संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल

१. प्रास्ताविक:
आपला आधी संगणकाशी संबंध आला नसेल तर सुरुवातीस त्याचा वापर करण्यास आपल्याला थोडी भीतीच वाटते. पण काही कारणाने संगणकाचा वापर करायला शिकावंच लागलं तर मात्र मग आपण आपल्यालाच हसतो, “हात्तिच्या! ही एवढी सोपी गोष्ट होती आणि मी विनाकारण त्याला घाबरत होतो/होते.” आणि एकदा संगणकावर काम करण्याची सवय झाली, महाजालावर स्वैर हिंडण्याचा आणि विरोपाद्वारे (ई-मेल) पटापट मित्रमैत्रिणींशी पत्रव्यवहार करण्याचा छंद (व्यसन?) लागला की मग त्याचे फायदे कळतात आणि मग या आधुनिक मेघदूताची वेळोवेळी भेट न घडल्यास चुकल्याचुकल्यासारखे वाटते.
संगणकाने आज सामाजिक आणि व्यक्तिगत अशा सर्वच क्षेत्रात शिरकाव केला आहे. त्यामुळे वेळोवेळी अद्यतन माहिती मिळवणे, मित्र-बांधवांशी संपर्कात राहणे इत्यादी अनेक कारणांसाठी आपल्याला संगणकाच्या वापराचे म्हणजेच संगणकावरून शोधणे, वाचणे आणि लिहिणे इत्यादी कृतींचे प्राथमिक तरी ज्ञान हवेच.  तशी जबरदस्ती नसली तरीही ते स्वतःहून शिकणे हे नक्कीच सोईस्कर. एकदा का संगणकावर काम सुरू केले की मग त्यावर मातृभाषेतील व्यवहारही शिकून ग्यावेत. आपल्या देशातील आणि परदेशातील मित्र आणि नातेवाईकांशी पत्रव्यवहार करताना, शासकीय कार्यालये, सहनिवास (सोसायटी), महापालिका, वीजमंडळ, इत्यादींना पत्रे लिहिताना मायबोलीचा वापर करणे कधीही श्रेयस्कर ठरते. मातृभाषेत लिहिण्याची मजा काही औरच असते. कार्यालयीन कामासाठी परगावी/परदेशी भटकत असताना दिवसरात्र कितीही बाहेरील खाणं हाणलं तरी घरी आल्यावर साध जेवणंही स्वर्गीय वाटतं. तीच गोष्ट मातृभाषेची. शिवाय वैयक्तिक, तरल, सूक्ष्म भावना मातृभाषेत जितक्या सहजपणे आणि चपखलपणे व्यक्त करू शकतो तेवढ्या इतर कुठल्याही भाषेत करणे शक्य होत नाही. त्यामुळे एकदा मनाचा हिय्या करूया आणि संगणकावर मराठीत लिहिणे सुरू करूया. त्यात कठीण काहीच नाही.
आज युनिकोड हे जागतिक पातळीवरील प्रमाणित टंक उपलब्ध असल्याने युनिकोडचा वापर करून संगणकावर केलेले टंकलेखन (टायपिंग) हे विंडोज, लिनक्स सारख्या संगणक कार्यकारी प्रणाली (computer oerating systems) तसेच मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्स्प्लोरर, गूगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स इत्यादी ब्राऊझर्स (?), हॉटमेल, गूगल, याहू इत्यादी विरोप सेवा प्रदाते (email service providers) आणि गूगल, याहू, यासारखी शोधयंत्रे (search engines) ह्या सर्वांच्या सॉफ्टवेयरची यंत्रणा ही युनिकोड पद्धतीच्या टंकांना अनुकूलच असते. आणु दिवसेंदिवस युनिकोडचा प्रसार अधिकाधिक वाढतच जाणार आहे. भारतातही केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषांमधील सर्व शासकीय संकेतस्थळे आणि इतर सॉफ्टवेयर प्रणाली ह्या युनिकोडानुकूलच असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणही संगणकावर मराठीमध्ये लिहिण्यासाठी युनिकोडानुकूल अशा पद्धतींचाच विचार करूया.
२. मराठी टंकलेखनाच्या पद्धती:
मराठीत लिहिण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पद्धतींपैकी आपण दोन प्रकारच्या पद्धतींची खाली चर्चा केली आहे. त्या दोन पद्धती खालीलप्रमाणे:
क) इनस्क्रिप्ट कळपाट (keyboard) वापरून: ज्याप्रकारे मराठीमध्ये आपण हाती लेखन करतो त्याचप्रमाणे अक्षरे आणि त्यांच्या काना-मात्रा-वेलांट्या-रफार इत्यादी लिहित जाणे. ह्या पद्धतीत इनस्क्रिप्ट कळपाटाची माहिती करून त्यावर थोडा सराव करावा लागतो. काही तासांच्या वापरानंतर कळपाटावरील कळांच्या जागा लक्षात राहतात आणि सरावाने वेग वाढतो.
ख) ’बराहा’ सारख्या ध्वन्याधारित (ध्वनीवर आधारित – phonetic) टंकलेखन पद्धतीचा अवलंब करून: ही पद्धत विशेषतः मायक्रोसॉफ्ट विंडोज ह्या प्रणालीसाठी उपयुक्त आहे. ह्यात मराठी शब्दांचे कानाला ऐकू येते त्याप्रमाणे प्रत्येक अक्षराचे सरळसोपे इंग्रजी स्पेलिंग लिहित जाणे. ह्या पद्धतीत नेहमीच्या इंग्रजी कळपाटाचाच उपयोग होत असल्याकारणाने नवीन कळपाटपद्धतीच्या सरावाची आवश्यकता नसते. थोडी जुजबी माहिती करून घेऊन लगेच लिहिणे सुरू करता येते. पण आपल्याला लिहिण्याचे बरेच काम करावे लागणार असेल तर इनस्क्रिप्ट पद्धत शिकून घ्यावी.
ह्या दोन पद्धतींसाठी निरनिराळ्या पद्धतीची सॉफ्टवेयरे उपलब्ध आहेत. इन्स्क्रिप्ट पद्धत ही कधीही आदर्श आणि योग्य. त्या प्रकारात मराठीतील टंकन हे इंग्रजी कळपाटावर अवलंबून नसते. म्हणून शक्यतो सुरुवातीसच ही पद्धत शिकून घेणे कधीही उत्तम. मराठी टंकलेखनाचा तोच राजमार्ग आहे. पण ज्यांना मराठीत फार लेखन करण्याची आवश्यकता असणार नाही असे वाटते त्यांनी केवळ एक तात्पुरती आडवाट (शॉर्टकट) म्हणून बराहा किंवा तत्सम दुसर्या ध्वन्याधारित  सॉफ्टवेअरचा वापर करून लिहिणे सुरू करावे.
कुठलीही पद्धत वापरली तरी चालेल परंतु लवकरात लवकर मातृभाषेत लिहिणे सुरू करणे हे महत्वाचे.
३. इन्स्क्रिप्ट कळपाट पद्धत:
वर लिहिल्याप्रमाणे ह्या पद्धतीत कागदावर ज्याप्रमाणे मराठीमधून आपण अक्षरामागून अक्षरे लिहित जातो त्याच प्रमाणे कळफलकावरील कळा दाबून लिहित जायचे.  मराठी वर्णमालेतील सर्व मूळाक्षरे (अ ते अः पर्यंतचे स्वर आणि क ते ज्ञ पर्यंतची व्यंजने) तसेच त्यांना लावायचे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, अर्धचंद्र इत्यादी सर्वांसाठी ठराविक कळा निश्चित केल्या आहेत. त्या कळांचा उपयोग करून मराठी लिखाणासारखेच टंकलेखन करायचे. उदा० भारत हा शब्द इन्स्क्रिप्ट पद्धतीने भ + !आ!कार + र + त अशा क्रमाने लिहावा लागेल.
अधिक माहितीसाठी खालील दुव्यावरील पीडीएफ धारिणी पहा.
या शिवाय आवश्यकता भासलीच तर, या विषयी सरावासाठी एक शिकवणी खालील दुव्यावरही मिळू शकेल.
ह्या संकेतस्थळावर नोंदणी करून इन्स्क्रिप्टच्या कळपाटाची शिकवणीची धारिणी उतरवून घेऊन वापरावी.
४. बराहासारखी ध्वन्याधारित टंकलेखनपद्धत (केवळ मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी) पद्धत:
आधी लिहिल्याप्रमाणे जो शब्द लिहायचा त्याचे सरळसोट इंग्रजी स्पेलिंग जसे होईल त्याप्रमाणे नेहमीचा इंग्रजी कळपाट वापरून शब्द लिहित जायचे.  उदा० भारत हा शब्द bh + aa + ra + ta असा लिहावा लागेल. aa च्या ऐवजी A हे इंग्रजी अक्षर वापरता येते. म्हणजे भारत हा शब्द bhArata असाही लिहिता येतो.
अधिक माहिती साठी खालील दुव्यावरील पीडीएफ धारिणी पहा.

