आचार्य अत्र्यांचे किस्से

हजरजबाबीपणा, चातुर्य, विनोद, अशा गुणांच्या बाबतीत जुन्या काळातील उत्तरेतील बिरबल, दक्षिणेकडचा तेनालीराम व खुद्द महाराष्ट्रातील नाना फडणवीस यांसारख्या व्यक्ती त्यांच्या संबंधित गुणांचे प्रतिनिधी मानल्या जाऊ लागल्या. त्यांच्या चातुर्याविषयी आणि हजरजबाबीपणाविषयी अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. कालपरत्वे त्यांना चातुर्य आणि हजरजबाबीपणाचे मूर्तिमंत अवतारच मानले जाऊ लागले. अर्थात त्यांच्या संबंधित कथांपैकी सत्यकथा किती आणि दंतकथा किती हे ठरवणे पौराणिक कथांप्रमाणेच कठीण. पण तसा शहानिशा करायची गरज तरी काय म्हणा! आपण त्यातून मिळणारा आनंद लुटायचा. अलिकडील काळात आचार्य अत्रे, पु० ल० देशपांडे या व्यक्तींनासुद्धा तशाच प्रकारे हजरजबाबीपणा आणि शब्दकोट्यांचे अर्क मानले जाऊ लागले आणि मग त्यांच्या अनेक कथांच्या बरोबर आणखी काही कथांची भर घालून काही हौशी (पण दुर्दैवाने समाजमान्यता न लाभलेल्या) लेखकांनी त्यांच्या नावाखाली आपला माल खपवून हौस भागवून घेतली असावी. पण तरीही त्यामुळे आपल्या आनंदात काहीच कमतरता येत नाही. ज्या दंतकथा लोकमान्य होतात त्या खर्‍यांच्या बरोबरीने चिकटून राहतात व असे दंतवाङ्‌मयही वाढत जाते. (आचार्य अत्रे आणि पुल यांच्या निधनानंतरही त्यांच्या वाक्‌चातुर्याच्या किश्शांमध्ये भरच पडत गेली असावी अशी माझी ठाम समजूत आहे. असो.

आपला एक मित्र, रवि पाटणकर (मु० मालाड, मुंबई) याने अत्र्यांचे असेच काही किस्से पाठवले आहेत. हा आपला मालाडचा म्हा…, चुकलो, चिरतरूण मित्र, शेकोटीला गप्पा मारायला बसला की असे निरनिराळ्या प्रसिद्ध व्यक्तींचे बरेच किस्से सांगतो. आपण नुसतं आपलं गदगदणारं पोट धरून हसायचं. हसण्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात. तर पहा ही पाटणकर काढ्याची मात्रा किती लागू पडते ती.

>>>>>>>>>>>>><<<<<<<<<<

“एकटा पुरतो ना?”

एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत.

एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?”

बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”

“व्हय तर!”

“किती कोंबड्या आहेत?”

“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”

“आणि कोंबडे किती?”

“कोंबडा फक्त एकच हाये.”

”एकटा पुरतो ना?”

उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.

>>>>>>>>>>>><<<<<<<<<<

कर्तृत्ववान राष्ट्र-’पती’

भूतपूर्व राष्ट्रपती कै० व्ही० व्ही० गिरी यांना एकूण आठ मुले होती.

त्याच्याबद्दल अत्र्यांच्या ’मराठा’ वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असे.

एकदा अत्र्यांनी श्री० गिरी, सौ. गिरी आणि त्यांच्या आठ मुलांचे एक छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले आणि त्याखाली शीर्षक दिले – गिरी आणि त्यांची ’कामगिरी’.

>>>>>>>>>>><<<<<<<<<

सहचारिणी

अत्र्यांची आर्थिक परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची गाडी बिघडली म्हणून ते पायीच कामासाठी निघाले.

तेवढ्यात रस्त्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला, त्याने ती संधी साधून खवचटपणें विचारले “काय बाबूराव, आज पायीच? गाडी विकली की काय?”

पण अशा प्रसंगी हार मानतील ते अत्रे कसले?

अत्रे म्हणाले, “अरे, आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाहीत बरोबर? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय?”

विरोधक खजिल होऊन निघून गेला.

>>>>>>>>>>><<<<<<<<<<<<<<<

Tags: ,

.

34 thoughts on “आचार्य अत्र्यांचे किस्से

  1. १९६५ सालची गोष्ट असावी. नक्की मला आठवत नाही.सांगली मध्ये अत्रे यांचे भाषण होते गावभागात.मी नुकताच खेड्यातून य़ा शहरात आलो होतो,त्यामुळे अत्र्यांच्या भाषणास जायचेच असं ठरवून च सभेस गेलो होतो.दूर अंतरावर उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होतो.एवढ्यात गर्दीतून “अत्रेसाहेब खिशातला हात काढा” असा आवाज ऐकू आला. अत्र्य़ाना खिशात हात घालून बोलण्याची संवय असावी.पण अत्रे महोदयानी शान्तपणे उत्तर दिले कि “तुमच्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही”गर्दीतून प्रचंड हशा नि टाळ्या पडल्या आणि अत्र्यांचे भाषण शांतपणे तसेच पुढे चालू राहिले.
    सावधान!

