स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे….

वरील विषयावर आम्हा मराठीप्रेमी मित्रांच्या रिंगणात चर्चा चालली असताना खालील मते मांडली गेली. त्याबद्दल आपल्याला काय वाटते? जरूर लिहा.

श्री० सलील कुळकर्णी म्हणाले:

१. स्थानिक मराठी माणूस परप्रातीयांपेक्षा, विशेषतः भय्या मंडळींपेक्षा आळशी आहे यात शंका नाही. ही गोष्ट समर्थनीय नाही. आज जगात प्रगतीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा, परिस्थितीशी जमवून घेण्याची वृत्ती हे गुण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. पण मराठी आणि परप्रांतीयांशी तुलना करताना फक्त एवढीच गोष्ट लक्षात न घेता या भोवतीची इतर संबंधित वस्तुस्थितीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे.

२. एका ठिकाणचा सर्वसामान्य माणूस दुसर्‍या ठिकाणी जातो तेव्हा त्यात त्याच्या मूळ गावी असणारी कसली तरी कमतरता आणि जाण्याच्या गावी असणारी संधी, सुबत्ता इत्यादी मुद्द्यांची पार्श्वभूमी असते. सर्व भारतभरातील माणसे मुंबईत येतात तशी ती बिहार, आसाममध्ये जात नाहीत. परराज्यांत जाणारा माणूस हा पोटाशी जिद्द आणि महत्त्वाकांक्षा बाळगूनच जात असतो. स्थानिक माणसात ती भावना कमी असते.

३. जिद्द, चिवटपणा (अगदी लोचटपणासुद्धा) हे गुण भय्या मंडळींच्या बाबतीत अधिकच आढळतात कारण त्यांच्या राज्यांत गरीबी आणि नोकरीची वानवा तर आहेच पण सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसुद्धा अत्यंत दयनीय पातळीला पोचली आहे. मागासलेपणा व गरीबी ही परिस्थिती इतर अनेक राज्यांत आहे. पण उ०प्र व बिहारच्या बाबतीत पोलिसदल तर स्थानिक धनदांडगे, जमीनदार आणि राजकीय पुढारी यांच्या आदेशाप्रमाणेच कामे करते. शिवाय सामान्यांस न्याय मिळण्याची फारशी आशा न वाटावी अशी पोखरलेली न्यायसंस्था हीदेखिल लोकांना नाईलाजाने स्वीकारावी लागणारी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सामान्य माणसाला अशा प्रदेशांत स्वतःचा पैसा आणि संपत्तीचीच नव्हे तर स्वतःच्या बायको-मुलींच्या शीलरक्षणाची देखिल शाश्वती नसते. (सध्या चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकरांच्य़ा हत्येसाठी हत्यारे आणि मारेकरी हे सर्वच खास उत्तर प्रदेशातुन ’आयात’ केले गेले होते हे वास्तव बरेच काही सिद्ध करते.) त्यामुळे अशा माणसांना महाराष्ट्रासारखी राज्ये, जिथे सुरक्षाव्यवस्था जरा बरी आहे, एकमेकांना आधार देणारी त्यांची स्वभाषिक माणसे (आणि राजकीय पुढारीदेखिल) आहेत, (आणि शिवाय महाराष्ट्राच्या बाबतीत विशेष म्हणजे, स्थानिक माणसांमध्ये अस्मितेच्या प्रश्नांवर परस्परविरोधी मतांतरे आहेत), अशा ठिकाणी जाणे हे निश्चितच अधिक सोयीचे ठरते. महाराष्ट्रात सुरुवातीस थोडा त्रास सहन करावा लागला तरीही परत गावी जाण्यापेक्षा इथेच अर्धपोटी राहिलेले बरे अशी भय्यांची मनोवृत्ती असते.

४. मी आयआयटीच्या निमित्ताने  बंगालात ५ वर्षे काढली आहेत आणि भारताच्या इतर राज्यात तसेच काही परदेशांमध्ये फिरलो आहे. तेथील अनुभवांवरून मला असे सांगावेसे वाटते की महाराष्ट्राप्रमाणेच स्थानिक बंगाली माणूस हा आळशी समजला जातो. बंगाली माणसाला देखिल उद्योगधंद्यापेक्षा नोकरीत, विशेषतः सरकारी नोकरीत (बाबुगिरीचा पेशा, कारकुनीत) अधिक रस असतो. बंगालातही धंदेवाईक मालक, कोट्याधीश, हा गेल्या शतकाहून अधिक काळापासून सहसा मारवाडीच असतो आणि अंगमेहनतीचे काम (ज्यात फारशी बुद्धी किंवा शिक्षणाची आवश्यकता नसते) करणारा सहसा शेजारच्याच बिहार किंवा ओरिसा राज्यातील असतो. पण ते मुंबईप्रमाणे तिथे संख्येच्या बळावर दादागिरी करण्याचा विचारही करू शकत नाहीत. तेथील भाषा, संस्कृती, रीतिरिवाज यांच्या परिघात राहणे त्यांना मान्य असते, त्यांना राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात विशेष महत्व नसते. (हा मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत एक मोठा फरक आहे.) १९७०-७५ साला पर्यंत ही परिस्थिती मुंबईत होती. दूधवाला आणि भाजीवाला भय्या मान खाली घालूनच रहात असे. थोड्याअधिक प्रमाणात हीच कथा ओरिसा, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, येथे आज दिसून येते. केरळ आणि बंगालमधील कम्युनिस्ट प्रभावामुळे लहानसहान बाबतीतही हक्काच्या मागण्यांसाठी संप करण्याची वृत्ती आढळते. एकंदरीत स्थानिक माणूस हा सहसा सुस्त, (आळशी?), मेहनतीपेक्षा हक्कांच्या बाबतीत अधिक जागरूक, असाच असतो. त्याउलट बाहेरून पोट भरण्यासाठी आलेला माणूस हा अधिक मेहनती, पैशासाठी कुठलेही (अतिमेहनतीचे, तसेच कधीकधी पैशासाठी श्लाघ्य-अश्लाघ्य) आणि कितीही काम करण्याची तयारी असणारा असा असतो.

