मराठी भाषकच आपल्या हक्कांविषयी इतके उदासिन आहेत की त्यांना गृहीत धरणे अगदी सोपे जाते. पण थोडी जागरूकता दाखवली तर काय किमया घडू शकते, याचा एक प्रेरक अनुभव…
आंध्र प्रदेशातील करीमनगर येथे सहप्राध्यापक असलेले डॉ० श्रीपाद पांडे ह्यांनी आंध्र प्रदेशात राहूनही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मराठी अभिमानाचा इंगा ऍक्सिस बॅंकेला दाखवला त्याबद्दलचे हे दैनिक सकाळमधील वृत्त सर्वच मराठी-प्रेमींना प्रेरणादायी ठरावे.
अशाच चळवळी विविध क्षेत्रात चालवल्यास भाषेबद्दलचे महत्त्व, सन्मान वाढण्याबरोबरच अनेक मराठी भाषक माणसांना रोजगार मिळू शकेल.
दै० सकाळ (पुणे) आवृत्तीमध्ये ३ डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेली ही बातमी खालील दुव्यावर वाचावयास उपलब्ध आहे.
अमृतमंथन-मराठीसाठी अशीही लढाई_डॉ० श्रीपाद पांडे_दै० सकाळ_031209
.
आपले विचार या लेखाखाली अवश्य कळवा.
– अमृतयात्री गट
Best example to learn and take action.
प्रिय श्री० दीपक कदम यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.
अशाच प्रकारे प्रत्येकाने यथाशक्ती काम केले तर बरेच काही साधता येईल.
आभार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
अत्यन्त चांगलेव मार्गदर्शक उदाहरण आहे. ह्या विषयावर काम करणार्याचा हुरूप वाढणार आहे.डॉक्टर श्री श्रीपाद पांडे ह्यांचेमनापासून अभिनंदन
प्रिय श्री० दीपक कदम यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.
आपण एकजूटीने काम केले तर बरेच काही साधता येईल. यातून आपण एक चळवळच बांधूया.
आभार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
आपल लेख वाचला .फ़ार उत्तम वाटला.डॉक्टर श्री श्रीपाद पांडे याचे प्रयत्न अभिन्दनिय व मोलचे आहे.
आपण असेच कार्य सुरु ठेवावे.
प्रिय श्री० अक्षय सावध यांसी,
सप्रेम नमस्कार.
अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित करण्याचा हेतु हाच की त्यामुळे अधिकाधिक मराठी माणसांचा स्वभिमान जागा होऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढून अधिकाधिक मराठी माणसे आपल्या न्याय्य अधिकार मिळवण्यासाठी कृती करू लागतील. त्यातूनच एखादी चळवळ उभी राहू शकते.
सर्वांचा पाठिंबा अपेक्षित तर आहेच पण केवळ तेवढ्यावरच न थांबता प्रत्येक मराठ्याने यथा्शक्ती कृती करणेसुद्धा अपेक्षित आहे.
आभारी आहोत.
क०लो०अ०
अमृतयात्री गट