द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध भाषांची भाषिक वर्चस्वासाठी साठमारी सुरू झाली होती. लोकसंख्येमुळे हिंदी भाषेला संसदेमध्ये इतरांहून अधिक सदस्यसंख्याबल लाभलं होतं. अशा वेळी पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असलेले आणि देशाची राज्यघटना तयार करण्यात सिंहाचा वाटा असणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी पन्नासाहून अधिक वर्षांपूर्वी केलेला वास्तव्याचा अभ्यास आणि त्यावरून आराखडे बांधून दूरदृष्टीने केलेले भाकित किती अचूक ठरले हे आपण सर्वच पडताळून पाहू शकतो. त्यांच्या ह्या अचूक भविष्यकथनासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान नव्हे तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, कायदा, भाषाविज्ञान अशा विविध विषयांचा त्यांचा केवळ अभ्यासच नव्हे तर त्यांवरील प्रभुत्व हेच आधारभूत होते हे सहजच समजून चुकते.

आपले वाचकमित्र श्री० राजेश पालशेतकर यांनी पाठवलेल्या प्रतिमताचा (feedback) काही अंश खाली सादर करीत आहोत.

श्री० राजेश पालशेतकरांनी पाठवलेले डॉ० आंबेडकरांचे अवतरण खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन-द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित_011209

……

अशा या उत्तम, माहितीपूर्ण उतार्‍याबद्दल श्री० राजेश पालशेतकरांचे आभार.

श्री० राजेश पालशेतकरांनी उद्धृत केलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या उतार्‍याबद्दल आपले मत लेखाखालील रकान्यात अवश्य कळवा.

– अमृतयात्री गट

.

Tags: , , , , , , ,, , , , , , ,, , , , , ,,

.

6 thoughts on “द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित (प्रेषक: राजेश पालशेतकर – वाचकमित्र)

  1. ravivar loksattamadhye ha lekh mi wachala. Marathichi durdasha honyas sarvswi sarv topiwale (Pandharya topipasun te Kalya paryant sarv rang) karnibhut aahet ase majhe spasht mat aahe.Mi ase ka mhanate te aapan janun aahat. maharashtratil rajkarnyachya Pad-khau dhoranamulech he sare prashna nirman zale aahet.
    mi aaj unikod dware marathi kase lihave ha lekha wachala.
    majhi aaplyala ek namra vinanti aahe ‘esakal madhye jyapramane marathi lhinyachi soy keli aahe tashi yethe hi karavi’ mhanaje itar katatop karava laganar nahi. orkutwar sudha marathi lhinyachi soy aahe.

    • प्रिय प्रिया पाठक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

      १. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात भाषा व संस्कृतीच्या बाबतीत सामान्य जनतेचा राजकारण्यांवर दबाव-दडपण-वचक नाही हे मुख्यतः मोठे दुर्दैव. तसे असते तर ते असे स्वैरपणे वागून भाषा-संस्कृतीच्या बाबतीत एवढे मुजोरीने वागले नसते.

      २. ऑर्कूट-सकाळप्रमाणे सॉफ्टवेअर विकत घेण्याची आमची ऐपत नाही. ही अनुदिनीदेखिल स्वतःच्या पोटापाण्याच्या उद्योगावर परिणाम करून घेऊनच चालवीत आहोत. पण बराहाप्रमाणे लिहिणे कठीण नाही. आपले बरेच मराठीप्रेमी मित्र तो लेख वाचून शिकले आहेत. जी-मेलवर लिप्यंतर (transliteration) ची सोय आहे. ती सुद्धा वापरून पहा. थोडा निश्चय आणि धीर बाळगा. थोडा सराव केल्यावर सोपे वाटू लागते. जन्मल्यावर लगेच कुठे चालायला जमते? थोडे पडून-झडून-रडून झाल्यावरच ते जमते आणि मग नंतर ते पडणे-रडणेही आपण विसरून जातो. आयुष्यात प्रथम पेन्सिलीने लिहायला शिकतानासुद्धा खूप त्रास झालेला आपण कालांतराने विसरतो. सर्वच गोष्टी झटपट-इन्स्टंट आणि श्रमाशिवाय झाल्या की त्यातील मजा जाते. गिर्यारोहण दुसर्‍याच्या खांद्यावर बसून करण्यात काय आनंद?

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० रवींद्र अवसरे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

      आपले म्हणणे १०० टक्के पटते. ’हिंदी राष्ट्रभाषा? एक चकवा !’ या लेखाचासुद्धा तोच मूळ उद्देश आहे.

      प्रिय मातृभाषेसंबंधीचे आपले विचार मायबोलीत व लिपीत अधिक स्पष्टपणे व्यक्त होतात. नाही का? पोळी-भाजी काट्याचमच्याने खाताना तिची चवच लागत नाही.

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० सुरेश भगडे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत. श्री० राजेश पालशेतकरांनी उद्धृत केलेला डॉ० बाबासाहेब आंबेडकरांचा ’भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा’ या पुस्तकातील उतारा प्रसिद्ध करण्याच्या वेळी आपले एक मराठी प्रेमी मित्र श्री० विजय पाध्ये यांनी त्या पुस्तकाबद्दल खालील माहिती पुरवली होती.

      {‘भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा’ हे पुस्तक म्हणजे आंबेडकरांच्या ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’चा वि०तु० जाधव ह्यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’ हे आंबेडकरांचे पंधरावे वाङ्मयअपत्य, रामकृष्ण प्रिंटिंग प्रेस, मोरबाग रोड, दादर, येथे छापून साहेबांनी २६, अलिपूर रोड, सिव्हिल लाइन्स, दिल्ली, ८ या पत्त्यावर प्रसिद्ध केले. याची पृष्ठ संख्या ६५, किंमत चार रुपये, यात पाच नकाशे आणि दहा परिशिष्टे आहेत. परिशिष्टात जी आकडेवार माहिती दिली आहे ती वाचकांना थक्क करून टाकते’ असा उल्लेख ‘भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ० भीमराव रामजी आंबेडकर चरित्र’ – खंड ९ (लेखक: चांगदेव भवानराव खैरमोडे, प्रकाशक: सुगावा प्रकाशन, पुणे) ह्या पुस्तकाच्या पान १७६वर केलेला आढळतो. दुर्दैवाने, आपल्याला वि०तु० जाधव ह्यांनी ‘थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स’च्या केलेल्या अनुवादात जे म्हटले आहे (व जे आपल्याला स्फोटक म्हणून उपयोगी पडेल असे वाटते) तो भाग खैरमोडे ह्यांच्या पुस्तकात सापडत नाही.}

      वरील माहिती या विषयात स्वारस्य असलेल्या सर्वच वाचकबांधवांना उपयोगी ठरावी.

      आपले व श्री० पाध्ये यांचे अत्यंत आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s