५. स्थानिक माणसाला थोडे मानसिक स्थैर्य असते, तो परप्रांतीयांएवढा आत्यंतिक आणि पेटलेला (desperate) नसतो. शिवाय त्याचा सर्व गोतावळा त्याच्या अवतीभवती असतो. त्यांच्या समोर तो कमी प्रतीचे समजले जाणारे (“शुद्ध मनाने केलेले कुठेलेही काम कमी प्रतीचे नसते” हे सुभाषित सध्या बाजूस ठेऊ) करण्यास नाराज असतो. त्याच्या पूर्वजांची शेखी त्याने मित्रमंडळींकडे मारली असते तीही आड येते. शिवाय आड मार्गाने पैसा मिळवायलादेखिल तो भय्यांपेक्षा दोनवेळा अधिक विचार करत असेल. (पुण्यात गेल्या तीन वर्षात गुन्हेगारी अचानक फार वाढली आहे आणि घरफोडी, हत्या यांसारखे गंभीर करणार्‍यांत भय्यांचे प्रमाण अधिक आढळते.) कारण आजुबाजूला त्याला ओळखणार्‍या लोकांची त्याला लाज असतेच. भय्यांना तसे इथे कोणी विचारत नाही. आणि त्यांच्या स्वमुलुखातील संस्कृतीतदेखिल पैसा आणि सत्ता हा गुणे इतर गुणांहून फारच वरचढ समजला जातो. त्यामुळे त्यांच्या मनात इथे नैतिक दबावही कमी असतो. येनकेन प्रकारेण पैसे मिळवण्यास ते इथे येतात आणि त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. (अगदी ५-१० हजारातही माणसाची हत्या करणार्‍या भय्यांबद्दलही मी वर्तमानपत्रांत वाचलेले आहे. कदाचित उ०प्र० बिहारमधील अत्याचारापेक्षा महाराष्ट्रातील तुरुंगही त्यांना स्वर्गीय वाटत असावा.)

६. जी कथा इतर राज्यांची तीच इतर देशांची. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्विट्‌झरलंड या सर्वच ठिकाणचा माणूस आळशी समजला जातो. (त्याला जपान हा अपवाद असावा. आणि चीन म्हणजे आणखी एक वेगळाच प्रकार. तेव्हा या दोघांना बाजूस ठेऊ.) इंग्लंडमधील कमी शिकलेले पण गडगंज पैसा कमावलेले गुजराथी, पंजाबी हे नेहमीच स्थानिक इंग्रजांना हसतात आणि स्थानिक इंग्रजांना आळशी, अक्कलशून्य, अव्यवहारी, कामचुकार, अमहत्वाकांक्षी, अल्पसंतुष्ट अशाच विशेषणांनी वर्णितात. त्याउलट स्थानिक इंग्रज बाहेरील अशा (निर्वासित) मंडळींना असंस्कृत, शिष्टाचारविहीन, आमच्या नोकरी-व्यवसायांवर गदा आणणारी, इथे पैसे कमवून तो इथेच न खर्च करता स्वदेशात घेऊन जाणारी माणसे, अशाच शब्दांमध्ये नावे ठेवतात. दोन्ही बाजू पूर्वग्रहदूषित पद्धतीने अतिरेकी विचार करतात. जी परिस्थिती लंडनमध्ये तीच ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका इत्यादी देशात आढळते. सर्व भारतीय मंडळी ही त्यांच्या दृष्टीने बिहारी भय्येच होत. सध्या ऑस्ट्रेलियात होणार्‍या वांशिक झगड्यांमागेदेखिल अशाच भावनांची पार्श्वभूमी आहे.

७. स्थानिक लोक आळशी व बाहेरून पैसे कमावण्याच्या निमित्ताने आलेली मंडळी कामसू, ही वस्तुस्थिती केवळ महाराष्ट्रातच दिसते असे नव्हे तर त्याबद्दलच्या कथा बंगाल, आसाम, ओरिसा, कर्नाटक, हिमाचल, मध्य प्रदेश, तमिळनाडू एवढेच नव्हे तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्विट्झरलंड, अमेरिका येथे पैसे कमावण्यासाठी गेलेल्या मूळच्या भारतीय पाहुणेमंडळींकडूनही ऐकू येतात. बिहारी, उ०प्र०, मारवाडी, बंगाली इत्यादी लोक स्वतःच्या राज्यातही तेवढेच उद्योगी असते तर त्यांनी आपल्या राज्याची महाराष्ट्राच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रगती करायला पाहिजे होती. पण आपले काही स्वाभिमानशून्य नेते म्हणतात त्याप्रमाणे केवळ महाराष्ट्राची प्रगती करून देण्याच्या परोपकारी वृत्तीनेच ती मंडळी स्वतःचे राज्य सोडून महाराष्ट्रात येतात व आम्हासारख्या आळशी, नालायक, स्वाभिमानशून्य, लोकांच्या राज्याची प्रगती करून देतात. ज्याप्रमाणे भारतीय माणूस हा परदेशात व्यवसाय, उद्योग, व्यवस्थापन, शिक्षण, संशोधन अशा विविध क्षेत्रात बर्‍यापैकी पुढे असला तरी स्वदेशात मात्र तो बर्‍याच प्रमाणात आळशी, कामचुकार, बेशिस्त, अप्रामाणिक, भ्रष्ट असाच आढळतो.

८. बरं, एकदा अशा प्रकारे एखादा परप्रांतीय माणूस येनकेन प्रकारेण सांपत्तिक दृष्ट्या प्रगत झाल्यावर त्यांची पुढली पिढी कशी असते? ती तेवढेच कष्ट करायला तयार असते का? अबू आझमी हा काय होता आणि आज कुठे, कसा पोचला याबद्दल मी इथे सविस्तरपणे लिहित नाही. पण त्याचा मुलगा दिलिप छाबरियाच्या मुलाबरोबर दुबईमध्ये चरस-प्रकरणात पकडला गेला. फार मोठी किंमत देऊन आणि फार वरच्या पातळीवर निस्तरानिस्तर करून त्याला अबू आझमीने सोडवले. तो आज आपला बाप त्याच्या वयात ज्या पद्धतीने कठोर परिश्रम (वैध किंवा अवैध असण्याचा मुद्दा बाजूला ठेऊ) करू शकेल काय? कृपाशंकर सिंहाचा मुलगा भाजी विकेल काय? लालूची मुले दररोज उठून गाईचे दूध काढतील काय? त्यामानाने बुद्धी, शिक्षण, धंदेवाईक चातुर्य, चिकाटी अशा प्रकारच्या गुणांमुळे वर आलेल्या इतर गुजराती, पंजाबी, मारवाडी, शेठांच्या मुलांची परिस्थिती त्यामानाने कितीतरी बरी असते.