    • प्रिय श्री० सावधान,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या माहितीबद्दल (चुरचुरीत चुटका !!) आभार. आम्हीसुद्धा ही गोष्ट ऐकली होती. पण कुठल्याही पुस्तकात ती अधिकृतपणे आढळली नाही. आपण एखादा पुस्तकी संदर्भ देऊ शकाल काय?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० विश्वाकार यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अशा अनेक कथा ऐकल्या आहेत. (ही ऐकली नव्हती.) पण तिचा निदान काहीतरी छापील संदर्भ मिळेल काय? त्याशिवाय ती प्रकाशित करणे प्रशस्त नव्हे. कारण अशा घटनांना साक्षीदार असलेला माणूस भेटणे कठीण व भेटला तरी लोक त्याचे तोंडी वक्तव्य मानणार नाहीत.

      प्रस्तुत लेखात आपण म्हटलेच आहे की:

      अलिकडील काळात आचार्य अत्रे, पु० ल० देशपांडे या व्यक्तींनासुद्धा तशाच प्रकारे हजरजबाबीपणा आणि शब्दकोट्यांचे अर्क मानले जाऊ लागले आणि मग त्यांच्या अनेक कथांच्या बरोबर आणखी काही कथांची भर घालून काही हौशी (पण दुर्दैवाने समाजमान्यता न लाभलेल्या) लेखकांनी त्यांच्या नावाखाली आपला माल खपवून हौस भागवून घेतली असावी. पण तरीही त्यामुळे आपल्या आनंदात काहीच कमतरता येत नाही. ज्या दंतकथा लोकमान्य होतात त्या खर्‍यांच्या बरोबरीने चिकटून राहतात व असे दंतवाङ्‌मयही वाढत जाते. (आचार्य अत्रे आणि पुल यांच्या निधनानंतरही त्यांच्या वाक्‌चातुर्याच्या किश्शांमध्ये भरच पडत गेली असावी अशी माझी ठाम समजूत आहे.

      आभारी आहोत.

      ता०क० बहुधा आम्ही आपले नाव चुकीचे लिहिले असावे. तसे असल्यास क्षमा करावी. पुढील वेळेस (लवकरच) आपले नाव मराठीत लिहून कळवावे. इंग्रजी लेखनाला फारच मर्यादा असतात. आपल्या नावाचा सुंदर संस्कृत शब्द नक्की काय आहे तो जाणण्याचे कुतुहल आहे.
      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० गणेश यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आभारी आहोत. आपणही अशा चुटक्यांची भर घालू शकता.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० संतोष यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहोत. अमृतमंथनावरील पु० ल० देशपांडेंचे किस्सेही वाचावेत.

      मराठीचा अभिमान, मराठीपुढील प्रश्न, त्यांचे विश्लेषण, त्यावर उपाय या विषयीदेखील विविध लेखकांचे लेख आहेत. अवश्य वाचा व आपल्या भावना, आपली मते, आपल्या सूचना याच मंचावर मांडा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० आकाश यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.

      आपण सांगितलेली हा आचार्य अत्र्यांची गोष्ट आपण ऐकली आहे की वाचली आहे? सत्यतेची नक्की खात्री केल्याशिवाय अशा गोष्टी कशा प्रसिद्ध करणार. शिवाय आपल्या स्त्रीवा़चकांच्या भावनाही दुखावल्या जाऊ नयेत, नाही का?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. lahanpani anekda aiklela kissa.. aata purna aathvat nahi..pan tarihi..ekda ratri tyana bhtayala ek jyeshtha vyakti yetat(bahudha virodhakcha.).te bhetun nightat, tevha baher andhar asto.tevha aatre dhavat tyanchyamage kandil gheun yetat.ti vyakti aascharyachakit.(virodhak)tyavar aatre,-“aaho, andharat tumchya chapleshejarchi mazi chappal nyal,mhanun aalo.”

    • प्रिय श्री० कल्पेश कोथळे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार.

      आपण सांगितलेल्या या किश्श्याबद्दल प्रस्तुत लेखामधीलच मजकूर पुन्हा मांडावासा वाततो.

      कालपरत्वे त्यांना चातुर्य आणि हजरजबाबीपणाचे मूर्तिमंत अवतारच मानले जाऊ लागले. अर्थात त्यांच्या संबंधित कथांपैकी सत्यकथा किती आणि दंतकथा किती हे ठरवणे पौराणिक कथांप्रमाणेच कठीण. पण तसा शहानिशा करायची गरज तरी काय म्हणा! आपण त्यातून मिळणारा आनंद लुटायचा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. नमस्कार,
    मला पण एक असाच किस्सा वाचला आहे

    अत्रे एका मंचा वरुन भाषण करीत होते – अचानक एक माणुस ओरडला – “अत्रे तुम्ही कुत्रे” – अत्र्यां नी काय म्हणावे – ते अगदी शांतपणाने म्हणाले – “अणी तुम्ही रस्ता वरचे खांब”.

