दुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे

आता संगणकापुढे बसल्या-बसल्या आपण मराठीतील अग्रगण्य वर्तमानपत्रे वाचू शकता.

महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील विविध मराठी दैनिक वर्तमानपत्रांच्या संकेतस्थळांचे दुवे खाली दिले आहेत. (अशा प्रकारची चांगल्या मराठी दैनिकांच्या, मासिके व इतर नियतकालिकांच्या संकेतस्थळांच्या पत्त्यांची माहिती अमृतमंथनाला पुरवावी अशी सर्व वाचकांना विनंती करतो.)

 • http://www.navprabha.com/ (दैनिक नवप्रभा, गोवा – “३८ वर्षांची परंपरा असलेले गोव्याचे अग्रगण्य दैनिक”)
 • http://www.tarunbharat.com/ (दैनिक तरूण भारत, बेळगाव – गोवा, कोकण, दक्षिण महाराष्ट्र)
 • http://www.surajyadaily.com/ (दैनिक सुराज्य, सोलापूर – दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक)
 • http://gavakari.in (दैनिक गावकरी – नाशिक-शहर, नाशिक-जिल्हा, धुळे-नंदुरबार, अहमदनगर)

अमृतयात्री गट

(कृपया आपल्या प्रतिक्रिया/सूचना लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा. आभारी आहोत.)

.

11 thoughts on “दुवे: मराठी दैनिक वर्तमानपत्रे

  • प्रिय श्री० अक्षय यांसी.

   सप्रेम नमस्कार.

   आभारी आहोत. इतर लेखांबद्दलही काही सूचना, अभिप्राय असले तर कळवावे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत. मराठी+एकजूट उपक्रमाद्वारा सांस्कृतिक मसुद्याबद्दलच्या सूचनासंकलनाबद्दलचा हा उपक्रम पार पाडला गेला.

   ई-प्रहारबद्दल आम्हाला काही कल्पना नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. नाशकातल्या ‘गावकरी’ वृत्तपत्राचे संकेतस्थळ अतिशय अप्रतिम आहे. ‘ई पेपर’ वाचायची सोय असलेले हे संकेतस्थळ ‘गावकरी’ च्या चार आवृत्या सध्या उपलब्ध करून देते. संकेतस्थळ : http://gavakari.in. धन्यवाद.

  • प्रिय श्री० विवेकराव (नाशिककर?) यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण पुरविलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत. मागे जेव्हा हा शोध घेतला होता तेव्हा बहुधा ’दैनिक गावकरी’चे संकेतस्थळ नव्हते. हल्ली मध्यंतरीच्या काळात ते सुरू झाले असावे. संस्थळ उत्तम आहे. एकाच ठिकाणी चारही ठिकाणच्या आवृत्त्या मिळतात. मुख्य म्हणजे मागील अंकही नीट उघडतात. (अनेक दैनिकांच्या बाबतीत ती एक मोठीच अडचण असते.)

   आता त्यात पुढली पायरी म्हणून त्यांनी आपले संस्थळ युनिकोडाधारित (unicode based) करावे. आता युनिकोड हेच जगभरातील संस्थळांसाठी टंकांचे प्रमाण होत आहे. त्यामुळे कोणालाही संस्थलावरील आशय पाठ्य (text) म्हणून उतरवून घेणे (प्रतिमा – image म्हणून नव्हे), तो संपूर्ण किंवा अंशतः आपल्या संगणकावरील धारिणीत प्रतिकृत (copy) करणे, मित्रांना अग्रेषित करणे, इत्यादी गोष्टी शक्य होतात.

   आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार. माहिती वरील लेखात समाविष्ट केलेली आहे.

   या निमित्ताने सर्वच वाचकांना अशा प्रकारची चांगल्या मराठी दैनिकांबद्दलची, मासिके व इतर नियतकालिकांची माहिती पुरवावी अशी विनंती करतो.

   कळावे, लोभ असावा. अमृतमंथनाशी संपर्कात राहावे.

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० इंद्रजित भिलवडे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या भाष्याबद्दल आभार.

