सप्रेम नमस्कार, विनंती विशेष

प्रिय मराठी बांधवानो,
’अमृतमंथन’ या अनुदिनीवर आपले स्वागत आहे.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, यांची संपन्न परंपरा यांची चर्चा; तसेच मराठी माणूस, त्याची स्वभाववैशिष्ट्ये, आवडी-निवडी, त्याचे कर्तृत्व-अकर्तृत्व, यशापयश, आज त्याच्यापुढे उभ्या असलेल्या समस्यांचा गुंता आणि त्या गुंत्याची उकल शोधून काढण्याच्या दृष्टीने विविध मराठी बांधवांच्या मदतीने उहापोह आणि चर्चा करणे या उद्देशाला ’अमृतमंथन’ ही अनुदिनी वाहिलेली आहे.
मराठी लेख, कविता, विनोद व इतर मराठी माणसाच्या आवडीच्या विषयांवरही गप्पा मारू. मराठी माणसाच्या दृष्टीने महत्वाच्या वाटणार्‍या बातम्या आणि माहिती ह्यासुद्धा एकमेकांना सांगू.
आपणा सर्व मराठी मंडळींचे हे जिव्हाळ्याचे विषय. ह्या अनुदिनीवरील लेखनाबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. शिवाय मराठीसंबंधित कुठल्याही विषयावर लेखन करून आपणही यात सहभागी होऊ शकता. अर्थात भाषा आणि संस्कृती यांच्याविषयी चर्चा करताना कुठल्याही प्रकारे धर्म, जात, अशाप्रकारच्या व्यक्तिगत श्रद्धेच्या आणि रीतिरिवाजांच्या बाबतीत कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत ह्याची आवर्जून काळजी घेऊया.
कृपया आपल्या प्रतिक्रिया, लेख इत्यादी amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा.
– अमृतयात्री (amrutyatri@gmail.com)

प्रिय मराठी बंधुभगिनींनो,

अमृतमंथन या अनुदिनीवर आपले स्वागत आहे.

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, यांची संपन्न परंपरा यांची चर्चा; तसेच मराठी माणूस, त्याची स्वभाववैशिष्ट्ये, आवडीनिवडी, त्याचे कर्तृत्वअकर्तृत्व, यशापयश, आज त्याच्यापुढे उभ्या असलेल्या समस्यांचा गुंता आणि त्या गुंत्याची उकल शोधून काढण्याच्या दृष्टीने विविध मराठी बांधवांच्या मदतीने उहापोह आणि चर्चा करणे या उद्देशाला अमृतमंथन ही अनुदिनी वाहिलेली आहे.

सध्याच्या गोंधळाच्या परिस्थितीत जिथून-जिथून जे-जे काही मराठीच्या दृष्टीने चांगले सापडेल ते-ते आपल्यासमोर सादर करावे असा विचार आहे. म्हणूनच तर या उपक्रमाला ’अमृतमंथन’ हे नाव दिले आहे.

शिवाय मराठी लेख, कविता, विनोद इतर मराठी माणसाच्या आवडीच्या विषयांवरही गप्पा मारू. मराठी माणसाच्या दृष्टीने महत्वाच्या वाटणार्‍या बातम्या आणि माहिती ह्यासुद्धा एकमेकांना सांगू. कधी आपल्या मराठमोळ्या दृष्टीची क्षितिजे अधिक फैलावून ती जागतिकच नव्हे तर विश्वात्मक पातळीवर जाऊन विचार करू.

आपणा सर्व मराठी मंडळींचे हे जिव्हाळ्याचे विषय. ह्या अनुदिनीवरील लेखनाबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा त्यात आणखी काय करता येईल याबद्दल आपले विचार कळवा. शिवाय मराठीसंबंधित कुठल्याही विषयावर लेखन करून आपणही यात सहभागी होऊ शकता. अर्थात भाषा आणि संस्कृती यांच्याविषयी चर्चा करताना कुठल्याही प्रकारे धर्म, जात, अशाप्रकारच्या व्यक्तिगत श्रद्धेच्या आणि रीतिरिवाजांच्या बाबतीत कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत ह्याची आवर्जून काळजी घेऊया.

कृपया आपले अभिप्राय, लेख इत्यादी amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा.

आपल्याला या अमृतमंथनात सहभागी होऊन नियमितपणे या अनुदिनीवर लेखन करायचे असेल तर आपण सहभागी सदस्य (contributing member) सुद्धा होऊ शकता.

अमृतयात्री

(कृपया आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा. आभारी आहोत.)

ता०क० या अनुदिनीवरील लेखनामध्ये व्यक्त झालेली मते ही संबंधित लेखकांची. त्यांच्याबद्दल इतर कोणीही व्यक्ती जबाबदार नाही.


2 thoughts on “सप्रेम नमस्कार, विनंती विशेष

  1. नमस्कार! तुमचे लेख मी नेहमी वाचतो. मराठी भाषा व संस्कृतीसाठी तुम्ही तुमच्या परीने मोठे काम करीत आहत. तुमच्या काही लेखांची मी माझ्या फेसबुक खात्यावर लिन्कही दिली होती. ती लिन्क इतर मराठी वाचकांनी नंतर त्याच्या पोस्टवरही अपडेट केली. जेणेकरून जनजागृती व्हावी. हळूहळू ती होतही आहे. इंटरनेटमुळे मराठीचा प्रसार होण्यास खूप मदत होत आहे असे एकंदर चित्र दिसत आहे.
    आपले काम असेच नेटाने सुरु ठेवा. काही आवश्यकता भासल्यास आवाज द्या.
    धन्यवाद.

    • प्रिय श्री० झंप्याभाऊ,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.

      आपल्याप्रमाणे आम्ही सर्वच झपाटलेले आहोत, मातृभाषेच्या प्रेमाने, अभिमानाने, “हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी, जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे, हिला बैसवू वैभवाच्या शिरी” अशा इर्षेने.

      आपल्या अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहोत. आपण सर्वच आपल्या या झपाट्याचा, धुंदीचा, कैफाचा प्रसार करूया. अधिकाधिक मराठी माणसांना याची लागण व्हावी. तसे झाले तरच आपण आपले ईप्सित साध्य करू शकू.

      आपल्या मदतीच्या देकाराबद्दल आभार. आपण कोणीही इतर कोणीतरी बोलावण्याची, हाक मारण्याची, आमंत्रण देण्याची (हिंदीमध्ये आवाज देण्याची?) वाट पाहू नये. केवळ ’मराठी’ या एकच तत्त्वावर एकत्र येऊन आपण एकजूट साधू. जिथे शक्य तिथे एकत्रितपणे, जिथे शक्य नाही तिथे व्यक्तिशः मायबोलीच्या हिताची कृती करीत राहू, इतरांना तसे करण्यास आवाहन करू, उत्तेजन देऊ.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s