९. थोडक्यात म्हणजे, माझ्या मते परप्रांतीयांनी बाहेरून नोकरी धंद्यासाठी येण्याबद्दल काहीच अयोग्य नाही. पण त्यांनी स्थानिक लोकांची भाषा, संस्कृती, रीतिरिवाज, पद्धती, स्वभाव, भावना, शिष्टाचार यांचा आदर करायलाच पाहिजे. त्यांनी इथले कर भरावेत, स्वकष्टाने राहण्याचे घर आणि इतर सोय़ी मिळवाव्यात. राजकारण्यांनी त्यांना चुचकारण्यासाठी स्थानिक मंडळींच्याहून अधिक विशेष सवलती त्यांना देणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. काही इस्लामी राज्यात, तेथिल स्थानिक जनतेपैकीच पिढ्यान्‌पिढ्या राहणार्‍या, पण इतर धर्माचे अनुयायी असणार्‍या, स्थानिक माणसांवर जिझिया कर लादला जातो. पण स्थानिकांच्या पैशावर त्यांच्याही पेक्षा परप्रांतीयांना विशेष सवलती देऊन अप्रत्यक्षपणे स्थानिकांवरच जिझियासारखा कर लादणारा महाराष्ट्र हा एकमेव प्रांत असेल.

१०. ०३-जून-२००९ च्या टाईम्स मधील “When in England, speak English” ही बातमी पाहिली का? त्या बातमीत असे म्हटले होते, – England allrounder Andrew ‘Freddie’ Flintoff says it annoys him when migrant hotel staff in England are unable to communicate in English.  “It annoys me when I phone a hotel receptionist in my own country and they don’t understand what I’m saying because they don’t speak English.”

११. स्थानिक माणसाच्या अशा मानसिकतेमध्ये जगभर सारखेपणा आढळतो. मात्रेचा थोडाफार फरक असला तरी केवळ मराठी माणूसच आळशी आहे, काम करीत नाही आणि मेहनतीच्या जोरावर प्रगती करणार्‍या परप्रांतीयांचा तिरस्कार करतो ही गोष्ट तेवढीशी खरी नाही. मात्र इतरांच्या तुलनेत मराठी माणसाच्या बाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण अपवाद म्हणजे त्याला असलेली स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दलची अनास्था, किंबहुना न्यूनगंड. त्याला मात्र दुनियेत तोड नाही. त्यामुळेच आपण आपल्याच राज्यात आपल्या भाषेपेक्षा दुसर्‍याच भाषेचे, संस्कृतीचे आणि ती भाषा बोलणार्‍यांचे स्तोम विनाकारण वाढवून ठेवले आहे. आणि त्यासाठी कोणी परप्रांतीय नव्हे तर आपण स्वतःच जबाबदार आहोत.

१२. जगाचे राहू दे. पण भारतापुरते बोलायचे झाले तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. मात्र इतर सर्व राज्यांत महाराष्ट्राच्या तुलनेत एक मोठा फरक असा की इतर राज्यांत स्थानिक भाषा आणि संस्कृती यांच्या बद्दल तडजोड नसते. त्यांचे वर्चस्व अबाधित आणि वादातीत असते. स्थानिक भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य का असावी हा प्रश्न तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल किंबहुना इतर कुठल्याही राज्यातील परप्रांतीयांना पडत नाही. तो इथे महाराष्ट्रातच पडतो. दुसरे म्हणजे त्या राज्यांत जाऊन स्थायिक होण्यासाठी त्यांना स्थानिक भाषा शिकावीच लागते आणि स्थानिक संस्कृतीशी जुळवून घ्यावेच लागते. शासकीय कागदपत्रे आणि दळणवळणही स्थानिक भाषेत असल्यामुळे तोही त्यांना मोठाच अडसर ठरतो. भाषेच्या अनिवार्यतेमुळे साहजिकच तिथे स्थानिक माणसाला नोकरीत अग्रक्रम मिळतो. इतरांना हा मुद्दा आपोआपच प्रतिकूल व अनुत्साही करणारा ठरतो. अशा सर्व कारणांमुळे भय्या (व इतरही) जेवढ्या सहजपणे महाराष्ट्रात स्थलांतरण करण्याचा विचार व कृती करू शकतात तेवढे त्यांना इतर राज्यंच्या बाबतीत जमत नाही. आपल्या राज्यात आपण सर्वत्र हिंदीचे महत्व वाढवून भय्यांचे महत्त्वच वाढवीत असतो.

१३. यासाठी एक उदाहरण देतो. दोन महिन्यांपूर्वी काही कारणाने मला मुंबईतील मुद्रांक-शुल्क आणि नोंदणीकरण खात्याच्या कार्यालयात जाण्याचा योग आला. शनिवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. माझं काम करणारा दलाल (एजंट) मराठी होता, पण इतर सर्व दलाल मात्र ७० टक्के गुजराथी व उरलेले सिंधी, मलयाळी, भय्या, पंजाबी असेच होते. मराठी अगदीच कमी असावेत. अर्थात यात काहीच नवीन नव्हते. पण मला आश्चर्य वाटले ते या गोष्टीचे की बहुतेक सर्व अमराठी दलालांकडे हे काम करण्यासाठी एक-एक मराठी सहाय्यक नेमलेला होता. माझा डोळ्यांवर विश्वास बसेना. मी आनंदाश्चर्याने माझ्या दलालाला कारण विचारलं. त्याने माहिती पुरवली की नोंदणीसाठी दस्त (deed) सादर करण्यापूर्वी एक लहानसा फॉर्म (प्रपत्र) भरावा लागतो. तो संपूर्णपणे मराठीत असतो व मराठीतच भरावा लागतो. त्यामुळे सर्व दलालांना मराठी बर्‍यापैकी लिहिता-वाचता कारकून पदरी ठेवावाच लागतो. त्याने दिलेल्या या उत्तराने एक साधं पण मोठं तत्त्व सिद्ध झालं. शासनाने मंत्रालय, न्यायालये, पोलिस, सर्व राज्य शासनाची खाते येथील संवादाची, आवेदने, प्रपत्रे, दस्त, कागदपत्रे यांची भाषा सक्तीने मराठी केली (तसे करणे घटनेला धरूनच आहे आणि इतर राज्यांत तसे कमीअधिक प्रमाणात झालेलेसुद्धा आहे.) तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लक्षावधी मराठी भूमिपुत्रांना इतरांच्या मानाने प्राधान्याने नोकरी, काम, रोजगार मिळू शकेल व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कोटभर सामान्य स्थानिक जनतेचं पोटभरू शकेल.

