हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)

“मराठी भाषेला आणि मराठी माणसाला स्वत:च्या राज्यात न्याय्य अधिकाराचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला देशाच्या भाषिक  धोरणांसंबंधीची कायदेशीर पार्श्वभूमी माहित असावी, या उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे.

भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या अनुसूची-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाषेच्या दर्जाच्या मानल्या जाव्यात असा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.”

रविवार दिनांक १५ नोव्हेंबर २००९ च्या लोकसत्तेमधील लोकमुद्रा पुरवणीत प्रसिद्ध झालेला श्री० सलील कुळकर्णी यांचा हा लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन-हिंदी ही राष्ट्रभाषा-एक चकवा_लोकसत्ता_लोकमुद्रा_151109

मराठी माणसाच्या मनात स्वभाषेच्या वैधानिक स्थानाबद्दल उभ्या राहणार्‍या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळून त्याचा स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दलचा अभिमान पुन्हा जागृत होईल आणि आपण आपल्या एकाच मायबोलीची सर्व लेकरे एकत्र येऊन तिच्या सन्मान आणि समृद्धीसाठी नेटाने प्रयत्न सुरू करू अशी आशा बाळगू.

टीप:

१. अनेक वाचकांच्या आग्रही सल्ल्यानुसार या लेखाची इंग्रजी (भाषांतरित) आवृत्ती तयार करून याच अनुदिनीवर Hindi, the National Language – Misinformation or Disinformation? या नावाने प्रसिद्ध झाली आहे.

२. प्रस्तुत लेख प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकारकडून अधिकृतपणे मिळालेले या विषयीचे पत्र याच अमृतमंथन अनुदिनीवर –“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा – या लेखात पाहू शकता.

.

श्री० कुळकर्णी यांच्या प्रस्तुत लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) अवश्य कळवा. आभारी आहोत.

अमृतयात्री गट

ता०क० स्वभाषाभिमान याच विषयाशी संबंधित लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले श्री० सलील कुळकर्णी यांचे  खालील दोन लेखही अवश्य वाचा.

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)

.

Tags: ,

.

41 thoughts on “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)

      • प्रिय श्री० अमित जाधव यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत.

        आपल्या पत्राला उत्तर देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो. खरं म्हणजे आपल्या पत्राला उत्तर २-३ दिवसांपूर्वी दिलं होतं. पण ते अनुदिनीवर दिसत नाही. अनुदिनीवर उत्तर चढवण्यात आमची काही चूक झाली की सॉफ्टवेयर या प्राण्याला अधूनमधून माणसाची फिरकी घेण्याची लहर येते तसा काही प्रकार होता; हे कळण्यास मार्ग नाही. अर्थात झालेल्या उशीराबद्दल जबाबदारी आमचीच आहे. क्षमस्व.

        लेख आपल्याला आवडला हे जाणून फार आनंद झाला. अशाच समरुची मराठीप्रेमींनी एकत्र येऊन काही प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. आपण “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट” हा लेख वाचलात का? नसल्यास याच अमृतमंथन अनुदिनीवर उपलब्ध असलेला तो लेख कृपया वाचावा व त्यातील मते आपल्याला पटत असतील तर आपल्या मायमाऊलीसाठी यथाशक्ती मदत करण्यासाठी मराठी+एकजूट यात्रेत भाग घ्यावा अशी आमची नम्र विनंती.

        संगणकावर मराठीमध्ये लेखन करण्यासाठी आवश्यक ती माहिती जाणून घेण्यासाठी अमृतमंथनावरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख वाचा.

        आपण या माहितीचा जरूर फायदा करून घ्या आणि आपल्या इतर मित्रांनाही मायबोलीत लिहिण्याचा आग्रह करा. व्यक्तिशः आम्हाला बराहातून टंकलेखन अधिक सोयीचे वाटते. सवयीने वेगही वाढतो. वरील लेखाचा दुवा आपण मुक्तपणे अग्रेषित करू शकता. त्याने आपल्या मायबोलीच्या प्रसार संवर्धनास हातभारच लागेल.
        कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा.

        शुभस्य शीघ्रम् I

        क०लो०अ०

        – अमृतमंथन गट

        • भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती किंवा आपण देशात फिरताना थोडके मोडके का होईना हिंदी समजते म्हणून हिंदी प्रधान भाषा तरी नक्की आहे

    • प्रिय श्री० देवेंद्र चुरी यांस,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही वाचून पहावेत. आवडले तर इतर मराठीप्रेमी मित्रांना अग्रेषित करावेत. लेखाबद्दल प्रतिमत (feedback) द्यावेसे वाटले तर अवश्य द्यावे.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री

      • इतर लेखही छान आहेत… याआधी ही वाचत होतो तुमचा ब्लॉग, पण कंमेंट टाकायला आळसपणा करत होतो.
        असच लिहित रहा.
        (काल बरयाच मित्राना लिंक पाठवली तुमच्या ब्लॉग ची.)

        • प्रिय श्री० देवेंद्र चुरी,

          सप्रेम नमस्कार.

          आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

          आपली ’दवबिंदू’ अनुदिनीसुद्धा पाहिलेली आहे. दवबिंदुंप्रमाणेच मस्त, हलकेफुलके आणि मन ताजेतवाने करणारे लेख वाचून मनावरचा शीण दूर होतो.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अभय देशमुख यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले मत योग्यच आहे पण एका वर्तमानपत्रात एखादा लेख प्रसिद्ध झाल्यास तो इतर वर्तमानपत्रे पुनर्मुद्रणासाठी स्वीकारतील किंवा नाही याची शंका वाटते, विशेषतः इंग्रजी-हिंदी वर्तमानपत्रे. आपल्यास तशी माहिती-ओळख असल्यास अवश्य कळवा. नाहीतर सर्वच यत्न वाया जातील.

      शिवाय ही माहिती वाचून महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाचे राजकारणी त्याचा योग्य उपयोग करून घेऊ शकतात. मराठी राजकारणी मंडळी प्रसारमाध्यमांनी ’हिंदी राष्ट्रभाषा’ असे म्हटल्यावर चेहरा पाडून जी शेपूट घालतात; त्यांना तर ह्या लेखाचा नक्की आधार मिळावा.

      खरं म्हणजे ही माहिती काही माझी वैयक्तिक नव्हे. माझा लेखाच्या आधारावर कोणीही लेख लिहिला, भाषण केलं तरीही चालेल. पण ती माहिती अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोचवणे हे महत्त्वाचे.

      अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही मराठी माणसे-भाषा-संस्कृती यांनाच वाहिलेले आहेत. अवश्य पहा. आपला अभिप्राय लेखाखाली नमूद करू शकता. म्हणजे त्या संबंधातील चर्चेचा फायदा इतर वाचकांनाही होऊ शकतो.

      https://amrutmanthan.wordpress.com/

      आवडलेले लेख आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रांस अग्रेषित करून स्वभाषेसंबंधीच्या स्वाभिमानाचा वणवा पसरविण्यास मदत करावी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री

    • प्रिय कांचन करई यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आमृतमंथनावरील श्री० कुळकर्णी यांचा लेख आवडल्याबद्दल आभार. समविचारी मराठीप्रेमी मित्रांना आपण त्याचा खाली दिलेला दुवा अवश्य पाठवा.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

      अमृतमंथन अनुदिनीवरील आपल्याला आवडलेल्या लेखांचे आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रांस अग्रेषित करून स्वभाषेसंबंधीच्या स्वाभिमानाचा वणवा पसरविण्यास मदत करावी.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० एकनाथ पोतदार यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या मायमराठी गटाच्या तर्फे आपण कळवलेल्या आपुलकीच्या प्रतिमताबद्दल (feedback) आम्ही अत्यंत आभारी आहोत.

      सलील कुळकर्णींच्या प्रमाणेच इतर वेगवेगळ्या लेखकांचे लेखही या अनुदिनीवर प्रकाशित झाले आहेत. सर्वांचे सूत्र एकच. ते म्हणजे मराठी. मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस… मराठी सं-भा-मा.

      मराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा विचारमंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरील लेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा विरोपाद्वारा (through emails) संपर्कात राहण्यास सांगावे.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

  1. नमस्कार,

    आपला ’हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !’ हा लेख नुकताच वाचनात आला.
    हा लेख अनेक चुकीच्या संकल्पनांना योग्य उत्तरे देणारा आहे.
    हा लेख इतर मित्रांना वाचायला मिळावा असे वाटते.
    Orkut, facebook सारख्या social networking communities वर हा लेख प्रदर्शित व्हावा असे वाटते.
    तरी या संदर्भात लेखकाची परवानगी असावी असे वाटते.

    कृपया सदर विचार सर्वदूर पोहोचविण्या साठी, हा लेख अशा पध्दतीने प्रदर्शित करण्पयाची परवानगी असावी, हि विनंती.

    -प्रज्ञा

    • प्रिय प्रज्ञा शिदोरे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या उत्स्फूर्त प्रतिमताबद्दल (feedback) आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.

      ही माहिती अधिकाधिक मराठी माणसांपर्यंत पोचणे आवश्यकच आहे. प्रस्तुत लेख या अमृतमंथन अनुदिनीवर उपलब्ध आहे. तो दुवा आपण अवश्य सर्वांना अग्रेषित करावा. ती आपल्या मातेची सेवाच ठरेल.

      मराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड टाकून देऊन स्वराज्यात असताना शक्यतो सर्व ठिकाणी मायबोलीत बोलणे, लिहिणे केले पाहिजे. अगदी भाजीवाला, दुकानदार, हॉटेल, टपाल कार्यालय, एटीएम, बॅंका, रेलवे, बस, टॅक्सी, रिक्शा, रस्त्यावर, सरकारी कार्यालयात असे सर्वच ठिकाणी बोलताना आपली भाषाच वापरायची. आपण इतरांना आपली भाषा ऐकवली नाही तर ते ती शिकणार तरी कशी? इतर राज्यांत परप्रांतीय स्थानिक भाषा अशाच प्रकारे शिकतात. 

      मराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा विचारमंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरील लेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा संपर्कात राहण्यास सांगावे.

