संगीताची मुळीच आवड नाही अशी व्यक्ती आज सापडणे कठीण. आपल्यासारख्या सामान्य रसिकांना संगीताची आवड असते आणि त्यातील अनेक गूढ, तांत्रिक नियमांबद्दल कुतूहलही असते. ‘सा’ म्हणजे काय? संवादिनीच्या (बाजाच्या पेटीच्या) कुठल्याही पट्टीला ‘सा’ म्हणता येईल असं म्हणतात, ते कसं? वरचा सा, खालचा ‘सा’ म्हणजे काय? एखादा गायक ‘काळी एक’ या पट्टीमध्ये गातो तर एखादी गायिका ‘काळी तीन’ या पट्टीत गाते; असे कधीकधी ऐकू येते, त्याचा अर्थ काय? पाश्चात्य स्वर व भारतीय स्वर यांमध्ये साम्य व भेद कोणते? असे अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्याला पडत असतात, पण आपल्याला ते समजण्यातले नाही असा विचार करून आपण ते कुतूहल तसंच दडपून टाकतो. पण संगीतशास्त्रातील स्वरांच्या गणिताबद्दलच्या खालील लेखामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील.
संगीत ही एक कला खरी. त्यात निपुण व्ह्यायचे म्हणजे गुरूकडून शिकून ती अभ्यासानेच आत्मसात होते. पण त्या कलेमधील शास्त्राचा भाग समजून घेतल्यास ती कला शिकण्यास किंवा निदान तिचे रसग्रहण करण्यास सोपे जावे. संगीतातील स्वरांचे गणित हे आपल्यासारख्या सामान्यजनांनाच नव्हे तर काही संगीत बर्यापैकी अवगत असणार्यांनासुद्धा कधीकधी नीटसे माहित नसते.
प्रस्तुत लेखाचे लेखक प्रा० मनोहर राईलकर हे पुण्याच्या स० प० महाविद्यालयात गणित विभागाचे प्रमुख होते. शिशुवर्गापासून ते महाविद्यालयातील एम०एससी० वर्गांपर्यंतच्या मुलांबरोबर त्यांचा गणित शिकवण्याच्या बाबतीत संबंध आला. अशा या गणिताच्या तज्ज्ञाने संगीतातील स्वरांचे गणित आपल्याला उकलून, सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
संपूर्ण लेखासाठी खालील दुवा पहा.
I read his article and I would like to have some words with Prof. Railkar on this subject. Can I have his email id?
Thanks.
प्रिय श्री० सरदेसाई साहेब,
सप्रेम नमस्कार.
आपल्याला पाठवलेला विरोप (email) परत आला. आपण कृपया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर लिहाल काय?
क०लो०अ०
अमृतयात्री