१. प्रास्ताविक: 

आपला आधी संगणकाशी संबंध आला नसेल तर सुरुवातीस त्याचा वापर करण्यास आपल्याला थोडी भीतीच वाटते. पण काही कारणाने संगणकाचा वापर करायला शिकावंच लागलं तर मात्र मग आपण स्वतःलाच हसतो, “हात्तिच्या! ही एवढी सोपी गोष्ट होती आणि मी विनाकारण त्याला घाबरत होतो/होते.” आणि एकदा संगणकावर काम करण्याची सवय झाली, महाजालावर स्वैर हिंडण्याचा आणि विरोपाद्वारे (ई-मेल) पटापट मित्रमैत्रिणी आणि इतर संबंधितांशी पत्रव्यवहार करण्याचा छंद (व्यसन?) लागला की मग त्याचे फायदे कळतात आणि मग या आधुनिक मेघदूताची वेळोवेळी भेट न घडल्यास चुकल्याचुकल्यासारखे वाटते. म्हणूनच अशा आधुनिक मेघदूताशी आपण लवकरात लवकर संधान बांधायला हवे.

संगणकावर मराठीत बरेच लेखन करू इच्छिणार्‍यांसाठी इनस्क्रिप्ट पद्धत आणि थोडके लेखन करण्याच्या उद्देशाने झटपट मराठीत लेखन शिकू इच्छिणार्‍यांसाठी बराहा पद्धत, अशा दोन्हीही पद्धतींबद्दल माहिती इथे दिली आहे. प्रथम बराहा पद्धत शिकून घेऊन कालांतराने मराठी लेखन वाढल्यावर आपण इनस्क्रिप्ट पद्धतीचा विचार करू शकता.