१४. यापुढे एक पाऊल पुढे जाऊन मला असं वाटतं की अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate) देताना किंवा ज्यापदावर काम करताना सामान्य जनतेशी संपर्क येण्याची शक्यता असते अशा पदांवर माणूस नेमताना त्याला व्यावहारिक पातळीवरील बोलण्यावाचण्याइतपत स्थानिक भाषा येत असण्याची अट घालावी. भय्यांना न झोडपताच इतर राज्यांप्रमाणे आपोआप स्थानिक माणसाला नोकरी आणि काम धंद्यात मोठं प्राधान्य मिळेल आणि हे सर्व सनदशीर मार्गाने करता येईल. अर्थात यासाठी आवश्यक असणारे राजकीय इच्छाबल किती राजकारण्यांकडे आहे याबद्दल शंकाच वाटते.

श्री० शरद गोखले म्हणाले:

१. मराठी बुध्दीजीवी वर्गात एक आत्मपीडनाची प्रवृत्ती आहे. मराठी दुकानदार [विशेषत: पुण्यातील] आणि व्यावसायिक यांची टवाळी करण्याची ‘फॅशन’ [पुलंपासून] जुनीच आहे. तसे केले म्हणजे मराठी दुकानात न जाण्याचे समर्थन [आणि पापक्षालन] होते. काही वर्षांपूर्वी कदाचित अशी प्रवृत्ती असेल. पण आता मराठी दुकानदारांत आणि व्यावसायिकांतही बदल झाले आहेत. मुंबई सारखी महानगरे सोडली तर अर्धशहरी आणि ग्रामिण भागात बहुसंख्य दुकानदार मराठीच असतात. कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरातही [दुकानांच्या पाट्यांवरील नावे पाहाता] व्यापाराची सूत्रे मराठी माणसाच्या हातात आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. आणि समजा दवणे सांगतात तसे दुकानदार भेटलेच तर त्यांना बदलण्याचा प्रयत्न करायचा की परप्रांतीयाच्या दुकानात जायचे आणि वर त्याच्याशी हिंदीत बोलायचे? आपल्या मुलात काही दोष असतील तर ते दूर करायचे की शेजा-याच्या मुलाचे कौतुक करायचे? मला असा अनुभव आला तर मी दुकानदाराला त्याची चूक  दाखवतो व तरीही ‘तुम्ही मराठी असल्यामुळे तुमच्याच दुकानातून खरेदी करणार’ असे बजावतो. शक्यतो [लांब जायला लागले तरी] मी मराठी दुकानातूनच खरेदी करतो. या उलट एखाद्या परप्रांतियाच्या दुकानात जाणे भागच पडले तर तेथे मराठीतूनच बोलतो व मी बोललेले त्याला समजले नाही तर खरेदी न करता बाहेर पडतो. हे एवढ्या वैयक्तिक पातळीवर लिहिले कारण आपणच आपले दोष उगाळीत बसायचे की त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करायचा?

२. काही महिन्यांपूर्वी लोकसत्तेत बिहार व उत्तरप्रदेशातून इतर प्रांतात लोक चरितार्थासाठी का जातात या विषयी एक वेगळा दृष्टिकोण मांडणारे दोन लेख आले होते. लेखकाचे म्हणणे असे होते की या दोन प्रांतात जातीय जाणीव व उच्च-नीचतेच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की त्यामुळे आपल्या परिसरात एखादा यादव, कुर्मी अथवा भूमीहार अंगमेहनतीचे तथाकथित हलके काम करू धजावत नाहीत. मात्र नाइलाजास्तव पोट भरण्यासाठी तेच काम अनोळखी प्रांतात  करण्याची त्यांची तयारी असते. बिहारी व उत्तरप्रदेशचे लोक खरोखरीच एवढे मेहनती असतील तर प्रचंड नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या आपल्या प्रांतांचे ते नंदनवन का करू शकत नाहीत? दोन/तीन वर्षांपूर्वी कोकण रेल्वेच्या चिपळूण स्थानकावर तेथील उपहारगृहातील कामगार भय्ये असल्याचे पाहून मी काही निषेधपर उद्गार काढले. बाजूलाच उभे असलेले एक गृहस्थ पुढे आले व मला म्हणाले, “मीच या उपहारगृहाचा कंत्राटदार आहे. आपली मराठी मुले टिकत नाहीत. त्यांना काम करायला नको. वेळोवेळी सुट्टी पाहिजे असते. हा बिहारी मुलगा गेली दोन वर्षे गावाला गेला नाही.” आणि अशाच प्रकारचे समर्थन परप्रांतीयांना कामावर ठेवणारे करीत असतात. पण या पाठीमागची खरी वस्तुस्थिती अशी आहे की मराठी कामगार स्थानिक असल्यामुळे व बिहारी /युपी मजूरांएवढे गरजू नसल्यामुळे ते पिळवणूक करून घेण्यास राजी नसतात. दोन दोन वर्षे घरी न जाता राबणारा नोकर ही आदर्श परिस्थिती नाही. धड पत्ता माहित नसणारे व मराठी न येणारे अनेक बिहारी व यूपी रिक्षा चालक आपण पाहातो. पण त्या रिक्षांचे मालक मराठीच (काही वेळा तर परिवहन खात्यातील कर्मचारीच) असतात. पण अधिक पैशांच्या लालचीने ते मराठी गरजू व्यक्तीला रिक्षा चालवायला न देता भय्यांना देतात. सुरूवातीला नम्र व गरीब अ(भा)सणारे हेच भय्ये काही वर्षांतच त्या रिक्षाचे मालक होतात. आमच्या ठाण्यात भाजी मंडईत  एक नवीन भय्या बघून मी नेहमीच्या भाजीवाल्यांकडे तक्रार केली. ते म्हणाले, “अहो भाजीवाला भय्या असला तरी दुकानाचा मालक मराठीच आहे.” सारांश, भय्यांचे exploitation करण्यात आपण मागे नाही. त्यामुळेच लोंढ्यांविरूध्दची चळवळ तीव्र होत नाही. शिवसैनिक हीच माझी कवच-कुंडले आहेत असे म्हणणा-या शिवसेनाप्रमुखांच्या farmhouse (शेत-घरा)ची राखण करणारे शेवटी गुरखे असतात, यातच सर्व आले!!

त्यावर श्री० कुळकर्णी म्हणाले:

१. नाहीतरी महाराष्ट्रात मराठी न बोलणारे उत्तर-भारतीय मंत्री होतातच. गेल्या ८-१० वर्षांत मुंबईच्यामागे पुणे देखिल बाटलं. “हमको मराठी नही समझता, हिंदीमे बोलो” अशी माजखोर वाक्ये गेल्या काही वर्षांत पुण्यातही ऐकू येऊ लागली. परप्रांतीयांनी, विशेषतः भय्यांनी, मुंबई ३५-४० वर्षांपूर्वीच जिंकली होती. आता पुणेसुद्धा घशात घालणे चालू आहे. नाशिक नेहमी पुण्यामागे चालत असतंच. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ इथेसुद्धा हिंदीचा आणि हिंदी भाषकांचा प्रभाव बराच आढळतो. त्यांचा अश्वमेधाचा घोडा असाच पुढे प्रगती करत राहिला तर न जाणो, येत्या दशकांत कोल्हापूर, व थोड्याफार उरलेल्या दक्षिण महाराष्ट्रातसुद्धा त्यांचा दिगिविजय पूर्ण होऊन संपूर्ण महाराष्ट्र हिंदीचा मांडलिक होईल.

इतरांनीही आपले विचार लेखाखालील चर्चा चौकटीत अवश्य मांडावेत.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन_स्थानिक आळशी मराठी माणूस व कामसू पाहुणे_130909

———-

अशाच विषयांवरील खालील लेखदेखील अवश्य नजरेखालून घालावेत.

‘मराठी-भाषा-दिनाच्या शुभेच्छा’ म्हणजे नक्की काय? –}} http://wp.me/pzBjo-SR

परराज्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना ‘तमिळ’ शिकावीच लागेल! – मुख्यमंत्री जयललिता –}} http://wp.me/pzBjo-K4

तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली (प्रेषक: श्री० आरोलकर) –}}  http://wp.me/pzBjo-gw

’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता) –}}  http://wp.me/pzBjo-ad

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –}  http://wp.me/pzBjo-8x

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) –} http://wp.me/pzBjo-9W

एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) –} http://wp.me/pzBjo-d8

———————

Tabs : ,

20 thoughts on “स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे….

  1. चांगली चर्चा आहे. अनेक मुद्यांचा परामर्श घेतलेला आहे. स्थलांतर करणारा माणूस थोडा अधिक कष्टाळू आणि हिकमती असतो (किंवा अगतिकही असतो) त्यामुळेच तर तो स्थलांतर करतो.
    स्थलांतरित माणसाचे स्थानिक पातळीवर भावबंध घट्ट झालेले नसतात. पुण्यात सवाई गंधर्व समारोह संपल्यावर रिक्षा मिळत नाहीत. कारण बरेच रिक्षावाले रात्री घरी जातात कारण त्यांना जाण्यासाठी घर असते. मुंबईत २४ तास रिक्षा मिळतात कारण ज्याच्या ओढीने घरी जावे असे काही घरी नसणारे रिक्षावाले बरेच आहेत.
    गुजराती-मारवाड्यांनी कापड बाजार / दाणा बाजार काबीज केला, पंजाब्यांनी ऑटो मार्केट काबीज केले. लेबर मार्केट तरी स्थानिक मराठी माणसांकडे (माथाडी / गिरणी कामगार आधीपासूनच होते ) असावे असा प्रयत्न मराठीवादी नेतेमंडळी करीत आहेत. पण येथेही अर्थशास्त्राचे नियम लागू होतात. दीड-दोन रुपयात वर्षानुवर्षे इस्त्री करीत राहणे स्थानिक मराठी माणसाला परवडत नसावे.

    • प्रिय अनिल, अभिप्रायाबद्दल आभार. आपण लिहिलेला शब्दन्‌-शब्द खरा आहे. बंगाली माणूस हा अशा बाबतीत थोड्याफार फरकाने मराठी माणसासारखाच आहे. (फार तर मराठी माणसाची थोडीशी सुधारित आवृत्ती म्हणता येईल.) तिथेही धंदेवाले व विविध क्षेत्रातील श्रमिक हे परप्रांतीय असतात. पण म्हणून स्थानिक भाषा व संस्कृती यांना कोणीही गृहित धरून चालू शकत नाही. त्यांना कोणी घाटी (किंवा तत्सम प्रकारच्या) तुच्छतादर्शक संज्ञेने हिणवायची हिंमत करू शकणार नाही. मणि शंकर अय्यरने सावरकरांचा शिलालेख उचकटून काढून फेकून दिला आणि आपण थंड (षंढ?) बसलो. पण नेताजी सुभाषचंद्रांच्या बाबतीत असे करण्याची तो स्वप्नातदेखिल हिम्मत करणार नाही. तिथे इथल्याप्रमाणे रेल्वे-टपाल-बॅंकांचे इत्यादी फॉर्म हिंदी-इंग्रजीतच नसतात. तिथे बंगालीत बोललो तर आपल्याला अडाणी-अशिक्षित म्हणतील अशी भिती स्थानिकांना वाटत नाही. शाळेमध्ये बंगाली सक्तीची करणे हा परप्रांतीयांवर फार मोठा अन्याय आहे असे तिथे कोणाच्या मनातही येत नाही. सामान्य माणसाच्या माहितीच्या सर्व सूचना आणि लिखाण सर्वत्र बंगालीतच आढळते. त्याविरुद्ध कोणीही तक्रार करीत नाही. तिथे स्थानिक माणूस मानाने, तोर्‍यात, मान वर करून राहतो आणि परप्रांतीय आपण दुय्यम असल्याचे कबूल करूनच वावरतात. डालमिया हा सौरव गांगुलीची बाजू घेऊन प्राणपणाने लढणारच नाहीतर त्याला आपले घरदार, उद्योगधंदा सोडून रातोरात पळून जावे लागेल. थोडक्यात म्हणजे जगाच्या पाठीवर बहुतेक देशांत स्थानिक माणसापेक्षा परप्रांतीय अधिक कष्टाळू असतात पण तरीही त्यांना आपली पायरी सांभाळूनच रहावे लागते. शिवाय अनेक नोकर्‍यांसाठी स्थानिक भाषेच्या ज्ञानाची आवश्यकता असल्याने तिथे स्थानिकांना आपोआपच प्राधान्य मिळते.

  2. Saleel and Sharad,

    I like this article for discussion. I like Sharad’s view of speaking in marathi in any shop, I have been doing that for past 30 odd years and still do it.

    But in general there should be a awareness programme for the youths to encourage them speaking in mother tongue. And develop a habit/work culture that would enable more respected jobs / business options for their future years. One of the thing I noticed last week when my wife was hopitalised for an operation in MGM hospital, Vashi. All the nurses and admin staff at this hospital is Keralite, though most of the doctors are maharashtrians, including the owners I guess. And all the wardboys/girls are marathi. So we have either a top brass or bottom grass at our disposal and the middle management (where all the action is on daily basis) is with other people. The problem is marathi girls do not take the nursing course and hence the job goes to keralites. Even though most of them do not know how to inject a saline without troubling the patient. My wife has pains in her wrists even 4 days after the discharge. This is where I think the awareness (like a nursing course for marathi girls – there can be several such opportunities where our kids are not venturing) is the main issue. And we can start interaction with schools / colleges on such awareness programmes.

    Do let me know what do you think.

    • Thanks Ravi. You have made some important and pertinent points. Training our Marathi people to learn the knowledge, skill, practice etc. necessary for every small or big job is the ideal thing. Achieving that would be a utopian state. No doubt, we must work towards that. But in no other state or no other country the local people possess all the knowledge and skills necessary for every job. So one has to depend on the outsiders. But even while doing that we must ensure that our language and our local culture gets the maximum priority and prevails over any other. This is what is done by all other Indian states and many other countries. That is why many jobs that require knowledge of the local language and culture get protected for the local people. A Bhayya from UP or Bihar can just get up, buy a railway ticket (or travel without one) and arrive in Maharashtra. This decision is not easy for him if he wants to go to Tamil Nadu, or Bengal or any other state where he MUST KNOW the language and MUST ADAPT to the local culture. The small example given by Kulkarni of ‘the form to be filled-in in Marathi requiring a Marathi clerk’ is quite illustrative. In other states there are many such occasions when one must be able to read-write-speak the local language. A Bhayya feels quite ‘at home’ in Maharashtra since we shun our own mother tongue and talk with everyone (even with the non-Hindis) in Bhayya’s mother tongue. A Tamilian who arrives in Maharshtra for the first time and who knows only Tamil and English, is made to learn Hindi (and not Marathi) by us. So isn’t the entire problem of our language and culture (and our own existence) being ignored by the others a making of our own? Why blame others if we ourselves do not wish to win over our own inferiority complex and exhibit our existence as a Marathi everywhere in our state, be it a mall or an ATM, or a call centre executive, or a Bank, or a public place or a government office etc. Let us resolve to use Marathi as much as possible and this problem will improve in a short time.

    • प्रिय श्री० शिव,

      सप्रेम नमस्कार.

      प्रस्तुत लेख कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाची निंदा करणे किंवा त्यांचा प्रचार करणे अशा हेतुने लिहिलेला नाही. त्यामुळे आपले पत्र हे अप्रस्तुत, असंबद्ध ठरते. असे पत्र या मंचावर या संदर्भात प्रकाशित करणे उचित होणार नाही. क्षमस्व.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० शिव,

      सप्रेम नमस्कार.

      आपण कृपया प्रथम सचिन इंग्रजीमधील मुलाखतीत इंग्रजीत उत्तर देताना जे काही म्हणाला ते त्याचे मूळ उत्तर पुन्हा ऐका आणि मग आपले म्हणणे मांडा. सचिनने आपल्या उत्तरात प्रथम (first) हा शब्द वापरलेलाच नाही आहे. हे सर्व स्वैर, खोडसाळ आणि फसवे भाषांतर प्रसार माध्यमांनी मुद्दाम ताजे-चुरचुरीत वृत्त (ब्रेकिंग न्यूज) तयार करून टीआरपी वाढवणे आणि मराठी माणसांमध्ये आपापसात भांडणे लावून देऊन आपण मजा बघणे यासाठी केलेले आहे. त्याला आपण कोणीही बळी पडता कामा नये.

      असो. आपण सचिनचे मूळ उत्तर स्वतः तपासावे ही विनंती.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. ही गोष्ट खरीच आहे. नुकताच मला आलेला अनुभव. अवकाळी पावसामुळे काही दिवस बाजारात फुलेसुद्धा येत नव्हती. मला काही खरेदी करायची झाल्यास मी मराठी माणसाला प्राधान्य देतो, त्यानुसार मी फुलेसुद्धा एक मराठी फुलवाला आहे त्याच्याक़डून घेतो. पण या कालावधीत त्याने आपला व्यवाय बाजारात फुले नाहीत म्हणून बंद ठेवला होता. पण त्याचवेळी फुले विकणाऱ्या सर्व भय्यांच्या टपरींवर मात्र फुले मिळत होती. उलट या संधीचा फायदा घेऊन ते जास्त दराने विकत होते आमि आपले मराठी फुलवाले मात्र फुले नाहीत म्हणून घरी बसले होते. हे स्रवसाधारणपणे मराठी माणसाच्या व्यावसायिक दृष्टीचे द्योतक आहे.

