणपणाबद्दल म्हणाल तर आपण याच अनुदिनीवरील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख वाचावा. आपल्याहून वाईट परिस्थितीतून अभिमानाने व जिद्दीने त्यांनी इंग्रजीला बाहेर काढली व मगच तिची भरभराट होऊ शकली.

     आभारी आहोत.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 14. Ninad Kulkarni says:

  Rajkarnyanni/ Shasanane akkal gahan theun paraspar kahihi nirnay ghene ata navin nahiye. Vril muddyakherij etar anek dakhle ahet. 10 vi la ATKT lagu karnyacha nirnay, 11 vi chya admissions ardhavat tayarivar online karnyacha nirnay – anek udaharane ahet.
  Dar veli shasan asa bejababdar nirnay ghete, shekdo sarvasamanya lokanna tyacha fatka basto, vartamanpatrantun shasanache vabhade kadhle jatat.. pan parinam kay? shasan dhimm. Ase murkhapanache nirnay badalle jat nahit, ani ashya chukani punha punha kelya jatat.
  Ata dar veles he asa nustach email karun, pratikriya deun kahi farak padel asa vatat nahi. Ya akkalshunnya rajkarnyanvar ankush thevaycha tar yahun jasta kahitari karayla hava. (bus var dagadfek karne, jalpol karne ha marga arthatach nahiye – ani to aplyasarkhya susanskrut lokanna zepnarahi nahi) Lokancha asa usfurta sahabhag asel ani rajkarnyanna lokancha dhak asel tevhach lokshahi yashaswi hoil nahitar rajkarnyanna charnyasathi kuran mokla ahe..

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० निनाद कुळकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण लक्षावधी-कोट्यवधी स्वाभिमानी, संवेदनशील सामान्य मराठी माणसांच्या मनातील गोष्टच मांडली आहे. – “लोकांचा असा उत्स्फूर्त सहभाग असेल आणि राजकारण्यांना लोकांचा धाक असेल तेव्हाच लोकशाही यशस्वी होईल.”

   मराठी माणसाने एकजूट बांधून सर्व राजकारण्यांना व मराठीच्या द्वेष्ट्यांना धाकात ठेवायला हवं.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 15. Sudhir Kale says:

  इथे चर्वितचर्वण व रुदन करावे हे ठीक आहे, पण पुरेसे नाहीं.

  आपण हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळाच्या कुठल्या खात्याच्या अखत्यारीत येते व त्या खात्याचा (नालायक) मंत्री कोण आहे हे सांगणे, त्याचा ई-मेल देणे व माय-मराठीच्या वाचकांना त्या अभिमानशून्य गाढवाला शिव्या घालायची संधी देणे हेच उपयुक्त ठरेल. इथे काथ्याकूट व तळतळाट (किंवा थयथयाट) करून काय उपयोग?
  हे सर्व नेते गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्याना मतें देणार नाहीं अशी धमकी दिली व ती खरी करून दाखविली तरच ते वठणीवर येतील.

  चला तसे करू या. त्याचा ई-मेलचा पत्ता द्या मला. मी सुरुवात करतो निषेध पत्रांच्या पावसाला.

  सुधीर काळे

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० सुधीर काळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले विधान योग्य आहे. केवळ चर्चा पुरेशी नाही. त्यातून काही कृतीचे निष्पन्न व्हायला हवे. प्रस्तुत निर्णय सांस्कृतिक खात्याच्या अधिकाराखाली येत असावा.

   खूप वेळ घालवल्यावर शेवटी खालील पृष्ठापर्यंत पोचलो. यापुढे काय करावे?
   http://cultural.maharashtra.gov.in/marathi/dcmNew/index.php?departmentCode=2700

   शासनाला सामान्यजनांशी बहुजनांच्या भाषेत म्हणजे मराठीमध्ये संवाद साधायची इच्छा नसतेच तर शक्यतो कोणी संपर्क करूच नये अशी इच्छा दिसते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 16. Sudhir Kale says:

  अमृतयात्री यांस,
  आपल्याला “आ बैल मुझे मार” या उक्तीचा अर्थच कळला नाहीं असे दिसते.
  याचा अर्थ आहे आपल्यावरच्या संकटांना स्वत:च निमंत्रण देणे.
  मराठीचा आपण दुस्वास कारायचा व गुजरातीला प्रेमळ वागणूक द्यायची हा त्यातलाच प्रकार.
  सुधीर काळे

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० सुधीर काळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आमचे हिंदीचे ज्ञान फारसे भूषणावह नाही हे खरेच, पण आपल्या हिंदी म्हणीचा गर्भितार्थ आम्हाला समजला होता असे वाटते. आमच्या उत्तराचा अर्थ असा की महाराष्ट्र शासनाने परप्रांतीयांना चुचकारण्याचे व मराठ्यांची उपेक्षा करण्याचे हलकट धोरण चालू ठेवले तरी ते संकट, तो त्रास कोणाला? तर सामान्य मराठी जनतेला. जाणूनबुजुन तसं धोरण अंगिकारलेल्या राजकारण्यांना कसलं आलं आहे संकट आणि त्रास? प्रत्येक चालीतून मलई खाण्यात ते तरबेजच असतात. म्हणूनच आम्ही म्हटलं की – “शेजार्‍याच्या बैलाला कडबा आणि हिरवे गवत घालताना घरच्या गाय-वासरांना उपाशी ठेवल्याबद्दल त्या सदसद्‌विवेकबुद्धीहीन राजकारण्यांना काहीही खेद वा खंत वाटत नाही.” आमचे म्हणणे नीटसे स्पष्ट झाले नसेल तर क्षमस्व. उद्दिष्ट अर्थ एवढाच की जोपर्यंत चुकीच्या निर्णयांची आच स्वतः राजकारण्यांच्या बुडाला लागत नाही तो पर्यंत ते असेच बेपर्वाईने वागणार. सामान्य माणसाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना इंगा दाखवायलाच हवा.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • Sudhir Kale says:

    अजूनही कळलेला दिसत नाहीं!