      आभारी आहे.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

  2. Namaskar,
    Lekh aprateem ahe !!!Gharatlyan-sathi samuhik vachan hi zale…sarvanche dole vispharle gele.
    Avdaylach hava pratyekala asa lihilay tumhi !!!
    Sahdyachi ekun rajkiya paristhiti pahata Marathicha agraha dharnarya va marathi vishayi jivhala vyakta karnarya lokanchi kondit sapadlya sarkhi parasthiti ji nirman keli geli ahe ..asha aeen veli tumcha lekh vachun manala khup khup bare vatle ….Hayse vatle…Anand zala ..ani anandach zala !!!
    Tumcha Lekh abhyas purna ahech pan tyat disun yete te tumche samajik bhan …marathi varche prem…hindi bhashevishyi hi vatnari astha ani (aitihasik) purave-dakhle deun… rokthok vastusthithi kalpaktene mandnyachi tumchi hatoti!!
    Lekh aprateem ahe !!!Gharatlyan-sathi samuhik vachan hi zale…sarvanche dole vispharle gele.
    Avdaylach hava pratyekala asa lihilay tumhi !!!
    Sahdyachi ekun rajkiya paristhiti pahata Marathicha agraha dharnarya va marathi vishayi jivhala vyakta karnarya lokanchi kondit sapadlya sarkhi parasthiti ji nirman keli geli ahe ..asha aeen veli tumcha lekh vachun manala khup khup bare vatle ….Hayse vatle…Anand zala ..ani anandach zala !!!
    Tumcha Lekh abhyas purna ahech pan tyat disun yete te tumche samajik bhan …marathi var che prem…hindi bhashevishyi hi vatnari astha va aitihasik purave-dakhle deun… rokthok vstusthithi kalpaktene mandnyachi tumchi hatoti!!
    Ankhin kay have ???

    Pratyek rajkiya netyanchya table-var asayla hava asa ha lekh ahe.

    Asech lihit raha…

    • प्रिय मंगल देसाई,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या उत्स्फूर्त प्रतिमताबद्दल (feedback) आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्या प्रत्येक वाक्यातून स्वभाषेबद्दलचे प्रामाणिक, अतूट, प्रेम आणि आपुलकी स्वच्छपणे दिसते, जाणवते.

      आपली आई ही दुसर्‍या कोणाच्याही आईपेक्षा गुणांमध्ये कुठल्याही प्रकारे जरादेखिल हिणकस, कमअस्सल, नाही उलट अत्यंत श्रीमंत, चारित्र्यसंपन्न, उच्चकुलीन अशीच आहे, ही अत्यंत अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि तशी नसती तरीही आपण म्हटले असते की – मराठी भिकारीण झाली तरीही कुशीच्या तिचा/तिची तीस केवी त्यजि?

      “माझी आई भिकारीण झाली तर ते माझे अकर्तृत्व आहे, माझा दोष आहे”, हे आपण पक्के जाणले पाहिजे. माझ्या आईच्या श्रीमंतीत सातत्याने भर घालणे हे माझे कर्तव्य आहे.

      माधव जुलियनांच्या पुढील ओळी लक्षात ठेवायला हव्यात:

      मराठी असे आमुची मायबोली जरी पारतंत्र्यात ही खंगली I
      हिची थोर संपत्ती गेली उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळी I
      तरी सिंधू मंथूनि काढूनि रत्ने, नियोजू तयांना हिच्या मंडनी I
      नको रीण देवोत देतील तेव्हा जगातील भाषा हिला खंडणी II

      सध्याच्या परिस्थितीत आपल्या भाषेसाठी आणि भाषा बांधवांसाठी योग्य ती कृती करण्यास राज्यशासनाला फक्त आपणच भाग पाडू शकतो.

      मराठी माणसाने स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड टाकून देऊन स्वराज्यात असताना शक्यतो सर्व ठिकाणी मायबोलीत बोलणे, लिहिणे केले पाहिजे. अगदी भाजीवाला, दुकानदार, हॉटेल, टपाल कार्यालय, एटीएम, बॅंका, रेलवे, बस, टॅक्सी, रिक्शा, रस्त्यावर, सरकारी कार्यालयात असे सर्वच ठिकाणी बोलताना आपली भाषाच वापरायची. आपण इतरांना आपली भाषा ऐकवली नाही तर ते ती शिकणार तरी कशी? इतर राज्यांत परप्रांतीय स्थानिक भाषा अशाच प्रकारे शिकतात. 

      अमृतमंथन अनुदिनीवरील विविध लेखकांचे इतर लेखही मराठी संस्कृती-भाषा-माणूस यांनाच वाहिलेले आहेत. अवश्य पहा. आपला अभिप्राय लेखाखाली नमूद करू शकता. म्हणजे त्या संबंधातील चर्चेचा फायदा इतर वाचकांनाही होऊ शकतो.

      अमृतमंथनावरील विविध लेखकांचे लेख नियमितपणे मिळण्यासाठी RSS Feed किंवा गुगल रीडरचा उपयोग करू शकता. आवडलेले लेख आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रांस अग्रेषित करून स्वभाषेसंबंधीच्या स्वाभिमानाचा वणवा पसरविण्यास मदत करावी.

      मराठीप्रेमी सामान्य माणसांच्या विचारमंथनासाठी आणि कृतियोजनेसाठी एखादा विचारमंच सुरू करण्याचा विचार अमृतमंथन अनुदिनीच्या अमृतयात्री गटाद्वारे चालू आहे. अमृतमंथन अनुदिनीवरीललेखांवर लक्ष ठेवा. तशा बिनराजकीय गटात आपणही सहभागी होऊ शकता. आपल्या इतर मराठीप्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा विरोपाद्वारा (through emails) संपर्कात राहण्यास सांगावे.

      भाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे.

      शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. अमृतमंथनावरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख पहा. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.

      कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्‌ I

      आभारी आहोत..