संगणकाने आज सामाजिक आणि व्यक्तिगत अशा सर्वच क्षेत्रात शिरकाव केला आहे. त्यामुळे वेळोवेळी अद्यतन माहिती मिळवणे, मित्र-बांधवांशी संपर्कात राहणे इत्यादी अनेक कारणांसाठी आपल्याला संगणकाच्या वापराचे म्हणजेच संगणकावरून शोधणे, वाचणे आणि लिहिणे इत्यादी कृतींचे प्राथमिक तरी ज्ञान हवेच.  तशी जबरदस्ती नसली तरीही ते स्वतःहून शिकणे हे नक्कीच सोईस्कर. एकदा का संगणकावर काम सुरू केले की मग त्यावर मातृभाषेतील व्यवहारही शिकून घ्यावेत. आपल्या देशातील आणि परदेशातील मित्र आणि नातेवाईकांशी पत्रव्यवहार करताना, शासकीय कार्यालये, सहनिवास (सोसायटी), महापालिका, वीजमंडळ, इत्यादींना पत्रे लिहिताना मायबोलीचा वापर करणे कधीही श्रेयस्कर ठरते. मातृभाषेत लिहिण्याची मजा काही औरच असते. कार्यालयीन कामासाठी परगावी/परदेशी भटकत असताना दिवसरात्र कितीही बाहेरील खाणं हाणलं तरी घरी आल्यावर साध जेवणंही स्वर्गीय वाटतं. तीच गोष्ट मातृभाषेची. शिवाय वैयक्तिक, तरल, सूक्ष्म भावना मातृभाषेत जितक्या सहजपणे आणि चपखलपणे व्यक्त करू शकतो तेवढ्या इतर कुठल्याही भाषेत करणे शक्य होत नाही.

शिवाय महाजाल (internet) म्हणजे ज्ञानाचा महासागरच आहे. त्यातील मोती वेचावे म्हटले तरी त्यासाठी आवश्यक त्या साधनांचा प्राथमिक उपयोग तरी माहित पाहिजे. मध्ययुगीन काळातील इतिहास व मराठी संतवाङ्‌मय, अर्वाचीन काळातील साहित्य, संगीत, गीते, बातम्या, भाषणे, सामान्य ज्ञान इत्यादी अनेक मराठी माणसाच्या जिवाभावाच्या विषयांवरील ज्ञान मोठ्या प्रमाणात महाजालावर उपलब्ध आहे. पण ते मिळवण्यासाठी मराठी लेखनाची प्राथमिक माहिती तरी असायला पाहिजे. त्यामुळे एकदा मनाचा हिय्या करूया आणि संगणकावर मराठीत लिहिणे सुरू करूया. त्यात कठीण काहीच नाही.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे….

आज युनिकोड पद्धतीशी अनुकूल असणारे टंक जागतिक पातळीवर प्रमाणित मानले जात असल्याने युनिकोडाचा वापर करून संगणकावर केलेले टंकलेखन (टायपिंग) हे विविध operating systems (कार्यकारी प्रणाली), browsers (न्याहाळक), email service providers (विरोप सेवा प्रदाते) आणि search engines (शोध यंत्रे) यांच्याबरोबर निर्वेधपणे चालू शकते. भारतातही केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषांमधील सर्व शासकीय संकेतस्थळे आणि इतर सॉफ्टवेयर प्रणाली ह्या युनिकोडानुकूलच असणे आवश्यक आहे. शिवाय दिवसेंदिवस युनिकोडचा प्रसार अधिकाधिक वाढतच जाणार आहे. त्यामुळे आपणही संगणकावर मराठीमध्ये लिहिण्यासाठी युनिकोडानुकूल अशा पद्धतींचाच विचार करूया.

२. मराठी टंकलेखनाच्या पद्धती:

मराठीत लिहिण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पद्धतींपैकी आपण दोन प्रकारच्या पद्धतींची खाली चर्चा केली आहे. त्या दोन पद्धती खालीलप्रमाणे:

क) इनस्क्रिप्ट (Inscript) कळपाट (keyboard) वापरून: ज्याप्रकारे मराठीमध्ये आपण हाती लेखन करतो त्याचप्रमाणे अक्षरे आणि त्यांच्या काना-मात्रा-वेलांट्या-रफार इत्यादी लिहित जाणे. ह्या पद्धतीत इनस्क्रिप्ट कळपाटाची माहिती करून त्यावर थोडा सराव करावा लागतो. काही तासांच्या वापरानंतर कळपाटावरील कळांच्या जागा लक्षात राहतात आणि सरावाने वेग वाढतो.

ख) ’बराहा’ (Baraha) सारख्या टंकलेखन पद्धतीचा अवलंब करून: ही पद्धत विशेषतः मायक्रोसॉफ्ट विंडोज ह्या प्रणालीसाठी उपयुक्त आहे. ही पद्धत ध्वन्याधारित (ध्वनीवर आधारित – phonetic) असून ह्यात मराठी शब्द टंकित करताना ते जसे कानाला ऐकू येतात त्याप्रमाणे त्यातील प्रत्येक अक्षराचे सरळसोपे इंग्रजी स्पेलिंग लिहित जायचे असते.  यासाठी नेहमीच्या इंग्रजी कळपाटाचाच उपयोग होत असल्याकारणाने नवीन कळपाटपद्धतीच्या सरावाची आवश्यकता नसते. थोडी जुजबी माहिती करून घेऊन लगेच लिहिणे सुरू करता येते. पण आपल्याला लिहिण्याचे बरेच काम करावे लागणार असेल तर इनस्क्रिप्ट पद्धत शिकून घ्यावी.

ह्या दोन पद्धतींसाठी निरनिराळ्या पद्धतीची सॉफ्टवेयरे उपलब्ध आहेत. इनस्क्रिप्ट पद्धत ही कधीही आदर्श आणि योग्य. त्या प्रकारात मराठीतील टंकन हे इंग्रजी कळपाटावर अवलंबून नसते. म्हणून शक्यतो सुरुवातीसच ही पद्धत शिकून घेणे कधीही उत्तम. मराठी टंकलेखनाचा तोच राजमार्ग आहे. पण ज्यांना मराठीत फार लेखन करण्याची आवश्यकता असणार नाही असे वाटते त्यांनी केवळ एक तात्पुरती आडवाट (शॉर्टकट) म्हणून बराहा किंवा तत्सम दुसर्‍या ध्वन्याधारित सॉफ्टवेयरचा वापर करून लिहिणे सुरू करावे.

कुठलीही पद्धत वापरली तरी चालेल परंतु लवकरात लवकर मातृभाषेत लिहिणे सुरू करणे हे महत्वाचे.

३. इनस्क्रिप्ट कळपाट पद्धत:

वर लिहिल्याप्रमाणे ह्या पद्धतीत कागदावर ज्याप्रमाणे मराठीमधून आपण अक्षरामागून अक्षरे लिहित जातो त्याच प्रमाणे कळफलकावरील कळा दाबून लिहित जायचे.  मराठी वर्णमालेतील सर्व मूळाक्षरे (अ ते अः पर्यंतचे स्वर आणि क ते ज्ञ पर्यंतची व्यंजने) तसेच त्यांना लावायचे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, रफार, अर्धचंद्र इत्यादी सर्वांसाठी ठराविक कळा निश्चित केलेल्या आहेत. त्या कळांचा उपयोग करून मराठी लिखाणासारखेच टंकलेखन करायचे. उदा० भारत हा शब्द इन्स्क्रिप्ट पद्धतीने भ + ’आ’कार + र + त अशा क्रमाने लिहावा लागेल.

इनस्क्रिप्टबद्दल अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासकीय विभागाने उपलब्ध करून दिलेली धारिणी खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन-संगणकावर मराठीत लेखन-इनस्क्रिप्टच्या मदतीने_260709

या शिवाय आवश्यकता भासलीच तर, या विषयी सरावासाठी शिकवणी (tutorial) सी-डॅकच्या खालील दुव्यावरही मिळू शकेल.

http://www.cdac.in/html/gist/down/key.asp (केंद्रशासनाच्या सी-डॅक या संस्थेच्या संस्थळाचा दुवा)

ह्या संकेतस्थळावर नोंदणी करून इनस्क्रिप्टच्या कळपाटाची शिकवणीची धारिणी उतरवून (download करून) घेऊन वापरावी.

४. बराहासारखी ध्वन्याधारित टंकलेखनपद्धत पद्धत:

ही पद्धत केवळ मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रणालीसाठीच सध्या उपलब्ध आहे याची कृपया नोंद ग्यावी. आधी लिहिल्याप्रमाणे जो शब्द लिहायचा त्याचे सरळसोट इंग्रजी स्पेलिंग जसे होईल त्याप्रमाणे नेहमीचा इंग्रजी कळपाट वापरून शब्द लिहित जायचे.  उदा० भारत हा शब्द bh + aa + ra + ta असा लिहावा लागेल. aa च्या ऐवजी A हे इंग्रजी अक्षर वापरता येते. म्हणजे भारत हा शब्द bh + A + ra + ta असाही लिहिता येतो.

बराहाच्या वापराबद्दल अधिक माहितीसाठी खालील दुव्यावर धारिणी उपलब्ध आहे, ती पहावी.

अमृतमंथन-संगणकावर मराठीत लेखन- बराहाच्या मदतीने_260709

लवकरात लवकर मातृभाषेत लिहिण्याचा आनंद लुटायला सुरुवात करा. शुभस्य शीघ्रम्‌.

आपल्याला काही शंका/अडचणी असल्यास त्याबद्दल खालील पत्त्यावर विरोप (email) लिहा. शिवाय वरील लेखात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपल्या  काही सूचना असल्यास त्यासुद्धा अवश्य लिहाव्या. सहकार्याबद्दल आभार.

– अमृतयात्री

(कृपया आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर पाठवा. आभारी आहे.)

33 thoughts on “संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल

    • आमचे एक मित्र श्री० विजय पाध्ये यांनी खालील उत्तर लिहिले आहे.

      – अमृतयात्री
      ———————
      प्रिय श्री० गर्गे,

      तुमची पृच्छा माझ्याकडे अमृतमंथनवरून पाठवली आहे, त्याचा माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

      मीदेखील तुमच्यासारखाच सहा-एक वर्षांपूर्वीपर्यंत श्रीलिपी हेच सॉफ्टवेअर व मोड्यूलरने विकसित करून श्रीलिपीसोबत पुरवलेला त्यांचाच कळफलक वापरून काम करीत असे. एक अशी नामी देवदत्त संधी आली की मी तो कळफलक विसरून गेलो (जाणं भागच पडलं) अन केवळ तीनच दिवसांच्या सातत्य राखून केलेल्या सरावानं इन्स्क्रिप्ट (इंडियन स्क्रिप्ट) कळफलक शिकून घेतला व संगणकावरच मुक्त वापरासाठी उपलब्ध असलेला मंगल हा टंक वापरून काम करू लागलो. ही देवदत्त संधी असं वर म्हटलं आहे त्याचं कारण मी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं भाषांतराचं काम तो यूनिकोडमधला मंगल टंक वापरून करण्यास सुरुवात केली. ह्या इनस्क्रिप्ट कळफलकात काही दोष जरूर आहेत, परंतु तो वापरण्यास सुलभ आहे व आता सर्वांनी त्याच कळफलकाचा वापर करावा, नव्हे तो करावा लागेल अशी अनिवार्यता निर्माण होत आहे.

