Liberties Liberhan Took – लिबरहॅन यांचा स्वैराचार?? (ले० चंदन मित्रा – सण्डे पायोनियर)

दिनांक २९ नोव्हेंबर २००९ दिवशीच्या सण्डे पायोनियरमधील हा एक उत्तम, चिंतनीय लेख. हा लेख काही वेगळेच पैलू उघडून दाखवतो आणि मग देशाच्या खजिन्यातील काही शे कोटी खर्च करून सत्तारूढ पक्षाने स्वतःच्या राजकीय सोयीशिवाय काय साधले असा प्रश्न पडतो.

स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे पंचवीस वर्षांतील तज्ज्ञ आयोगांचे अहवाल हे खरोखरच निष्णात व्यक्तींनी सर्वंकश चौकशी, अभ्यास व विचार करून प्रामाणिकपणे लिहिलेले विद्वत्तापूर्ण प्रबंध असत. पण हल्ली बर्‍याचदा ते राजकीय हुजर्‍यांच्या कडून लिहून घेतलेले अहवाल असतात. त्यांनी काढायचे निष्कर्ष हे आधीच ठरलेले असतात आणि लहानपणी शाळेच्या अंकगणिताच्या पुस्तकातील मागे दिलेली उत्तरे पाहून कसेबसे गणित सोडवून दाखवल्याप्रमाणे त्यातील तर्कवाद बसवलेले असतात. अर्थात त्या अहवाल-लेखकास माहित असते की जर त्यातील निष्कर्ष सरकारातील उच्चपदस्थांना सोयीचे वाटले व मान्य झाले तर मग त्यांची तर्कशुद्धता न तपासताच ते अहवाल ग्राह्य धरले जातात आणि जर तसे नसेल तर मग ते कितीही सत्यावर व विद्वत्तेवर आधारित असले तरीही ते दाबून टाकले जातात. हल्लीचा २६/११ च्या संबंधातील राम प्रधान अहवाल, युतीच्या काळातील शिवसेनेवर शेकू शकेल असा न्यायमूर्ती श्रीकृष्ण अहवाल आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे राज्याच्या दीर्घकालीन शिक्षण धोरणाबद्दल बनवलेला भूतपूर्व कुलगुरू प्रा०राम जोशी यांचा अहवाल. हे सर्व सत्तारूढ पक्षांना (अनुक्रमे कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस यांना) गैरसोयीचे वाटल्यामुळे त्यांना प्रशिद्धी न देताच दाबून टाकून केराच्या टोपलीत टाकले गेले. ही पार्श्वभूमी जाणून घेतल्यावर आता श्री० चंदन मित्रा यांचा ’Liberties Liberhan Took’ (लिबरहॅन यांचा  स्वैराचार??) हा लेख खालील दुव्यावर वाचा. कदाचित लेखकाची सर्वच मते आपल्याला पटणार नाहीत. तरीही हा एक उत्तम, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण लेख आहे यात शंका वाटत नाही.

अमृतमंथन-Liberties Liberhan took_Chandan Mitra_Sunday Pioneer_291109

नम्र सूचना: ’Liberties Liberhan Took’ या शीर्षकाचे ’लिबरहॅन यांचा स्वैराचार’ असे केलेले भाषांतर कदाचित अचूक नसेल. पण त्याहून अधिक समर्पक भाषांतर सुचले नाही. या बाबतीत भाषांतर या विषयाच्या आणि विशेषतः आमच्या इंग्रजी-मराठीच्या ज्ञानाच्या मर्यादा मान्य केल्याच पाहिजेत. क्षमस्व.

लेखाबद्दल आपली मते अवश्य कळवा.

– अमृतयात्री गट


2 thoughts on “Liberties Liberhan Took – लिबरहॅन यांचा स्वैराचार?? (ले० चंदन मित्रा – सण्डे पायोनियर)

    • प्रिय श्री० कृष्णकुमार प्रधान यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      मराठीब्लॉग्स वरील विरोप (ई-मेल) आम्हाला मिळत नाहीत. इथे लेखांखालीच आपले प्रतिमत (feedback) नोंदवावे.

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s