   दैनिक पुढारीची काही वैशिष्ट्ये आहेत हे नक्की. राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाला व विशेषतः त्यांच्या ’जाणत्या राजाला’ इतर सर्वच माध्यमवाले वचकून असतात. पण त्या मानाने ’पुढारी’ त्यांची फारशी तमा न बाळगता वेळोवेळी त्यांचे पितळ उघडे पाडतात.

   एकेकाळी कोल्हापूरच्या या दैनिकाची मराठी भाषा अत्यंत उत्कृष्ट असे. पण हल्ली त्यांचे पत्रकारही इतरांच्या नादी लागून गचाळ आणि हिंदी-इंग्रजी प्रचूर अशी अशुद्ध भाषा लिहू लागले आहेत. आज त्यांचे ’बॉलीभाय’चे सदर वाचवत नाही. असो.

   हल्ली वर्तमानपत्रांनी समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे दिवस गेले. ’खप वाढवण्यासाठी काहीही…’ असेच त्यांचे धोरण असते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. 􀁻􀁤􀁥􀁯􀁦􀀠􀁁􀁭􀂧􀁖􀁡􀁡􀁭􀃮􀁑􀂴􀀾􀁲􀂶􀀠􀁻􀁤􀁚􀁭􀁥􀁷􀃫􀁈􀀤􀀠􀁉􀁷􀁢􀁲
  􂀘􀁡􀁭􀁒􀀾􀁲􀀠􀁻􀁘􀁤􀁭􀁩􀁲􀀠􀁁􀂧􀁈􀀤􀀠􀃱􀁮􀁙􀁭􀂩􀀠􀀲􀀰􀀱􀀱
  􀃠􀁻􀁖􀁻􀁚􀁙􀁲􀀬􀀠􀁻􀁘􀀮
  􀁻􀁘􀁤􀁭􀁩􀁲􀀠􀁁􀂧􀁈􀀤􀁭􀁍􀁲􀀠􀁮􀁡􀂧􀁮􀁡􀁭􀀠􀁁􀁉􀂧􀁓􀀾􀀠􀁡􀁨􀁭􀁤􀁲􀀠􀁤􀀠􀃋􀂶􀁭􀁖􀁹􀁚􀀠􀁘􀁏􀁽􀁘􀁭􀁡􀀠􀁧􀁭􀁻􀁨􀃋􀂶􀁭􀁍􀁲􀀠􀁻􀁚􀁻􂀘􀂩􀁖􀁲􀀠􀃬􀁨􀁭􀁤􀁲􀀬􀀠􀂶􀁭􀀠􀁃􀃔􀁯􀁥􀁭􀁚􀁯􀀠􀁏􀂶􀁱􀁧􀁊􀁮􀁹􀁡􀀠
  …………………
  ………………….
  …………………..
  􂀘􀁭􀀮􀀠􀁧􀂧􀁮􀁭􀁘􀁈􀀤􀁧􀁭􀁯􀁭
  􀁈􀂥􀀤􀁮􀂶􀁭􀀠􀁤􀁡􀁲􀁢􀀠􀁤􀂥􀃎􀁭􀀠􀁁􀁭􀁮􀃫􀂶􀁭􀀠􀁢􀁭􀁯􀁈􀀤􀁻􀃠􀂶􀀠􀁘􀂡􀁻􀁚􀁈􀀤􀁭􀁖􀀠􀃠􀁻􀁧􀃜􀁘􀀠􀁈􀀤􀃩􀁚􀀠􀁧􀁨􀁈􀀤􀁭􀂶􀂩􀀠􀁈􀀤􀁡􀁭􀁤􀁯􀀮

  • प्रिय डॉ० सुनील दादा पाटील यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभार.

   आपण बरेच प्रदीर्घ पत्र लिहिलेले आहे. परंतु ते वाचता येत नसल्यामुळे त्याचा लहानसा अंशच प्रसिद्ध केलेला आहे.

   आपण पत्र लिहिताना वापरलेला टंक (font) हा युनिकोडानुकूल नसावा. त्यामुळे तो वाचता येत नाही आहे.

   युनिकोड प्रणालीचावापर करून संगणकामध्ये लिहिण्यासाठी खालील लेख वाचून पाहावेत.

   संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल –} http://wp.me/pzBjo-2d
   संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती –} http://wp.me/pzBjo-Aw

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s