      ध्वन्याधारित (फोनेटिक) कळफलक वापरून यूनिकोड-मंगल टंक वापरता येत नाही. (श्रीलिपीसोबत देण्यात आलेला ध्वन्याधारित कळफलक म्हणजे ENG हाच ना?)

      यूनिकोडमधल्या टंकनासाठी जर तुम्हाला ENGसारखा ध्वन्याधारित कळफलक वापरावासा वाटत असल्यास तुम्ही बराहा प्रणाली वापरावी अशी मी सूचना करू इच्छितो. त्या प्रणालीविषयी मी अनभिज्ञ असल्याने त्याबाबत श्री० सलील कुळकर्णी किंवा अमृतयात्री गटातील इतर कोणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील.

      विजय पाध्ये

    • प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे,

      स० न० मराठी अभ्यास केंद्राचे श्री० सुशांत देवळेकर यांनी आपल्याला पाठवलेला निरोप खालीलप्रमाणे:
      ——–
      श्रीनिवास हे कोणती कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) वापरतात? ते एक्सपी वगैरे वापरत असतील तर त्यांनी http://www.bhashaindia.com ह्या संकेतस्थळावरून मराठी आयएमई हे साधन उतरवून घ्यावे. त्यात ६ प्रकारचे आराखडे वापरता येतात. त्यात त्यांच्या सोयीचा आराखडा असेल तर त्यांना तो वापरता येईल, आणखी काही माहिती मिळाल्यास कळवतो.
      ———-
      सदर पत्राचे उत्तर आपण थेट श्री० सुशांत यांना त्यांच्या {सुशान्त देवळेकर(Sushant Devlekar) [sushant.devlekar@gmail.com]} या विरोपपत्त्यावर देऊ शकता.
      आभारी आहोत.

      – अमृतयात्री

  1. नमस्कार तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो,
    जर कोणाला मराठी लेखन करायचे असेल तर आपले ई- पत्र खाते gmail ह्या संकेत स्थळावर उघडा त्यात compose mail मधून तुम्ही लेखन करून ते पाठवू शकता. हे अतिशय सोपे आहे.
    फक्त तुम्हाला text मध्ये ‘अ’ ला क्लिक करायचे आहे आणि जर तरीही जर मराठी लिपी येत नसेल तर बाजूला असलेला निम्न बाण (down arrow) क्लिक करा व मराठी भाषा निवडा.
    आपला,
    राजेश सु पालशेतकर.

    • प्रिय श्री० राजेश पालशेतकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण वाचकांना दिलेल्या माहितीबद्दल आभार. गुगलने हे प्रचंडच काम करून ठेवले आहे.

      ———-

      प्रिय वाचकांनो,

      भाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे. शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर मराठीतून लिहिणे फारच सोपे आहे. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.

      मी केवळ एकच मुद्दा सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की गूगल मेलवरील असे लिहिणे हे लिप्यंतर (transliteration) आहे. थेट मराठीमधून टंकलेखन (टायपिंग) करणे नव्हे. उदा० ’पूर्वा’ असे लिहिण्यासाठी ’purva’ असे टंकन केल्यावर ’पूर्व’ असा शब्द उमटतो. मग दोन जागा मागे गेल्यावर आपल्याला जी पर्यायांची यादी मिळते त्यातून ’पूर्वा’ हा शब्द निवडून घ्यावा लागतो. अर्थात त्यांनी जवळजवळ संपूर्ण मराठी शब्दकोशच नव्हे तर नेहमीची नावे-आडनावे सुद्धा त्यांच्या शब्दसंग्रहात साठवून ठेवलेली असावीत. त्यामुळे सहसा आपल्याला हवा असलेला शब्द मिळण्याची शक्यता खूपच जास्त असते. अर्थात याचा उपयोग जी-मेल पुरताच मर्यादित आहे. पण पत्रे वगैरे आपण इथे लिहून इतरत्र डकवू शकतो.

      मराठीत थेट लिहिण्यासाठी (वर्डपॅड, एक्सेल, जी-मेल, याहू मेल, हॉटमेल व इतर कुठल्याही पानावर वा फॉर्मवर) बराहा उपयोगी पडते. त्याची माहिती अमृतमंथन अनुदिनीवरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ या वरील लेखात दिलेली आहे. तीसुद्धा वाचून पहा. अनेकांनी या माहितीच्या सहाय्याने मराठी लेखन सुरू केले आहे.

      कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्‌I  

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. सर्वप्रथम मी अमृतयात्री गट व श्री सुशांत देवळेकर यांचे आभार मानतो की त्यांनी मला मराठी युन‍िकोड टंकलेखनाकरीता नवीन कळपाटांची माह‍िती करून ‍िदली. त्याबरोबरच अश्या एका संकेतस्थळाची http://www.bhashaindia.com माहीती करून ‍िदली जेथे भारतीय भाषां‍व‍िषयी अनेक कामे अगोदरच करून ठेवलेली आहेत. याच संकेतस्थळावरून मायक्रोसॉफ्टचे कळपाट न‍िर्माण करण्यासाठी तयार केलेल्या कार्यप्रणाली साधना मधून मी मला लागणारा कळपाट बनव‍िलेला आहे. श्रील‍िपी चा मॉड्युलर हा कळपाट मी सलग ७ ‍िदवस अभ्यास करून बनव‍िला आहे. कोणास या कळपाटाची आवश्यकता असल्यास sggarge@gmail.com या पत्यावर संपर्क साधावा. या कळपाटाची फक्त 513 KB ची Setup फाईल तयार केली आहे.

    धन्यवाद !

    क॰लो॰आ॰
    श्रीन‍िवास गर्गे, नाश‍िक

    • श्री० श्रीनिवास गर्गे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत. इतर सर्व वाचकांच्या माहितीसाठी व सहाय्यासाठी आपले पत्र प्रसिद्ध केले आहे. संगणकावर मराठीतून लिहिणे या विषयांत रस असणार्‍यांनी अवश्य वाचावे.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० विजय सावंत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या भावना योग्यच आहेत. तसाच निश्चय प्रत्येकाने केला तर मराठीला पुन्हा तिचे गतवैभव व तिच्या अधिकाराचे उच्च स्थान मिळवून देणे अशक्य नाहीच.

      याच मुद्द्याविषयी आशा निर्माण करणारा ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा याच अनुदिनीवरील लेख अवश्य वाचावा.

      भाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि लिहिणे करायला पाहिजे.

      शाळेत प्रथम लिहायला शिकताना जेवढा त्रास होतो त्यामानाने संगणकावर बराहाच्या मदतीने मराठी-देवनागरीतून लिहिणे फारच सोपे आहे. याच अनुदिनीवरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ ह्या लेखातील माहितीच्या सहाय्याने अनेकांनी मराठी लेखन सुरू केले आहे. आपणही प्रयत्न करावा. तीसुद्धा मराठीची सेवाच ठरेल.

      कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास अवश्य कळवा. शुभस्य शीघ्रम्‌I  

      आपल्या पत्राबद्दल आभार.

      क०लो०अ०

      अमृतयात्री गट

  3. Dear Salil Kulkarni/Amrutyatri Gat/sggarge/Mr Sushant Devalekar and others,
    ***It is a pleasure that Google has adapted Devnagari script[for Hindi and Marathi ].

    It appears that inscript would get more popularity.

    In the meanwhile Mr Madhukar Narayan Gogate is [strongly advocating Roman script ]
    …………..
    ……………
    In transition phase every body tries to put forth his own views. Shri lipi, inscript are in use.
    But inscipt has better prospects.

    • प्रिय डॉ० नीळकंठ पटवर्धन यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल आभारी आहोत.

      गुगलच्या जी-मेलवर आता मराठी लिप्यंतर करून लिहिले जाण्याची उत्तम सोय केली आहे. आपण संगणकावर अधिकाधिक मराठीतून लिहित गेलो तर मराठीसाठी अधिकाधिक सुविधा मिळतील. आपण रोमी (इंग्रजी) लिपीतच लिहित गेलो तर मात्र मराठीकडे जग दुर्लक्षच करेल.

      अनेक पाश्चात्य भाषातज्ज्ञांच्या दृष्टीने संस्कृतभाषाही व्याकरण व इतर अनेक दृष्टींनी जगात सर्वोत्तम समजली जाते. संस्कृतोद्भव भाषासुद्धा ध्वन्याधारित लेखन, उच्चार व इतर बाबतीत चागल्याच आहेत. इंग्रजी भाषेतील व्याकरण, स्पेलिंगे (शुद्धलेखन), उच्चार याबद्दलचे नियम (खरं म्हणजे नियमांचा अभाव) ह्यासाठी इंग्रजी भाषा (कु)प्रसिद्धच आहे. आणि हे स्वतः इंग्रजही नाकारीत नाहीत. असो.

      वीस-बावीस वर्षांपूर्वी गोगटे महाशयांनी ’मराठीचा बेडूक फुगेल तरी किती’ असा लेख लिहिला होता. अशा या थोर व्यक्तीचे नोबेल पारितोषकयोग्य संशोधन समजून घेण्यास आमच्यासारख्या अल्पबुद्धी सामान्यांची लायकी नाही. तसेच त्यांच्या अशा या स्वभाषाविरोधी निष्कर्षांना पाठिंबा देण्यासाठी या व्यासपीठाची योग्यता नाही. क्षमस्व.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. m.n gogate he roman lipcha agarah dharatat te yogya nahich. mala te kadhich patale nahi.sangankavaril marathi lipyantaramadhye yenarya adachani/marathi kalaphalak yavishayicha mi tadnya nahi pan ek matra nehami mala wate ki jar roman/chini/aani ittar anek bhashemadhye lihita yeu shakate tar MARATHIT ka shakya hou naye.
    Atta tyavishayi barich mahiti upalabdha hot aahe.vividh thiakani jase googalwar/esakalwar agadi sahajpane marathi lihita yete.
    mi pushkalada esakalwar marathi lihun dusarikade te chikatavanyacha udyog karato, pan te sanket sthal ughadale naahi tar mag prashna yeto.ashyaweli baraha upayogi padate.
    pd kulkarni

    • प्रिय श्री० पुरुषोत्तम यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      देवनागरी (किंवा कुठल्याही भारतीय) लिपीपेक्षा इंगजी (रोमी) लिपी ही बेशिस्त, स्वैर, नियमबद्धतेपेक्षा अपवादांवर अवलंबून व म्हणूनच विचित्र, लक्षात ठेवण्यास कठीण आहे हे स्वतः इंग्रज व इतर पाश्चात्य भाषातज्ञही मान्य करतात. पण तरीही लिपीच का पण भाषा, रीतिरिवाज, तत्त्वज्ञान, जीवनशैली अशा अनेक बाबतीत इंग्रजांहून अधिक इंग्रज (म्हणजे स्वातंत्र्यानंतरही मानसिक गुलामगिरीत आनंद व प्रतिष्ठा मानणारे लोक) खूपच सापडतील. त्यांच्याशी कुठल्या निकषांच्या आधारावर वाद घालणार? तेव्हा त्या वादात न पडलेले बरे. असो.

      युनिकोड ही संकेत प्रणाली आता सर्वच इंग्रजेतर लिपींसाठी प्रमाण मानली जाते. त्यांत लिहिणे कठीण नाहीच. आपल्याला नक्की कुठे अडचण येते हे समजल्यास काही तोडगा शोधून काढता येईल.

      आभारी आहोत.

      – अमृतयात्री गट

  5. युनिकोडमुळे मराठी टंकलेखन करणे कुणालाही शक्य आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्विस पॅक २ मध्ये ही सोय उपलब्ध आहे. फक्त ती सक्रिय करावी लागते आणि डीओइचा म्हणजे इन्स्रकिप्टचा की बोर्ड वापरावा लागतो. परंतु या सोयीमुळे जर कुणाचीही व्यावसािक गरज नसेल तर कोणतेही विशेष मराठी सॉफ्टवेअर न वापरता मराठी टंकलेखन करता येते. मी गेली ५-६ वर्षे या लिपीचा वायर करून इंग्लीश मराठी अनुवादक म्हणून सेवा पुरवीत आहे.

    • प्रिय श्री० अनिल करंबेळकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      लोक प्रथम मराठीत लिहिण्यास बिचकतात. पण आपण त्यांना सतत प्रोत्साहन देत राहिले पाहिजे. जन्मात प्रथम गाडी शिकताना, पहिली मुलाखत देताना, प्रथम प्रेमात पडल्यावर वगैरे नेहमीच भीती वाटते. सरावाने आपण त्या सर्व गोष्टी आत्मविश्वासाने व सहज करू लागतो. (प्रेमाबद्दल थट्टा केली. तो मुद्दा फार गंभीरपणे घेऊ नये.) तसेच हे आहे. एकदा पाण्यात उडी मारून हातपाय मारने सुरू करावे. पोहणे सरावाने जमतेच.

      प्रस्तुत लेखात आपल्याला काही सूचना असल्या किंवा त्यात काही भर घालाणे आवश्यक आहे असे वाटले तर अवश्य कळवा.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० आशिष यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार. लेखात खाली दिलेल्या सर्व उदाहरणांचा स्वतः एकदा सराव केल्यास फारशी अडचण येऊ नये. तरीही कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास निःसंकोचपणे कळवावे. आम्हाला शक्य नसल्यास या विषयातील तज्ज्ञाकडून सहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न करू.

      पुढच्या वेळी उत्तर नक्की मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. म्हणजेच लेखामागचा मूळ उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. संगणकावर देवनागरी टंकण्यासाठी बराह युनिकोड २ वापरतो.जालावर विनामूल्य उपलब्ध आहे.त्यातील बराह आय् एम् ई च्या सहाय्याने ईमेलवर तसेच शुभेच्छापत्रावर थेट मराठी लिहिता येते. फ़ाईल करण्याची तसेच कॉपी पेस्ट करण्याची आवश्यकता नाही.टंकलेखन उच्चारानुवर्ती असल्याने सोपे आहे. बराहासंबंधी एक ईपत्रक केले आहे. कुणाला हवे असल्यास ईमेल ने कळवावे. आनंदाने पाठवीन…
    ….य.ना.वालावलकर. ynwala@gmail.com

    • प्रिय श्री० य० ना० वालावलकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अमृतमंथनावर बराहा वापरून मराठीमध्ये टंकलेखन करण्यासाठी मार्गदर्शन करणारा जो वरील लेख लिहिला आहे तो लिहिताना आपल्या पत्रिकेचे बरेच सहाय्य झाले होते. लेखात काही चुका आढळल्यास नक्की सांगाव्यात. आपल्यासारख्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय अंजनी खेर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सुनिश्चयाबद्दल अभिनंदन. आपण यूनिकोडमध्ये लिहिणे सुरू केल्यावर आपली यूनिकोडमधील थाप आपल्या रोमीतील थापेपेक्षा अधिक रोमांचकारी वाटेल. अंजनीताईंच्या निश्चयाचा हनुमान कधी उड्डाण करतो याची वाट पाहतो.

      इनस्क्रिप्ट समजण्यास फार वेळ लागू नये. तिच्या सरावास ३-४ दिवस लागतील. लहानपणी प्रथमच लिहिणे शिकलो त्यापेक्षा तर हे नक्कीच कठीण ठरू नये, नाही का?

      अमृतमंथनावरील इतर लेखही अवश्य वाचावे व आपले प्रतिमत (feedback) कळवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. namaskar sir! sarva pratham mi aapale aabhar manato. karan mala enskript method baddal kahich mahit navhate ya site la bhet dilyamule mala he sarva kalale. aata tabadtob mi he software download karnar aahe.aani marathi lihanyacha jastit jast prayatna karnar aahe.marathitun lihun marathicha maan vadhavanar aahe.
    ms.office madhye baraha aani Enskript method vaparata yeil ka?
    marathit lihanyasathi aanakhi sope paryay aasatil tar krupaya sangavet. dhanyavad!

    • प्रिय श्री० हरीभाऊ गावित यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      MS Office मध्ये इन्स्क्रिप्ट व बराहा ह्या दोन्ही पद्धतींनी लिहिता येते. खरं तर इन्स्क्रिप्ट पद्धत अधिक योग्य आहे. कुठली अधिक सोपी हे सवयीवरच मुख्यतः अवलंबून आहे. काहींना इनस्क्रिप्ट तर काहींना बराहा किंवा इतर एखादी ध्वन्याधारित (phonetic) पद्धत अधिक योग्य वाटते.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  8. My experience :[1] Inscript may be good for those who do a lot of writing regularly and those who are proficient in English typing. For others phonetic is easier. [2] Baraha is a fairly good software but it is not free. Only trial-version is free. [3] The phonetic soft ware on maayboli portal is the best but it is not available off-line.
    Prabhakar [Bapu] Karandikar

    • माननीय श्री० (बापू) प्रभाकर करंदीकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल आभार. आपल्या पहिल्या दोन्ही निरीक्षणांशी आम्ही संमत आहोत. परंतु तिसर्‍या निरीक्षणाबद्दल आम्हाला पुरेशी माहिती किंवा अनुभव नाही.

      आपल्या या मुद्द्यांचा नव्यानेच संगणकावर मराठीतून लिहिण्यास शिकू इच्छिणा‍र्‍या आपल्या वाचकांस मार्गदर्शनात्मक सूचना म्हणून उपयोग व्हावा.

      आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  9. नमस्कार सर ,
    तुमची ही मराठी ची असणारी वेबसाईट मला खुप उपयोगी पडत आहे.त्या बद्दल मी तुमची अभारी आहे .

    मला मराठी पत्र लेखनाचे नमुने हेवेत .ते मला तुमच्याकडे मिळतील का असल्यास मी तुमचा अभारी राहीन .

    धन्यवाद सर
    सचिन इंगळॆ

    • प्रिय श्री० भगवत मोरे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.

      पत्रलेखनाचे नमुने या अनुदिनीवर मिळणार नाहीत. पण मराठी भाषेच्या व्याकरणाच्या पुस्तकांत, किंवा निबंध व पत्रलेखनासाठी मार्गदर्शन करण्यास लिहिलेल्या पुस्तकांत ते निश्चितच सापडतील.

      अमृतमंथनावर मराठी भाषा व संस्कृतीच्या संबंधाने इतर अनेक लेख आहेत. जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा सहज फेरफटका मारावा, लेखांवर दृष्टी टाकावी. स्वारस्य वाटतील ते लेख संपूर्ण वाचावेत, त्याखाली आपली मते नोंदवावीत. आवडलेले लेख मित्रमंडळींना अग्रेषित करावेत. अमृतमंथन परिवाराच्या संस्कृतीत बसणार्‍या अधिकाधिक लोकांना जवळ आणणे, त्यांची एकजूट घडवणे हा आपल्या चळवळीचा एक उद्देश आहेच.

      मराठीच्या उत्कर्षासाठी आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहून यथाशक्ती, यथाशक्य प्रयत्न करीत राहू.

      क०लो०अ०

      ता०क० अमृतमंथनावरील नवीन लेखांबद्दल नियमितपणे माहिती मिळवण्यासाठी आपण मुखपृष्ठावरील Follow या सुविधेचा उपयोग करू शकता. 

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० मच्छिंद्र नायगड यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या आपुलकीच्या उद्गारांबद्दल अत्यंत आभारी आहोत.

      “मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…” या विषयावरील लेख, चर्चा व विचारमंथनासाठी आपल्या “अमृतमंथन” या अनुदिनीवरील लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
      https://amrutmanthan.wordpress.com/

      आपले घोषवाक्य आहे – ‘मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…’

      मराठी संस्कृती व तिच्याच अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात. मराठी माणसाचा ’स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा’ हा गैरसमज दूर करून त्याचा न्यूनगंड नाहीसा करण्याचा हा प्रयत्न आहे.

      आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम, स्वाभिमान या भावनांचा सतत प्रसार करीत राहिले पाहिजे.

      अमृतमंथनावर असे इतर अनेक लेख आहेत. जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा सहज फेरफटका मारावा, लेखांवर दृष्टी टाकावी. स्वारस्य वाटतील ते लेख संपूर्ण वाचावेत, त्याखाली आपली मते नोंदवावीत. आवडलेले लेख मित्रमंडळींना अग्रेषित करावेत. अमृतमंथन परिवाराच्या संस्कृतीत बसणार्या अधिकाधिक लोकांना जवळ आणणे, त्यांची एकजूट घडवणे हा आपल्या चळवळीचा एक उद्देश आहेच.

      मराठीच्या उत्कर्षासाठी आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहून यथाशक्ती, यथाशक्य प्रयत्न करीत राहू.

      क०लो०अ०

      ता०क० अमृतमंथनावरील नवीन लेखांबद्दल नियमितपणे माहिती मिळवण्यासाठी आपण मुखपृष्ठावरील Follow या सुविधेचा उपयोग करू शकता. 

      – अमृतयात्री गट

    • श्री० भालचंद्र जैन यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आजच्या मराठी नववर्षदिनाच्या निमित्ताने आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबीयांसाठी शुभेच्छा.

      आपल्या पत्राबद्दल आभार. अनुदिनीवरील इतर लेखांवरही नजर घालावी. आवडलेले संपूर्ण वाचावेत आणि मित्रांनाही अग्रेषित करावेत. आपली मतेही लेखाखाली मांडावीत. सर्व मराठी माणसांठीच ही अनुदिनी आहे.

      क०लो०अ०

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s