पुस्तक ओळख – ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे

राजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये

पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं:

मानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.

तुमचं कविता लेखन काय म्हणतय?

उत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी!

याचं गमक काय?

पाहा, माझ्याबरोबरीच्या सर्वांचं स्फुरण थांबलं. मंदावलं. मला मात्र सारखी नवी नवी कविता स्फुरतच असते. याचा अर्थ, देवाचा अजूनही माझ्यावर अनुगख आहे. एरवी असं घडतच ना?

असं बोलत बोलत, डुलत डुलत आम्ही प्रराम अपार्ट्मेंटमधल्या त्यांच्या कन्येच्या घरी दाखल झालो.

बसल्या बसल्या मला त्यांचं पंधरा वर्षापूर्वीचं संभाषण आठवलं. तेव्हा कवी म्हणाले होते, आपल्या आयुष्यात एसेन्शियल्स असतात, तशीच नॉन-एसेन्शियल्सही असतात. पैकी, आयुष्यातल्या उच्च बाबींवर तडजोडी करू नये. मामुली बाबींवर तडजोड केल्यामुळं काही बिघडत नाही. शुध्द अभिजात कविता हे माझ्या आयुष्यातलं प्रधान अंग आहे. तिथं मी कालत्रयी तडजोड करणार नाही. कधी केलेली नाही. प्रचारी लेखनही मी केलं, तिथं फार काटेकोर राहिलो नाही. अभिजात कविता साहित्यात मोडते. प्रचारी पदं आणि लेख हे साहित्य नव्हे. तो मजकूर म्हणून त्याचे संगख मी काढले नाहीत. माणसानं प्रथम एसेन्शियल्स कुठली, ती ठरवून त्यांचा अग्रक्रम निश्चित केला पाहिजे. मग गोंधळ होत नाही. ज्यामुळे तुमचा विकास होईल, तिथे तडजोड नसावी. तसा मी फार सोवळा नाही. नीतिग्रस्त व्यक्तिमत्वाने पछाडलेला नाही. भीतीच्या पोटी जन्मलेली नीतिमत्ता मला नामंजूर आहे. माणसाकडे स्वत:ची म्हणून चिंतनसिध्द, अनुभवसिध्द अशी नैतिक मूल्य असावीत आणि ती त्यानं स्वत:ला नि इतरांना समदृष्टीने लावावीत. जे स्वातन्त्र्य मी भोगलं, ते मी इतरांनाही लुटू देईन. पर्सनल गॉडवर माझी श्रध्दा नाही. पण देव आहे. दैव आहे. पावलोपावली मला याचा प्रत्यय येतो.

………………………………………………………………………….

प्रिय रसिकांनो,

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com

ranshubha@gamil.com

4 thoughts on “पुस्तक ओळख – ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’

    • प्रिय श्रीमती प्रमिला म्हात्रे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण दिलेला विपत्ता (इमेल पत्ता) चुकीचा आहे. कृपया बरोबर पत्ता amrutyatri@gmail.com या पत्त्यावर कळवाल काय?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

Leave a reply to अमृतयात्री उत्तर रद्द करा.