आपले एक मुंबईचे मित्र वैद्य शैलेश नाडकर्णी (एम०डी०, आयुर्वेद) ह्यांनी आपल्या बटव्यातून काढून कडू वटीच्या ऐवजी आंबटगोड जिरागोळ्यांसारख्या काही गोळ्या पाठवल्या आहेत. माननीय वैद्यराज म्हणतात, “या गोळ्या मानसिक ताण, दैनंदिन काळज्या यांवर अत्यंत गुणकारी असून रुग्णाच्या चिंतेचा नाश होऊन तो आनंदाने पुलकित होतो. या गोळ्या आपण दिवसातून कितीही वेळा घेऊ शकतो. यांच्या ’वयस्थापक’ आणि ’जरानाशक’ गुणांमुळे यांच्या नियमित सेवनाने माणसाला दीर्घायुष्य आणि चिरयौवनाचा लाभ होतो.
अर्थात या गोळ्यांचे मूळ कर्ते चरकादि आयुर्वेदाचार्य नसून आपल्या सर्वांचे आवडते विनोदाचार्य पु० ल० देशपांडे आहेत.
पहा तर मग या गोळ्या चाखून.
गोळ्यांचा बटवा खालील दुव्यावर सापडेल.
अमृतमंथन-पु० ल० देशपांडेंचे किस्से
>>>>><<<<<
– अमृतयात्री
(कृपया आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा. आभारी आहे.)
Many thanks for this compilation.
For a person like me, when away from Maharashtra, it’s a great relief. ……. (Prof.) Suhas Rane from Dubai
प्रिय प्रा० सुहास राणे,
आपल्या प्रतिसादाबद्दल अत्यंत आभारी आहे. आपण सर्व मराठी-अभिमानी मंडळींनी मिळून आपल्या मायबोलीच्या संवर्धनासाठी, तिचे गेलेले ऐश्वर्य तिला पुन्हा मिळवून देण्यासाठी जे-जे आणि जेवढे-जेवढे करणे शक्य असेल ते सर्व आपण यथाशक्ती करूया. आपण परदेशात राहता. तिथेसुद्धा मराठी-मंडळ किंवा इतर संस्थेद्वारे आणि मित्रमंडळांत मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी जे काही करता येईल ते अवश्य करावे. आपण उच्चशिक्षित प्राध्यापकही आहात. तेव्हा आपल्याला रस असलेल्या कुठल्याही विषयावर मराठीत लेखन करावे. आवड निर्माण झाल्यावर सरावाने चांगले लेखन नक्कीच जमेल. या अनुदिनीवरील इतर लेखांबद्दलही आपला अभिप्राय अवश्य पाठवत जा. संपर्कात रहा. लोभ असावा.
– अमृतयात्री
सुरेख. बहुतेक किस्से प्रथमच वाचले, त्यामुळें मजा आली.
प्रिय श्री० सुधीर,
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. रसिक मराठी माणसांच्या अशा अभिप्रायांमुळे अधिक हुरूप वाटतो. अशा प्रकारचे उत्तम प्रतीचे नर्मविनोदी किस्से व लेख प्रकाशित करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. इतर थोडे गंभीर लेखही आहेत. तेही वाचून पहा. त्यांच्याबद्दलही अभिप्राय नक्की कळवा. क०लो०अ०
[…] पु० ल० देशपांडेंचे किस्से […]
pu.la. deshapande yanche kisse vaachale aani pota dharun khupa hasalo.
yethe Ny-USA t marathi vachanyas milane tase kathinacha.aapalya mule hi sandhi labahali.
amrutmanathan che kilti abhaar maanavet tevadhe kamicha asatil.
प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,
सप्रेम नमस्कार.
हे सर्व कारकूनी काम. त्यात आमचे विशेष असे काहीच कौशल्य नाही. मात्र असे विनोद समजण्यास रसिकता पाहिजे व अनेकवेळा भाषेची व संस्कृतीची पुरेशी जाणही पाहिजे.
पुलंसारखी थोर लेखक, कलाकार व स्वतःला विविध विषयात गती असणारा रसिक अशी माणसे आमच्यात होती हे आम्हा मराठी मंडळींचे केवढे भाग्य.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट