प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,
सप्रेम नमस्कार.
प्रा० दीपक पवारांचा “मराठी बांधवांनो…” ह्या शीर्षकाचा एक उत्तम लेख आपल्या माहितीसाठी सादर करीत आहे. आज मराठी भाषेला भेडसावणारे प्रश्न, त्या मागची सत्यस्थिती, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येईल याबद्दलचे काही विचार ह्याबद्दल चर्चा या लेखात केली आहे. मराठीबद्दल आस्था असणार्या प्रत्येकाने हा लेख आवर्जुन वाचावा अशी मी कळकळीची विनंती करतो.
सदर लेख पवार सरांनी बृहन्महाराष्ट्रातील (परदेशस्थ) मराठी मंडळींस उद्देशून लिहिला आहे. पण त्यातील प्रतिपादन महाराष्ट्रातील मराठी माणसास सुद्धा लागू पडते. बर्याच वेळा आपल्या योगक्षेमाच्या आणि दैनंदिन सांसारिक कामांच्या चक्रव्यूहात आपला असा अभिमन्यू झालेला असतो की त्यातून बाहेर पडणे फार कठीण होते आणि मायबोलीच्या समस्यांच्या दृष्टीने आपण स्थानिक मंडळी महाराष्ट्रात राहूनही परदेशस्थच ठरतो. पण आज आपल्या आईला आपली गरज असताना आपण तिच्यासाठी थोडा वेळ काढून, तिच्या समस्यांच्या बाबत विचार करून, तिच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रत्येकाने यथाशक्ती स्वतःचा खारीचा वाटा उचलायला पाहिजे.
प्रा० पवारांनी परदेशस्थ मराठी मंडळींना सुचविलेले कामाचे मुद्दे वाचून आपणही त्याप्रकारची कामे करू शकतो. त्या व्यतिरिक्त आपल्याला काही विशेष सुचवायचे असेल तर नक्की आपले प्रतिमत (feedback) नक्की निःसंकोचपणे कळवा. अनेक लोकांच्या विचारमंथनातूनच मराठीच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे नवनवीन मार्ग सापडतील.
प्रा० दीपक पवारांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर पहायला मिळेल.
मराठी बांधवांनो-प्रा० दीपक पवार
(प्रा० दीपक पवार हे मुंबईतील महाविद्यालयात राज्यशास्त्र (politics) हा विषय शिकवतात आणि ते ’मराठी अभ्यास केंद्र’ या मराठीच्या संवर्धनासाठी झटणार्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
आभार.
कळावे, लोभ असावा.
– अमृतयात्री
(कृपया आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा. आभारी आहोत.)