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

  3. Namaskar Salilji,
    Lekh aprateem ahe !!!Gharatlyan-sathi samuhik vachan hi zale…sarvanche dole vispharle gele.
    Avdaylach hava pratyekala asa lihilay tumhi !!!
    Sahdyachi ekun rajkiya paristhiti pahata Marathicha agraha dharnarya va marathi vishayi jivhala vyakta karnarya lokanchi kondit sapadlya sarkhi parasthiti ji nirman keli geli ahe ..asha aeen veli tumcha lekh vachun manala khup khup bare vatle ….Hayse vatle…Anand zala ..ani anandach zala !!!
    Tumcha Lekh abhyas purna ahech pan tyat disun yete te tumche samajik bhan …marathi varche prem…hindi bhashevishyi hi vatnari astha ani (aitihasik) purave-dakhle deun… rokthok vastusthithi kalpaktene mandnyachi tumchi hatoti!!
    Lekh aprateem ahe !!!Gharatlyan-sathi samuhik vachan hi zale…sarvanche dole vispharle gele.
    Avdaylach hava pratyekala asa lihilay tumhi !!!
    Sahdyachi ekun rajkiya paristhiti pahata Marathicha agraha dharnarya va marathi vishayi jivhala vyakta karnarya lokanchi kondit sapadlya sarkhi parasthiti ji nirman keli geli ahe ..asha aeen veli tumcha lekh vachun manala khup khup bare vatle ….Hayse vatle…Anand zala ..ani anandach zala !!!
    Tumcha Lekh abhyas purna ahech pan tyat disun yete te tumche samajik bhan …marathi var che prem…hindi bhashevishyi hi vatnari astha va aitihasik purave-dakhle deun… rokthok vstusthithi kalpaktene mandnyachi tumchi hatoti!!
    Ankhin kay have ???

    Pratyek rajkiya netyanchya table-var asayla hava asa ha lekh ahe.

    Asech lihit raha…

  4. अत्यंत मुद्देसूद आणि माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. भारतीय राजकारणात भाषिक अभिमानाचे रूपांतर प्रांतिय अभिनिवेशात आणि प्रांतिक राजकारणात होते. असे होणे राष्ट्राच्या एकात्मतेला हानीकारक, असे आजवर नेहमीच सांगितले गेले. म्हणजेच भाषाभिमान आणि राष्ट्रवाद या परस्पर विरोधी बाबी ठरतात. त्यांची सांगड कशी घालायची, एवढाच प्रश्न उरतो.

    अभिजित

    • प्रिय श्री० अभिजित मुळ्ये यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण फारच उत्तम प्रश्न विचारलात.

      आपल्या मनातील गोंधळ समजण्यासारखा आहे. पण भाषावार प्रांतरचनेमधील अनेकतेमध्ये एकात्मता, सर्वच राज्यभाषा सारख्या (किंबहुना राष्ट्रभाषेच्याच दर्जाच्या), मातृभाषेचे महत्त्व सर्वाधिक, स्वभाषेचे प्रेम आणि अभिमान म्हणजे संकुचितपणा नव्हे, परप्रांतियांनी ज्या प्रदेशात रहायचे तेथील भाषा व संस्कृतीमध्ये मिसळून जायलाच हवे, ही देशाच्या राज्यघटनेमागील (आणि साधारणतः जगभरातील सर्वच तज्ज्ञांना मान्य असलेली) तत्त्वे मुळापासून जाणून घेतली तर हा सर्वच गोंधळ दूर होईल. (प्रस्तुत लेखातील सर्वोच्च न्यायालयाची अवतरणे अवश्य पुन्हा अवश्य पहावीत.)

      प्रस्तुत लेखाचा उद्देश मुख्यतः घटनात्मक आणि कायदेशीर स्थिती समजावून सांगणे असाच आहे. काय असायला पाहिजे होते; ते सुचवणे असा नाही.

      आम्हाला हिंदी भाषेचा राग नाही, हिंदी जनतेचाही नाही. पण घटनात्मक तरतुदींविषयी गैरसमज करून कोणी जर आमच्या भाषेचे अधिकार डावलून तिची उपेक्षा, अवमान, हेळसांड करीत असेल तर त्याला मात्र प्रखर प्रतिकार करणे हे कार्य मात्र संकुचितपणाचे तर नाहीच उलट कायदेशीर, नैतिक बाबींना आणि मातृभाषेप्रति असलेल्या कर्तव्याला धरूनच आहे, असे लेखक स्पष्ट करू इच्छितो.

      हिंदी ही बहुसंख्यांची भाषा नाही. केवळ इतरांपेक्षा थोडे अधिक भाषक असणारी भाषा आहे. इतर सर्व निकष उदा० भाषेची प्राचीनता आणि संपन्नता, भाषेतील वाङ्मयीन आणि सांस्कृतिक विविधता, साहित्य, अशा विविध निकषांवर इतर काही भारतीय भाषा हिंदीपेक्षा हिणकस तर नाहीच उलट सरसच ठरू शकतात. त्यात पुन्हा हिंदी भाषकांनी स्वातंत्र्यानंतर थोडा वर्चस्वाचा पवित्रा घेणे सुरू केले. म्हणूनच इतर भाषक बिथरले आणि त्यांनी हिंदीला कडकडून विरोध केला.

      केवळ भाषकसंख्या अधिक या निकषावर चीनी (मॅंण्डॅरिन) भाषा ही जगाची संपर्क भाषा अशी घोषित करून सर्व देशांनी त्याच भाषेत एकमेकांशी संवाद साधणे अनिवार्य केले तर इतर भाषक ऐकतील का? मग जे साध्या संपर्क-भाषेच्या बाबतीत शक्य नाही ते राष्ट्रभाषा म्हणून इतरांच्या डोक्यावर परभाषा बसवण्याच्या बाबतीत शक्य होणे भारतातही अधिकच कठीण नाही का?