    • प्रिय श्री० अनिल करंबेळकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. पण त्या लेखात लिहिल्याप्रमाणे साधारणपणे सर्वच ठिकाणी स्थानिक मंडळी ’निवांत’पणे वागतात. परप्रांतीयांना मात्र अधिकाधिक श्रम करून पैसे मिळवण्याची घाई असते. हे चित्र केवळ भारतातच नव्हे तर अनेक परदेशांतही दिसते. याविषयीच्या विविध मुद्द्यांचा उहापोह प्रस्तुत लेखात केलेलाच आहे, तो पहावा.

      मराठी माणसाने असे दुर्गुण कमी करायलाच पाहिजे. पण त्याशिवाय तो मराठी म्हणून, या राज्याचा मालक म्हणून त्याला काही विशेषाधिकारही मिळायला हवेत. मराठी भाषेचे महत्त्व सर्वत्र वाढले तर मराठी बोलणार्‍यांना विशेष महत्त्व (रोजगारासह सर्वच क्षेत्रांत) मिळणारच. तसे अधिकार इतर राज्यांत, इतर देशांत स्थानिकाला असतात. ते आपण महाराष्ट्रात शासनावर व खासगी संस्थांवर एकत्रितपणे दबाव आणून मिळवायलाच पाहिजेत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. Dear Saleelji

    We have been discussing this issue for some times on different platform in our circle.After seeing the coments here whether a domestic maid, a nurse, hotel boy at Chiplun or a phulwala, who are migrants have to and work hard and make their living in the process locals loose job, this is true in Mumbai, Melborne or Manhattan.
    So far as UP, Bihar is concerned, it is the leaders, politicians have failed us, where there is no law and order, rampant corruption, even your mothers and sisters are not safe.
    So lets not attack Bhayya rickwala or a Bihari, instead punish Lalus, Mulayams, Tripathis who so ever is responsible.

    With Warm Regards

    Vinod Desai
    Versova,Mumbai

    • प्रिय श्री० विनोद देसाई यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले प्रतिमत (feedback) आम्ही श्री० सलील कुळकर्णी यांना कळवले आहे. त्यांच्याशी आपली काय चर्चा झाली हे आम्हाला किंवा अमृतमंथनाच्या इतर वाचकांना माहित नसल्यामुळे त्याबद्दल आम्ही काहीच प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही.

      आपण लिहिता:

      आपण उ०प्र०, बिहार राज्यांबद्दलच्या राजकारण, भ्रष्टाचाराबद्दल लिहिले आहे ते थोड्याअधिक प्रमाणात सर्वच राज्यांच्या बाबतीत सत्य आहे. ओरिसा, आसाम, बंगाल इत्यादी राज्यांतही भयानक गरीबी आहे. महाराष्ट्रातील काही भागातील लोकही अत्यंत हलाखीचे आयुष्य जगतात. पण उ०प्र-बिहार राज्यांएवढा असंस्कृतपणा इतर राज्यांत बर्‍याच कमी प्रमाणात आढळतो. पंजाब, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, बंगाल, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू अशा व इतर सर्वच राज्यांनी कधी ना कधी त्या दोन राज्यांतील असंस्कृत जीवनपद्धतीचा, वाढत्या गुन्हेगारीचा व येणार्‍या लोंढ्याचा संबंध जोडला आहे. त्या सर्व राज्यांत भय्यांना मार पडलेला आहे, त्यांच्या हत्याही झालेल्या आहेत. त्या दोन राज्यांत अशी भीषण परिस्थिती आहे म्हणून त्यासाठी त्यांच्याकरवी तशी परिस्थिती आपल्या राज्यात होऊ देणे हा उपाय नव्हेच. पुण्यात गेल्या ८-१० वर्षांत तेथील लोंढे वाढल्यावर त्याच प्रमाणात गुन्हेही वाढले. पकडले गेलेले बरेच गुन्हेगार तिथलेच असतात. खरं म्हणजे गुन्हा करून अपराधी शहाजहानपूर, मुजफ्फरपूर इथे पळून स्थानिक जमीनदाराच्या आश्रयाने लपला की त्याला पोलिसही बोट लावू शकत नाहीत. स्थानिक महाराष्ट्रीय गुन्हेगार तसा सहज लपू शकत नाही.

      उद्या उ०प्र किंवा बिहारी गुन्हेगाराने कोणाच्याही बाबतीत गंभीर गुन्हा केला तर “तो त्या दुर्दैवी राज्यातील आहे. त्याला शिक्षा करू नका, माझी भरपाईही देऊ नका” असे त्या बिचार्‍याने म्हणावे का? त्यांच्यामुळे ज्यांची नोकर्‍या जात असतील त्यांनी “जाऊ दे, मी त्यांच्यासाठी बेकार व उपाशी राहीन” असे म्हणावे का? कोणी असे उदाहरण घालून देईल का? अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियात असे भारतीयांच्या बाबतीत घडेल का? आपण आपली वैयक्तिक संपत्ती त्या राज्यांतील मुख्यमंत्री निधीला दान करावी का?

      शेजारच्या घरातील बापाने चांगले संस्कार न केल्यामुळे मुलगा गुंड-गुन्हेगार किंवा बेकार निघाला तर आपल्या मुलाला अर्धपोटी ठेऊन त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी आपण घ्यावी काय?

      पाहुण्याने स्थानिक भाषा व संस्कृतीला मान देणे त्यांच्याशी मिळूनमिसळून वागणे हा जगभरातीलच नियम आहे. तो पाळायचा नसेल त्याने स्वतःच्या राज्यात, गावातच रहावं.