    • अमृतयात्री says:

     प्रिय श्री० सुधीर काळे यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     पत्रोत्तराबद्दल आभार.

     आपण म्हणता त्याप्रमाणे आम्हाला कदाचित आपल्या हिंदी म्हणीचा (ती हिंदीच भाषा होती ना?) अर्थ कळला नसेलही. आम्हा सर्वांच्याच हिंदीच्या ज्ञानाची मर्यादा आम्ही याआधीच मान्य केलेली आहे. घटनेच्या परिशिष्ट-८ मधील आमची मायबोली वगळता इतर सर्व २१ भाषा आम्हाला सारख्याच. त्या सर्वच आदरणीय असल्या तरी त्यांच्यावर प्रभुत्व मिळवणे ही आमच्यासारख्या सामान्यांच्या कुवतीपलिकडची गोष्ट. तेव्हा त्याबाबतीत आम्हाला वृथाभिमान बाळगून उपयोग नाही. मात्र आमच्या मायबोली मराठीमध्ये, मायबोली मराठीविषयी चर्चा करताना जर एखादी मराठी म्हण समजली नसती तर मात्र त्याची खंत कितीतरी अधिक वाटली असती हे मात्र नक्की. असो.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 17. Shrikant Pundlik says:

  I always believed that Mrathi should be given first and last preference in Maharashtra. Do Gujaratis respect Marathis. Answer is no. Except a few people migrated long back nobody speaks Marathi. They do not allow us to by flats in their Societies. We Marathis are too scared to say anything against Gujaratis. We think every Gujarati is incarnation of Dhirubhai Ambani. Marathi Politicians think that by playing such tricks they will win their hearts then they are under wrong impression. Gujaratis know that Marathis can be bought and at dert cheap rate. Let us not reinforce this impression by prompting Gujarati
  Shrikant Pundlik

  • अमृतयात्री says:

   प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार.

   इतरही बहुतेक सर्व राज्यांत (उदा० बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र, आसाम, ओरिसा व हिंदी राज्ये वगैरे) उद्योगपती परभाषक राज्यांतील असतात. पण तिथे त्यांचे भाषिक व सांस्कृतिक चोचले चालत नाहीत. इतर सर्व राज्यांत ते स्थानिक भाषेतच कामगार व शिपायांशी बोलतात. परप्रांतीयांने दुसर्‍या प्रांतात स्थायिक होताना त्या राज्याच्या भाषेशी व संस्कृतीशी समरस होण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे हे भाषावार प्रांतरचनेमागील मूलतत्त्व आहे. ह्याचा उल्लेख आपल्याला ’हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!’ या लेखात उद्धृत केलेल्या सर्वोच्च न्यायालयाने महात्मा गांधींचा हवाला देऊन हे तत्त्व ठासून सांगितलेल्या विधानात आढळेल.

   पण दुर्दैवाने आपल्या राज्यात आपल्या न्यूनगंडामुळे किंवा अनास्थेमुळे आपण आपल्या भाषेचे व संस्कृतीचे महत्त्व कमी करतो आणि इतरांना (पाहुण्यांना व राजकारण्यांना) करू देतो. यात इतरांच्यापेक्षा देखिल मुळात आपलाच दोष अधिक आहे, असे आपल्याला वाटत नाही का?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

लेखनाची वर्गवारी

’अमृतमंथन’ अनुदिनीवरील नवीन लेखांबद्दल सूचना मिळवण्यासाठी इथे आपला ईमेल-पत्ता नोंदवा.

Join 337 other followers

खूणगाठी (Tags):

Book Review constitution Constitution of India education policy English English language Government Hindi India Maharashtra Marathi Marathi Books Marathi language Marathi literature Marathi schools medium of education mother tongue National Language Official Language Prof. Manohar Railkar Recognised Languages Right to Education Saleel Kulkarni Schedule 8 State Government अधिकृत भाषा अनुसूची ८ अस्मिता ऐक्य केंद्रशासन घटना दैनिक पुस्तक ओळख पुस्तक परिचय पुस्तक परीक्षण प्रा० मनोहर राईलकर भारत भारताची राज्यघटना भारतीय संस्कृती भाषाभिमान भाषाविषयक धोरण मराठी मराठी अस्मिता मराठी कविता मराठीची चळवळ मराठीचे प्रश्न मराठी पुस्तके मराठी भाषा मराठी माणूस मराठी माध्यम मराठी माध्यमातून शिक्षण मराठी लेखन मराठी वाचन मराठी शाळा मराठी संस्कृती मराठी साहित्य महाराष्ट्र मातृभाषा मायबोली राजभाषा राज्यभाषा राज्यशासन राज्य शासन राष्ट्रभाषा राष्ट्रीय एकात्मता लोकसत्ता वृत्त शिक्षणविषयक धोरण शिक्षणाचा अधिकार शिक्षणाचे माध्यम शुद्धलेखन संविधान सकाळ सलील कुळकर्णी स्वाभिमान

हल्ली सर्वाधिक वाचले गेलेले लेख:

हल्लीच प्रकाशित केलेले लेख:

प्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 337 other followers

%d bloggers like this: