काही वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकमधील एका मराठी विद्यार्थिनीला ‘कुसुमाग्रज कोण होते?’ असं शिक्षकांनी विचारलं तेव्हा तिला उत्तर देता आलं नाही, त्यामुळे ते शिक्षक अतिशय खंतावले. ही गोष्ट पुण्याच्या संजीवनी बोकील या संवेदनशील कवयित्रीच्या कानी आली तेव्हा त्यांच्या मनात ठिणगी पडली आणि एक बीज पेरलं गेलं. कालांतरानं ते रुजलं आणि आता त्यातून एक सुंदर रोपटं जन्माला आलं असून, दिवसेंदिवस ते तरारून दमदारपणे वाढत आहे…….
‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे।’ या उक्तीनुसार मुलांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे सरसावणारे नामवंत कलाकार हा या उपक्रमाचा तिसरा स्तंभ होय. डॉ. गिरीश ओक, वंदना गुप्ते, जितेंद्र जोशी, श्रीरंग गोडबोले, अनिल इंगळे, राजेश देशमुख, किरण पुरंदरे, शांभवी वझे, अनुराधा मराठे.. नावं तरी किती घ्यावीत? अक्षरश: न संपणारी नामावळी!…..
या स्थानिक उपक्रमाची सर्वदूर प्रसिद्धी करण्यामागील मुख्य हेतू हा की, त्यापासून महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या मराठीप्रेमी व्यक्तींना प्रेरणा मिळावी.. ज्योत से ज्योत जलाते चलो। लवकरच सोलापूर येथे अशा प्रकारचा उपक्रम सुरू होणार असून, सांगली येथेही तशीच हालचाल सुरू झालेली आहे. उपक्रमशील व्यक्तींनी आपापल्या भागांत जर अशी चळवळ सुरू केली तर मराठीचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होईल.
अंधार फार झाला, पणती जपून ठेवा!
लोकसत्ता, चतुरंग पुरवणी (१८ जुलै २००९) मधील सत्वशीला सामंतांचा लेख खालील दुव्यावर पहा.