      हे विश्वचि माझे घर म्हणणे चांगले आहे, पण त्यासाठी स्वतःच्या कुटुंबास उपाशी ठेऊन परक्याचे पोट भरण्याएवढा पराकोटीचा परोपकारीपणा व अध्यात्म आम्हा सामान्यजनांत नाही. तो ज्यांच्यात असेल त्यांनी स्वतःच्या वागणुकीने उदाहरणे घालून द्यावीत. मग इतर माणसे कदाचित विचार करतील.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे सध्या मराठी भाषकांचा कलही मराठी व्यावसायिक शोधण्याकडे आहे; परंतु मराठी व्यावसायिकांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा शोध घेणे
    कठीण होते. परिणामी इच्छा नसतानाही अमराठी व्यावसायिकांकडून काम करून घ्यावे लागते. अनेकांची ही गरज लक्षात घेऊन डोंबिवलीतील तरुणांनी एकत्र
    येऊन “www.marathiyp.com’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
    या संकेतस्थळावर प्रत्येक व्यावसायिकाला प्रत्येकी एक वेबपेज देण्यात येणार असून त्यात उद्योजकांची संपुर्ण माहिती, असेल. उद्योजकाला हवे ते बदल
    या वेबपेजवर करता येणार आहेत हे विशेष. त्यासाठी त्याला स्वतंत्र आयडी-पासवर्ड देण्यात येणार आहे.
    या संकेतस्थळासाठी प्रतिवर्ष दीड हजार रुपये एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे ”
    ( दैनिक सकाळ , ता. २८ फेब्रुवारी २०१० )

    • प्रिय श्री० कुणाल गडहिरे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      चांगली माहिती दिलीत. पण संकेतस्थळ अजुन पुरेसे विकसित झालेले दिसत नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • I really don’t understand why such type of sites needed,as ning.com friendcircles.com like sites provide free home page,rather than making one pay RS.1500/- it could be much better for site owners on e-market,build the brand,and sell his product with share in his earnings,after the tax.
      problem with Marathi trader is his non networking operations.When I was in Assam for 2 years,my BRINDA(KOKAM SARBAT) supply was sent by air from Mangalore,Marathi newspaper from Hyderabad,Mango from A.P,Few more Maharashtra products from other states,due to flight and other reasons,Even stitched clothing from Jabalpur,with A/C Class attandent,
      Do you think it’s not possible to sell directly,as LOGISTIC SIPPORT COMPANY?
      But Marathi’s fail to provide TURN KEY SUPPORT.
      Own earnings and finish,such web pages are just ego point’s nothing more,
      Anyway I wish them the best.

  6. धंदेवाईक चातुर्य mhaNje kay? meech businessman aaNi meech CA. meech doctor aaNi meech medical store vaala. meech professor aaNi guide pustake maajheech. maajhe newspaper aaNi tyaat meech deshsevak? Sarva kaahee meech tar mala dosh deNyaachi himmat kuNaala? बुद्धी, शिक्षण, चिकाटी ityadi guNaanmadhye ha guN shaameel karNyaasaarkha aahe kay?
    ha lekh pratyek marathi maaNasaane vachaava. agadee maharashtraala aarshyaat paahilyasaarkha vaaTate.

    • प्रिय श्री० भास्करभट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे खरे आहे.

      (उत्तरास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व.)

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. kharepahata hee charcha juni aahe parantu mee tee ajach vachli aani mee khup bharavatlo . salil vaa sharad hyani atishaya yogya mudda charchela ghetalay. mumbaitun marathi haddapar honyas marathi ucchya sikshit vaa english medium madhun sikleli mandali jasta karnibhut aahet ase mala wat te .hee mandali marathila kami lekhun english vaa hindi madhun sambhashyan karnyathach swathala dhayna samajtat Dakshinechya rajyat me jevha feerlo theva mala ek janhavle kee, teekadeel uchhasikshit mandali eglish bhasheche jasta stome majwat nahit , hindiche tar nahitach nahi, english bhashya dakshinet mukhetwekarun knowledge milavnya karitach vapartat. Bhartachi Rastrabhashya jya velela hindi hee tharali tya velelach dakshinekadil rajayani (andhrapradesh,tamilnadu,kerala ,karnataka) kadkadun virodh kela hota aani ajunhi tyancha virodhach aahe .
    mala ashe watate ki jar punhna ekda rastrabhashya hee hindi na karta english kelee ( aaj sarva bhartat english schools ubhya rahat aahet) tar he khup pramanat hoth aslele stalantar thambel shivay stanik bhashya rojchya vayavaharat jyasta vaparli jaeel ,karan parprantatun ashiksheet va kami shiklele loke stalantar karnar nahit va sthanikanach sarva uudyog va nokreet sahabhag shanbhar taake hoil. rajyat jar donach bhashya asstitvat asteel(maharashtrat marathi vaa english, karnatakat kannad va english) tar sarva vyavahar ektar english madhye athawa stanik bhashetach karave lagtil. Ajunhi vel geleli nahi jar sarva vrutapatranhi , rajkarnyani netyanhi, thor mandalee va vicharvantani aap aaplya rajyatun sunsadet(parliament) prkarshyane magni keli tar mala vatate bharatatil vivihid prant va pradesh hey balence rahatil vaa kuthalyahi rajaayt ashishit(dadagiri, gunda, chor,tadipar) lok stalantar karnar nahit va stanikanvar annya honar nahi.

    • प्रिय श्री० मधुकर माजलकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपल्या पत्रातील पहिल्या परिच्छेदातील आपली मते बरीचशी पटली. परंतु पुढील विधाने तितकीशी पटली नाहीत.

      खुद्द पुण्यातही आज सुमारे ७५% मुले मराठी शाळेतून शिकत आहेत. पण आमच्या मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांचा सामान्य जनतेशी संपर्कच तुटलेला आहे. त्यामुळे आम्हाला जवळ जवळ सर्वच मुले इंग्रजी शाळांत शिकत आहेत असे वाटते. भारतातील ८-९ टक्के लोकांनाच इंग्रजी (कशीबशी) बोलता-लिहिता येते.

      आपण इंग्रजीचेही स्तोम विनाकारण माजवले आहे. जपानमधील नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांना इंग्रजी येत नसते. इतर प्रगत व प्रगतिशील देशांत स्वतःची भाषा सोडून इंग्रजीत समाजव्यवहार, पोलीस, न्यायसंस्था, कायदे, संसद इत्यादी चालवीत नाहीत. ह्या विषयावर अमृतमंथनावर बरेच लेख आहेत. वाचून पाहावेत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s