      हिंदी ही राष्ट्रभाषा, ती इतर राज्यभाषांच्यापेक्षा श्रेष्ठ, देशप्रेम केवळ हिंदीमधूनच व्यक्त करता येते, हिंदी भाषा न जाणणारे देशविरोधीच होत, “हिंदी नको-आम्ही आमचीच भाषा बोलणार” असे म्हणणारे देशविरोधी, हिंदी ही मराठी व इतर भारतीय भाषांपेक्षा अधिक पुढारलेली, प्रगत व संपन्न भाषा आहे, देशात हिंदी भाषा बहुसंख्यांना समजते, देशाला एकच राष्ट्रभाषा असायला हवी, असे जे गैरसमज जबरदस्तीने मनावर पक्के बसवले आहेत त्याचा फोलपणा विचारपूर्वक दूर केला की मग सर्वच सहजपणे स्पष्ट होते आणि मन हलके होते.

      पूर्वी देवाचे श्लोक संस्कृतमध्ये म्हटले तरच देवाला समजतात व आवडतात; नाही तर ते पाप ठरेल, देवाचा कोप होईल अशी समजूत होती. पण आज आपल्याला पक्के माहित आहे की देवाला संस्कृत, मराठी, कोकणी, तमिळ, इंग्रजी, झुलू, स्वाहिली अशा सर्वच भाषा सारख्या. भावना शुद्ध पाहिजेत. आणि मनातील भावना स्पष्टपणे, मोकळेपणाने आपण आपल्याच मातृभाषेतूनच व्यक्त करू शकतो. मग आपण त्याच भाषेतून व्यक्त केलेल्या भावना देवाला अधिक नीट समजणार. तसाच हा स्वभाषेतून देशाभिमान व्यक्त करण्याचा प्रकार झाला.

      या वरून स्पष्ट होईल की भाषावाद आणि राष्ट्रवाद यातील सांगड घालण्याचे कष्ट मुद्दाम करायला नकोतच. राष्ट्रवाद आणि भाषावाद हे एकमेकाला छेदत नाहीतच. उलट ते पूरकच आहेत किंबहुना एकाच भावनेचे दोन भिन्न अविष्कार आहेत. वैष्णव आणि शैव यांना शेवटी जेव्हा ईश्वरतत्त्व एकच आहे हे मान्य झाले; तेव्हा त्यांच्या मधील द्वेषभावना संपल्या. ईश्वर, अल्ला, येशू ह्यांच्या मधील अद्वैत जर मान्य झाले तर या इतर बाबी (मातृभूमिप्रेम आणि मातृभाषाप्रेम या संकल्पनांमधील नाते) फारच सोप्या आहेत.

      मी माझ्या आईचा मुलगा आहे म्हणूनच तिच्या आईचा म्हणजे माझ्या आजीचा नातू आहे. म्हणजे एकाच वेळी माझे आईशी व आजीशी नाती आहेत. मी दोन्ही नाती एकावेळीच स्वीकारतो, मानतो आणि मला दोन्ही नात्यांचा एकाच वेळी अभिमान वाटतो. किंबहुना मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला त्याच क्षणी, त्याच घटनेमुळे मी माझ्या आजीचा नातूसुद्धा झालो. माझा मावसभाऊ हा सुद्धा माझ्या आजीचा नातूच आहे; जरी तो माझ्या आईचा मुलगा नसला तरीही. आणि आम्ही दोघेही आमच्या आजीवर सारखेच प्रेम करतो. या सर्व विधानांमध्ये आपल्याला काही अंतर्गत प्रतिषेध (internal contradiction) आहे असे वाटते का? त्याचप्रमाणे मी महाराष्ट्रीय आहे; म्हणूनच मी भारतीय आहे. मी एकाच वेळी महाराष्ट्रीय आणि भारतीय आहे आणि या दोन्ही निष्ठांचा मला अभिमान वाटतो, ही सर्व विधानेही सुसंगतच आहेत. त्यांत आपल्याला जबरदस्तीने, ओढून-ताणून, कृत्रिम प्रकारे, सांगड घालण्याची आवश्यकताच नाही.   

      पूर्वीच्या (स्वातंत्र्योत्तर) काळच्या विविध तज्ज्ञ समित्यांचे अहवाल शोधून मुद्दाम वाचा. ते म्हणजे अत्यंत बुद्धिमत्ता, मानवता, समता, भावनिक एकात्मता अशा विविध उत्तमोत्तम निकषांवर आधारलेले श्रेष्ठ ग्रंथच आहेत. ते सर्व महात्मा गांधींच्या समाजकारणाच्या मूळ तत्वांना फार महत्त्व देतात. त्यातील काही अंश वाचल्यावरसुद्धा त्या थोर तज्ज्ञांचे श्रेष्ठत्व समजते व मन गहिवरून येतं.

      हिंदी भाषा झालीच तर ती भारताची एक संपर्क भाषा होऊ शकते; किंबहुना व्हावी. पण त्यासाठी हिंदीने आपली सम्राटाची भावना सोडून देऊन भावाची (किंवा भाषाभगिनीची?) भूमिका घ्यायला हवी. इतरांनी हिंदी शिकायचे असेल तर हिंदी राज्यांतही शाळांमध्ये हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त एक भारतीय भाषा शिकणे अनिवार्य असावे (असा प्रस्ताव होताच; पण हिंदी पुढार्‍यांनी तो मानला नाही.) इतर काही देशांत बहुभाषिकत्व असतं. हल्ली आधुनिक जगात (विशेषतः युरोपात) बहुभाषिकत्वाला खूप उत्तेजन दिले जाते. मात्र त्यापैकी कोणीही स्वतःच्या मातृभाषेचे महत्व यत्किंचितही कमी करीत नाहीत. युरोपात इंग्रजी बोलणारे देश फारसे नाहीतच. पण जागतिकीकरणाच्या नावावरही कोणी स्वतःची भाषा बाजुला करून इंग्रजीत शासनव्यवस्था, शिक्षण, संशोधन इत्यादी करीत असल्याचे ऐकिवात नाही.

      तेव्हा कृपया भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्पर-विरोधी (self-contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) नाहीत; हे नीट समजून घेणे, हे आतुन उमजणे फार महत्त्वाचे आहे. तसे झाल्यावर “ईश्वर-अल्ला तेरो नाम” याचप्रमाणे “मराठीप्रेम-हिंदीप्रेम-तमिळप्रेम-बंगालीप्रेम ही सर्व भाषाप्रेमाचीच नामे – सबको सन्मति दे भगवान” असे आपण शुद्ध अभिमानाने आणि अपराधी भावना मनात न आणता म्हणू शकू.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

  5. नमस्कार

    आपला लेख वाचला. मराठी भाषेच्या दुर्गतिला राजकिय नेत्यांबरोबर आपण सर्वजण जबाबदार आहोत. ही जबाबदारी कोण पेलणार हाच खरा प्रश्न आहे. भारतीय भाषेशी तुलना करता मराठी हिंदी मुळे नाही तर इंग्रजीच्या मोहामुळे व अक्षम्य हव्यासामुळे मागे पडली आहे. भारतीय भाषेत वैर निर्माण करणे हे परकियांना केव्हाही आवडेलच. आपण जर भारतीय भाषांचा इतिहास वाचला तर भारतीय भाषांना विकसित करण्यामागे सामान्या नागरीक, संत, व्यापारी व नंतर साहित्यिक लोक येतात हे ध्यानात घेतले पाहिजे. पुस्तकी भाषे बरोबरच लोक व्यवहारातुन भाषेचा विकास होत असतो. त्यामुळे राष्ट्रभाषा हिंदी बरोबर स्पर्धा करण्यात अर्थ नाही. आपण जर केंद्रीय भारतीय भाषा संस्थान, म्हैसूर व जनगणनेचे आकडे पाहिले तर देशात हिंदीचे स्थान सर्वोच्च आहे. भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने काय केले आहे हे पाहिले पाहिजे. अजुन मराठी माहिती जाल व तंत्रांत हिंदी व इंग्रजी पेक्षा खुप मागे आहे. मातृभाषेचा मान प्रथम पंरतु देशाचा विचार कराल तेव्हा हिंदीचे महत्व कमी लेखु नका. मराठीच्या अस्मितेमुळे शेवटी भले हिंदीचे ही होईल कारण दोन्ही भाषेची लिपि देवनागरी आहे. विनोबा भावे यांचे स्वप्न पूर्ण होउ शकेल. आपल्या चळवळीला शुभेच्छा कारण मराठीचा मान राखाल तेव्हाच आपण हिंदीचा मान ऱाखू. भारतीय घटनेतील अष्टम सूचितील २२ भारतीय भाषा या राष्टीय भाषाच आहेत. राजकारणामुळे हिंदीची गोची झालेली आहे.

    • प्रिय श्री० विजय प्रभाकर कांबळे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत.