    रविन्द्र

    • प्रिय श्री० रवीन्द्र काळे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

      आपण सांगितलेला किस्सा इथे प्रकाशित करीत आहोत. प्रस्तुत लेखात उल्लेखिल्याप्रमाणे अत्र्यांसारख्या हजरजबाबासाठी प्रसिद्ध असणार्‍या व्यक्तींच्या नावावर त्यांच्या पश्चात्‌ अनेक दंतकथाही निर्माण होतात. पण त्यांमधूनही मनोरंजन होतेच म्हणा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० राजकुमार यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. अर्थात याचे सर्वच श्रेय आचार्य अत्र्यांचे आम्ही केवळ भारवाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० नागेश वाघोलीकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमतामुळे (feedback) आनंद वाटला. या अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखही चाळून पहावेत. त्यांच्याबद्दलही आपली मते कळवावीत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० नागेश वाघोलीकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आचार्य अत्रेंची बुद्धी, हजरजबाबीपणा, चातुर्य यांना तोड नाही. लोकमान्य टिळकांचे आणि पुलंचेही काही किस्से आपल्या अमृतमंथन अनुदिनीवर (ब्लॉगवर) सादर केलेले आहेत.

      शिवाय मराठी मायबोली, संस्कृती, भारत देश, आपली भारतीय संस्कृती व परंपरा या संदर्भातील अनेक लेख या अनुदिनीवर सापडतील. चाळून पहा आणि वेळ मिळेल तसे अवश्य वाचून पहा. वाचून आपले प्रतिमत (feedback) सुद्धा कळवा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० केदारे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. या अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखांवरही दृष्टी टाकावी. जे आवडतील ते संपूर्ण वाचावेत आणि आपले प्रतिमत (feedback) लेखांखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवावे. वाट पाहतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अनंतराव केदारे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. या अमृतमंथन अनुदिनीवरील इतर लेखांवरही दृष्टी टाकावी. जे आवडतील ते संपूर्ण वाचावेत आणि आपले प्रतिमत (feedback) लेखांखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवावे. वाट पाहतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्रीमती अरुंधती गुंजीकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      केवळ आचार्य अत्रेच का, पण इतर अनेक थोर व्यक्तींच्या बाबतीत शासनाचे वर्तन तसेच आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. एक तर थोरांची थोरवी समजण्यासाठी जी प्रामाणिक बुद्धी, ज्ञान, अभ्यास लागतो, त्याचा व्यक्तिशः राजकारण्यांच्या बाबतीत तुटवडाच असल्यामुळे केवळ सत्तेच्या राजकारणासाठी आवश्यक तेवढेच करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. पण अशाच राजकारण्यांना आज निवडून दिले जाते, हे पाहता त्या बाबतीतील आपली जबाबदारीही आपण टाळू शकत नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. aatryache3 barech kissse ahet ekada 1962 chya nivadukit atre eka prachar sabhet atishay thakun hajar zale ratricha ushira sabha hoti alaya alya tyani sabhet vishay kay ahe yachi vicharana keli .Tyana sanganyat ale ki ‘Congres chya bhanagadi. Sabha udallavun lavanyacha congressw valyani tharvala hote. Sabha sure honyapurvi eka mulga dhavat atre yancha samore yeun ubha rahila tyane tyana vicharale ki tumhi congres chya bbhanagadi vishayi bolanar ahat pan ti tumachi
    Vanmalechi bhanagad kya ahe ho.

    Atre tvarit mhanale Are gadhava jeva mi ti bhanagad keli tevna me congress madhy hoto tya mule ti bhanagad he congress chich bhanagad.

    ase hote atre hajarjababi.

    • प्रिय श्री० दिलीप लाड यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अत्रेंच्या हजरजबाबीपणाबद्दल काय बोलणार ! पण त्यामागे त्यांची कुशाग्र बुद्धी, सखोल अभ्यास व तीक्ष्ण स्मरणशक्ती होती, हे लक्षात घेतले पाहिजे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० ओंकार गोविंद रणवीरकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे खरे आहे. अत्रेंनी केवळ विनोदच नव्हे तर इतर विविध विषयांवर केलेले लिखाण वाचले की त्यांच्या बुद्धिमत्तेचा विशाल आवाका लक्षात येतो आणि मन थक्क होते.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

        • प्रिय कुमारी/श्रीमती प्रणाली यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपल्या पत्राबद्दल आभार.

          आजकाल दर्जेदार मराठी साहित्यनिर्मिती क्वचितच होते. त्या उंचीची माणसेच फारशी राहिलेली नाहीत.

          अमृतमंथनावरील इतर लेखही वाचून पाहावेत.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

Leave a reply to अमृतयात्री उत्तर रद्द करा.