’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता)

भारताच्या मानाने इस्रायल हा खरोखरच चिमूटभर देश. विकिपीडियामधील माहितीप्रमाणे इस्रायलचे भौगोलिक क्षेत्रफळ हे सुमारे २२,०७२ चौरस कि०मी० म्हणजे भारताच्या ०.६७% आणि लोकसंख्या ७४,६५,००० म्हणजे भारताच्या ०.६२% आहे. म्हणजे भारत देश इस्रायलच्या दीडशे पटीहून अधिक मोठा आहे. मुंबईशी तुलना केल्यास इस्रायलचे क्षेत्रफळ मुंबईच्या सुमारे ३७ पट असून लोकसंख्या जेमतेम निम्मी (सुमारे ५४% ) आहे. अशा या चिमुकल्या पण अत्यंत स्वाभिमानी देशाचे अफाट कर्तृत्व पाहिले की कोणीही भारतीय आदराश्चर्याने चकित होऊन जाईल आणि त्याला स्वतःबद्दल न्यूनदंड वाटू लागेल.

दिनांक २२ नोव्हेंबर २००९च्या लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला श्री० सुधीर जोगळेकरांचा लेख ’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन-मणभर कर्तृत्वाचा कणभर देश_Loksatta_221109

अत्यंत दुर्दैवी आणि अगदी मूलभूत अस्तित्वदेखिल दुरापास्त ठरावं अशी ऐतिहासिक, भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती असूनही केवळ मातृभूमी, मातृभाषा आणि स्वसंस्कृती यांच्याबद्दलच्या आत्यंतिक अभिमान आणि या सर्व परिस्थितीमधून निर्माण झालेली जिद्द यांच्या बळावर एक चिमुकला देश काय करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे इस्रायल. असं हे उदाहरण सर्व भारतीयांनी आणि विशेषतः प्रत्येक मराठी माणसाने अभ्यासलेच पाहिजे.

इसायल देश अतिबिकट परिस्थितून केवळ स्वदेश व स्वभाषा यांच्याबद्दलच्या अभिमानाच्या बळावर जिद्दीने वर आला आणि सर्व शेजारी देश जीवावर उलटले असतानादेखिल ताठ मानेने व चिकाटीने स्वतःची प्रगती साधून विविध क्षेत्रांत त्याने अग्रस्थान पटकावले आहे. इस्रायलच्या उदाहरणावरून भारतीय व मराठी माणसांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे.

अशाच प्रकारचे याच अमृतमंथन अनुदिनीवरील ’जगाची भाषा आणि आपण’ (ले० सुधन्वा बेंडाळे) या लेखावरील परीक्षणही अवश्य वाचा.

आपल्या प्रतिक्रिया लेखाखाली अवश्य कळवा.

– अमृतयात्री गट

4 thoughts on “’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता)

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s