      आपली बरीच विधाने पटली, मात्र काहींच्याबद्दल आमची माहिती व मते भिन्न आहेत. अर्थात आपल्या प्रत्येक विधानावर सविस्तर विवेचन करायचे म्हणजे तो एक मोठाच लेख होईल त्यामुळे इथे तपशीलवार विवेचन करीत नाही. मात्र आपण हिंदीच्या तुलनेत मराठीला देत असलेले गौणत्व तर अजिबातच पटत नाही. किंबहुना केवळ लोकसंख्येच्या टक्केवारीचा आकडा थोडा अधिक; एवढे सोडले तर प्राचीनता, संपन्नता, इतिहास अशा कुठल्याही निकषावर भारतातील इतर अनेक भाषा हिंदीपेक्षा उजव्या ठरत असल्यामुळेच विविध भाषकांनी हिंदीच्या दडपशाहीला विरोध केला व या मुद्द्याबद्दल हिंदीच्या पाठिराख्यांकडेसुद्धा भाषक संख्येच्या आकडेवारी शिवाय इतर काहीही तर्कशुद्ध प्रतिवाद नव्हता. म्हणूनच तर हिंदीवाद्यांना राष्ट्रभाशेच्या स्पर्धेत माघार घ्यावी लागली. या विषयावर अनेक समाजकारण्यांनी व विचारवंतांनी लेखन केलेले आहे. वाचून पहावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. आपणांस माझी काही मते पटली याबध्दल धन्यवाद. नवीन पिढीवर माध्यमांचा झालेला हिंदी व इंग्रजीचा प्रभाव आपण कमी करु शकू असे मला मुळीच वाटत नाही. माझी मातृभाषा मराठी आहे व मला तिचा अभिमान आहे.आमचे पूर्वज संत महिपति महाराज (कांबळे,कुलकर्णी,ताहराबादकर) यांनी मराठी अनेक ग्रंथांची रचना केलेली आहे. त्यात संतलिलामृत, भक्तिविजय आदि ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. संत चरित्रांचा अभ्यास करताना त्यांच्या ग्रंथांचा आधार घेतला जातो. परंतु आमचे अनेक किर्तनकार सांगतात की महाराजांनी हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवले होते कारण धर्म प्रचारांत हिंदी संतांनी खुपच महनीय कार्य केले आहे. त्यामुळे संत तुकाराम, नामदेव या संता बरोबर तत्कालीन शिवाजी महाराज, पेशवे यांनी सुध्दा हिंदीचा आदरच केला आहे. तर मग आताच आपण काही राजकारणी लोकांच्या वक्तव्यांने हिंदीला विरोध का करायचा. आपण भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेले राष्ट्रभाषा से राजभाषा तक हे पुस्तक वेळ मिळाल्यास जरुर वाचा(लेखक – डॉ.विमल कांति वर्मा) यात लोकसभेत झालेल्या चर्चेचा संपूर्ण वृत्तांत दिलेला आहे. हा सरकारी पुरावा आहे. त्यामुळे हिंदी बाबत अनेक गैरसमज दूर होतील. हिंदीला विरोध केल्याने मराठी भाषा समृद्ध होणार नाही तर भारतीय भाषा भगिनीतील सहयोग व समन्वयामुळे मराठी भाषा विकसित होईल. आपण आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेकडे पहात आलो. आशियातील देशांपेक्षा जसे आपले लक्ष्य फक्त अमेरीके कडे जास्त असते. हिंदीच्या विकासाकरीता भारत सरकारने काय काय केले आहे याचा मागोवा घेऊन मराठी विकासाची तुलना व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे.

    • प्रिय श्री० विजय प्रभाकर कांबळे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

      आपण म्हणता:
      {नवीन पिढीवर माध्यमांचा झालेला हिंदी व इंग्रजीचा प्रभाव आपण कमी करु शकू असे मला मुळीच वाटत नाही.}
      कृपया याच अनुदिनीवरील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख वाचून पहावा. त्यानंतरही आपले हेच मत कायम असले तर आम्हाला त्यावर काहीही म्हणणे योग्य होणार नाही.

      {तत्कालीन शिवाजी महाराज, पेशवे यांनी सुध्दा हिंदीचा आदरच केला आहे.}
      १. शिवाजी महाराजांच्या काळी हिंदी आणि उर्दू भाषा अस्तित्वात नव्हत्या.
      २. त्यावेळी मराठीवर झालेल्या फारशी व अरबी भाषांच्या आत्यंतिक प्रभावामुळे महाराज फारच व्यथित झाले होते व म्हणूनच चिडून जाऊन भाषाशुद्धीसाठी त्यांनी मराठीतील किंबहुना भारतीय भाषेतील पहिला शब्दकोश (राज्यव्यवहारकोश) सिद्ध करविला. याबद्दल सविस्तर माहिती इतिहासकार राजवाडे व इतर अनेक इतिहासकारांच्या पुस्तकात आढळते.

      {तर मग आताच आपण काही राजकारणी लोकांच्या वक्तव्यांने हिंदीला विरोध का करायचा.}
      प्रस्तुत लेख पुन्हा वाचून हिंदीला ’विरोधासाठी विरोध’ अशी कुठली वाक्ये आपल्याला आढळतात ती दाखवून द्यावीत. स्वभाषाभिमान, तिचा आदर, मान, महत्त्व राखणे व त्याविरुद्ध कोणीही बेकायदेशीरपणे वागून आमच्या भाषेची उपेक्षा करीत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे ह्यात राजकारणी लोकांच्या वक्तव्यामुळे हिंदीविरोध आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. तसा विनाकारण गैरसमज करून घेऊ नये.

      {त्यामुळे हिंदी बाबत अनेक गैरसमज दूर होतील. हिंदीला विरोध केल्याने मराठी भाषा समृद्ध होणार नाही तर भारतीय भाषा भगिनीतील सहयोग व समन्वयामुळे मराठी भाषा विकसित होईल.}
      डॉ० बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक विद्वानांनी या विषयावर लिहिलेली पुस्तके आपण वाचू शकता. अनेक विद्वानांनी “त्याकाळी तमिळ, मराठी, बंगाली अशा भाषा हिंदीहून अधिक प्राचीन व अधिक संपन्न होत्या अशी स्पष्ट विधाने केलेली आहेत. याच अनुदिनीवर प्रकाशित झालेला ’द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित’ हा डॉ० आंबेडकरांच्या पुस्तकातील उतार्‍यावरील लेख मासल्यासाठी वाचून पहावा. त्यांच्याही पुढे जाऊन अधिक वाद घालण्याची आमची स्वतःची लायकी आहे असे आम्ही मानत नाही.

      {आपण आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेकडे पहात आलो. आशियातील देशांपेक्षा जसे आपले लक्ष्य फक्त अमेरीके कडे जास्त असते.}
      दुर्दैवाची पण खरी गोष्ट आहे.

      {हिंदीच्या विकासाकरीता भारत सरकारने काय काय केले आहे याचा मागोवा घेऊन मराठी विकासाची तुलना व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे.}
      १. महाराष्ट्र राज्यशासनाचे आपले कर्तव्य पार पाडण्याच्या बाबतीतील अपयश हे हिंदीचे श्रेष्ठत्व किंवा मराठीचे गौणत्व कसे सिद्ध करू शकते?
      २. घटनेतील तरतुदींप्रमाणे अनुसूची-८ मधील सर्व भाषांचे (संबंधित राज्य शासनाच्या मदतीने) वेगाने संवर्धन करणे व त्या आधुनिक ज्ञानाच्या दळणवळणाचे प्रभावी माध्यम होण्याच्या दृष्टीने योग्य ती कृती करणे यासाठी स्वतः केंद्र सरकार बांधील आहे.

      असो. आपण एकमेकांच्या मतातील भिन्नता मान्य करून हा वाद इथेच संपवुया.

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. 1) Those who wish to know as to how Hindi became India’s official language will do well to read Kuldip Nayar’s ‘Between the Lines’. He has devoted 60 pages to this topic.
    2) All references to ‘Hindi’ as Rashtrabhasha appearing in School textbooks should be corrected.
    3) Maharashtra Rashtrabhasha Sabha, Pune, and Rashtrabhasha Prachar Samiti, Wardha, have misleading names. They should call themselves ‘Maharashtra Adhikrut Bhasha Sabha, Pune, and ‘Adhikrut Bhasha Prachar Samiti, Wardha, respectively. If the state Govt. is giving them any grants, such grants should be diverted towards promotion of Marathi.

    • प्रिय श्री० देसाई यांसी.

      सप्रेम नमस्कार.

      आभारी आहोत. आपली सर्व मते योग्यच आहेत.

      मराठी शाळांना ५ वर्षे अनुदान न देऊ शकणार्‍या शासनाला इतर परभाषांना अनुदान देण्याचा हक्कच काय?

      आपण दैनिक सामना मधील अधिकृत भाषा कायद्याबद्दलचा लेख पाठवणार आहात. आम्ही सर्वच वाट पाहत आहोत.

      आपल्याप्रमाणेच बहुसंख्य स्वाभिमानी मराठी व्यक्तींनी यथाशक्ती विविध मराठीच्या उपक्रमात भाग घेतला, पाठिंबा दिला तर मराठीची सध्याची नामुश्कीची परिस्थिती बदलण्यास फार काळ लागणार नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० स्वप्निल कोल्हे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्याला लेख आवडला हे समजून फार आनंद झाला. त्या लेखातील भावनांचा तुम्हीआम्ही मिळून अधिकाधिक प्रसार करूया. तरच सध्याच्या परिस्थितीमधून काही मार्ग काढता येईल. स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा हे मराठी माणसावर लादलेले जोखड भिरकावून देऊन आपण उघडपणे आपला भाषाभिमान सर्वत्र व्यक्त करू, आपल्या प्रत्येक वाक्यातून ध्वनित करू.

      ह्याच अनुदिनीवरील इतर लेखही “मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस…” ह्या सूत्रातच गुंफलेले आहेत. सवडीने अवश्य वाचा. जे लेख आवडतील त्यांच्याबद्दल इतर मित्रांनाही माहिती द्या. आपली मते लेखांखाली नोंदवा. आपल्या स्वाभिमानाच्या भावनांचा आपण सर्वत्र प्रसार करूया.

      आपल्या अमराठी मित्रांना आपण खालील लेख अग्रेषित करू शकता.

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/25/hindi-the-national-language-–-misinformation-or-disinformation/

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/13/linguistic-policy-in-banking-sector-a-case-of-complete-neglect-in-maharashtra/

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले पत्र वाचून आनंद वाटला. प्रस्तुत लेखाने जास्तीतजास्त मराठी माणसांच्या मनातील शंका, कुशंका, संशय, न्यूनगंड, अपराधी भावना, नष्ट होऊन स्वभाषा, स्वसंस्कृतीबद्दलचा अभिमान वाढावा अशीच इच्छा आहे. आपणही त्यास मदत करावी.

      ह्याच लेखाच्या आधीच्या आवृत्तीबद्दलही अशाच पद्धतीच्या अनेक विचारांची देवाणघेवाण झाली होती. तीदेखील खालील दुव्यावरील लेखाच्या खाली आपण वाचू शकता.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/21/15/

      “हिंदी राष्ट्रभाषा? एक चकवा !!” ह्या लोकसत्तेमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा लोकसत्तेतील उत्तरार्ध व त्यावरील उहापोह खालील दुव्यावर वाचू शकता.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

      आपल्याला लेखातील विचार पटल्यास कृपया तो लेख अधिकाधिक मराठीप्रेमी बांधवांना अग्रेषित करावा ही विनंती.

      आत्यंत आभारी आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  8. नमस्कार!
    सर्वप्रथम मी google चे आभार मानिन ज्याने माला असला मौल्यवान ब्लॉग शोधून दिला.

    खरच खूपच छान मुद्दे मांडले गेले आहेत. मला सगळ्यात जास्त आवडले ते “अमृतमंथन गटाचा” खूपच सुरेख प्रतिसाद! तुम्ही लोक खरच खूप छान काम करित आहात. माझ्या आणि आमच्या “मराठी कॉर्नर” टिमच्या तुम्हाला खूप-खुप शुभेच्छा!

    • प्रिय मराठी कोपरा/कोन/कोनाडा/सांदी/बळद संघ यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार.

      मराठी माणसांच्या या उपक्रमाला आम्ही सुयश चिंतितो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट