कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली शाळाही सुरू झाली. आजही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ चालू आहे.
.
स्वातंत्र्यपूर्व मुंबई (बॉम्बे) इलाख्यात सिंध प्रांतातील कराचीचा समावेश होता. तेव्हा कराची शहरामध्ये व्यापार-उदीमानिमित्त अनेक मराठी माणसे स्थायिक झाली होती. पाकिस्तानात स्थायिक असलेल्या मराठी मंडळींनी मराठी संस्कृतीचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव हे मात्र अजूनही अत्यंत हौसेने व निष्ठेने जपलेले दिसते.
अमृतमंथन परिवारातील श्री० विजय पाध्ये यांनी सर्व अमृतयात्रींसाठी पाठवलेली ही दैनिक लोकसत्तेच्या २० फेब्रुवारी २०१०च्या अंकातील अत्यंत सुरस बातमी. नक्की वाचा.
’आमची’ कराची
उमेश करंदीकर
मुंबईत एका पक्षाच्या धाकानं एका दुकानमालकानं आपल्या दुकानाच्या नावातील ‘कराची’ हे नाव काढून टाकलं. पण आज जसं आपण तारस्वरात ‘आमची मुंबई’ म्हणतो तीच भावना कराचीबाबतही अनेकांची होती. फाळणीआधी कराचीत २५ हजार मराठी लोक रहात होते. बांधकाम, शिक्षण, वैद्यकीय अशा क्षेत्रांत ते होते. कराचीत मराठी चित्रपट झळकत होते. सिंधी, पंजाबी, गुजराथी, मराठी लोकसंस्कृतीचा प्रभाव कराचीवर होता. फाळणीआघी कराची मुंबई प्रांतातच प्रशासकीयदृष्टय़ा जोडलेले होते. कोकण आणि पुण्यातून अनेक कुटुंबे कराचीत स्थलांतरित झाली होती. लक्ष्मुंबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रे’मध्येही कराचीतील वास्तव्याचे खुमासदार वर्णन आहे.
कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती आणि सिंधच्या शैक्षणिक विकासासाठी मुंबईच्या नारायण जगन्नाथ या शिक्षकाला तिथे खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याच नावे सिंधमधील पहिली शाळाही सुरू झाली. आजही कराचीत ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुटीत कराचीच्या बंदरावरून बोट पकडून मुंबईचे बंदर गाठायचे आणि मग कोकणात आपल्या गावी जायचे, हा अनेक मराठी कुटुंबांचा तेव्हाचा रिवाजच होता. कराचीचे विद्यार्थीही मुंबईच्या विल्सन कॉलेजात बोटीने येत असत. फाळणीनंतर मराठीजन आपली घरे मागे टाकून भारतात आले. त्यातील कित्येकांनी दिल्लीतही आसरा घेतला. फार तुरळक मराठी लोक कराचीतच राहिले. सध्या कराचीच्या लोकसंख्येत १२.८१ टक्के ‘अन्यभाषिक’ गटात मराठी लोकही आहेत. तेथील महादेव मंदिरात दरवर्षी दीड दिवसाचा गणेशोत्सवही मराठी पद्धतीने साजरा होतो. कराचीतल्या विविध देवळांत पुजारी म्हणून गेली चार दशके धार्मिक विधी करणारे मोहन गायकवाड हे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा करतात. ‘द डेली टाइम्स’ या पाकिस्तानी वृत्तपत्राला गायकवाड यांनी सांगितले की, कराचीतल्या या उत्सवासाठी पाकिस्तानातल्या अन्य भागांतील मराठी लोकही आवर्जून येतात. मंडप उभारला जातो, मोदक केले जातात, लोक गाणी गातात, आरत्या म्हणतात, नाचतात. या पूजेच्या निमित्ताने आपल्या लोकांना भेटता येते आणि खूप आनंद वाटतो, असे अनेकांनी सांगितले. दीड दिवसाच्या गणपतीचे मग अरबी समुद्रात यथाविधी विसर्जनही केले जाते. आज कराचीतील मराठी लोकांनी अतिशय प्रतिकूल सांस्कृतिक परिस्थितीतही आपली मराठी भाषा वा संस्कृती टिकविण्याची धडपड सुरू ठेवली आहे.
कराचीतील मराठीभाषकांत आणखी एक वर्ग आहे तो बेनेइस्त्रायलींचा. कराचीतील ६३० बेनेइस्त्रायली कुटुंबे अन्य भागांत विखुरली. झियांच्या कारकिर्दीतील हिंसक विरोधानंतर त्यातील कित्येकांनी आपली धार्मिक ओळख लपविली आहे. कित्येक पार्शी असल्याचेही भासवत आहेत. मात्र घरात ते उर्दू व मराठीत बोलतात. माणूस आपला नांदता गाव मागे टाकतो तेव्हा त्याच्या उरात एक जखम भळभळत असते. त्या गावाची याद जागवत मग कुठे ‘कराची सोसायटी’ उभी राहते तर कुडाळसारख्या गावात ‘कराची महाराष्ट्रीयन शिक्षण प्रसारक मंडळ’ बहरते. दुरावलेल्या गावाचं नाव जपलं जातं ते भावविश्वाचा निखळलेला दुवा जपण्याची वेडी धडपड म्हणून. फाळणीनंतर भारतात परतलेल्या कराचीकरांच्या मनात आजही अस्फुट साद आहे ‘आमची कराची..’
—————–
परिशिष्ट-१:
आपले एक वाचकमित्र श्री० नितीन सावंत यांनी परिश्रमपूर्वक शोध घेऊन गूगल मॅप्सच्या ’नारायण जगन्नाथ हायस्कूल, कराची, पाकिस्तान’ हे ठिकाण दाखवणार्या नकाश्याचा खालील दुवा पाठवल्याबद्दल आम्ही सर्व अमृतमंथन परिवाराच्या वतीने श्री० नितीन सावंतांचे आभार मानतो. आता प्रस्तुत नकाशा उघडून पाहून तशी शाळा खरोखरीच कराचीमध्ये असल्याची आपण खात्री करून घेऊ शकतो, मनोमन तिला भेट देऊ शकतो. त्यामुळे मराठी मनाला आनंद व अभिमान लाभेल.
Narayan Jagannath High School
From Wikipedia, the free encyclopedia
परिशिष्ट-२:
Pakistani Marathis celebrate Ganesh Pooja
स्वातंत्र्यपूर्व मुंबई (बॉम्बे) इलाख्यात सिंध प्रांतातील कराचीचा समावेश होता. तेव्हा कराची शहरामध्ये व्यापार-उदीमानिमित्त अनेक मराठी माणसे स्थायिक झाली होती. आजमितीला त्यापैकी फारच कमी (सुमारे २५०००) राहिली आहेत. पण पाकिस्तानात स्थायिक असलेल्या मराठी मंडळींनी मराठी संस्कृतीचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव हे मात्र अजूनही अत्यंत हौसेने व निष्ठेने जपलेले दिसते.
पाकिस्तानच्या ’paklinks.com’ या संकेतस्थळाच्या ’गपशप’ या सदरामधून.
I knew there was a large Marathi speaking population in Karachi as it was a part of the Bombay presidency. After partition many Marathi speakers, mainly Hindus, migrated to India. Though Marathi Muslims migrated to Pakistan, new generation has switched to Urdu. I dint knew that there still were quite a few Marathis in Pakistan.
संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
.
अशाच प्रकारचा पाकिस्तानातील लाहोर शहरासंबंधातील एक लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाहोरी शोधकथा (ले० अंजली कीर्तने, लोकसत्ता)
.
Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक, ०४.२ थोडक्यात पण महत्त्वाचे वृत्त, कराची, गणेशोत्सव, नारायण जगन्नाथ हायस्कूल, पाकिस्तान, बेने इस्रायली, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मुंबई, सिंध प्रांत, Bene Israelis, Ganesh pooja, Karachi, Marathi, Narayan Jagannath High School, Pakistan, Sindh
Sorry for giving my comments in English as I do not know how to use the Marathi font on this.
It is indeed heartening that there is a large Marathi population still living in and around Karachi, Pakistan. Can we not get in touch with some of them and exchange views on Marathi literature, both old and new?
Yeshwant Karnik.
प्रिय श्री० यशवंत कर्णिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपली सूचना उत्तम आहे. आपण जर कराचीमधील मराठी मंडळींशी संपर्क प्रस्थापित करू शकलो, मराठी भाषा व संस्कृतीबद्दल विचारांची देवाणघेवाण करू शकलो, त्यांना कुठल्याही प्रकारे मदत पाहिजे असेल (पुस्तके, माहिती इत्यादी) तर ती देऊ शकलो तर फारच चांगले होईल. पण हे सर्व कसे साधायचे? त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा? त्यांचा पत्ता (शक्यतो ईमेलचा पत्ता) कसा मिळवायचा व त्यानंतर काय करायचे?
आपल्याला याबद्दल काय वाटते? नक्की कळवा. अमृतमंथन परिवारातील सर्वच मराठी मंडळींना ह्यात रस वाटेल. सर्वच वाचकांना आपण अशा उपक्रमाच्या विविध पैलूंबाबत सूचना करण्याचे आवाहन करूया.
क०लो०अ०
अमृतयात्री गट
I think we have many people in ULLAHAS Nagar,who visit,or have visitors from Karachi,
Our envoy in Maldives,Mr. Mule,who is also writer and known for networking Marathi,could help us by requesting INDIA HOUSE in that country,to providing the details,and legal path to contact them,
as we need to be very careful in this regards,love for Marathi should not land Marathi lovers in problem,
Mr.Karnik,no harm but nation first should be approch.
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपली सूचना चांगली आहे. आपण श्री० मुळे ह्यांना ओळखता का? त्यांना अमृतमंथनाच्या वाचकांचे मनोगत कळवाल काय?
वाट पाहतो. अत्यंत आभारी आहोत.
आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व मित्रबांधवांना ही दिवाळी व येते वर्ष सुखाचे, आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी अमृतमंथन परिवाराच्या वतीने शुभेच्छा.
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
Yes soon I shall write to him.
May be he could do things,
Regards.
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण घेत असलेल्या पुढाकाराबद्दल आभार. ह्यातून आपण कराचीमधील मराठी मंडळींशी संपर्क साधू शकलो, वेळोवेळी दळणवळण राखले, एकमेकाला यथाशक्य साहाय्य केले तर ती एक अत्यंत उत्तम गोष्ट होईल.
आपल्या पुढील प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
NJV शाळेबद्दल माझ्या ब्लॉग वर फोटो आहे.
प्रिय डॉ० रूपाली मोकाशी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अनुदिनीवरील नारायण जगन्नाथ हायस्कूलबद्दलचा लेख पाहिला. उत्तम आहे. आमच्या ज्ञानातही भर पडली. सर्वच वाचकांनी तो पहावा अशी आग्रहाची विनंती करतो.
आपल्या अमृतमंथन परिवाराचे काही सदस्य म्हणत आहेत त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य आहे का?
आपल्या अनुदिनीवरील इतर लेखही आवडले. त्यांना खास चमचमीत कायस्थी स्पर्श आहे. सोड्याचे कालवण जेवल्यावर (अर्थातच हाताने) साबण न लावता, फारसे न चोळता हात धुवायचे व नंतर कित्येक तास हाताचा सुगंध घेत कालवणाची रम्य आठवण काढीत पलंगावर ताणून द्यायचे, आयुष्यात यासारखी दुसरी चैन नाही, नाही का? (स्वानुभवावरून सांगतो.)
असो. महत्त्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
Reply from diplomatic end was sad,no matter,I have asked my SINDHI FRIENDS to check things through their friends,some other options like letter to media over there,request to shipping company havin regular operations there,is also ready to check the things through their importers.
but will take some time.
Regards.
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण उत्स्फूर्तपणे करत असलेल्या चिवट प्रयत्नांबद्दल कौतुक वाटते. काही मार्ग निघाला तर ती एक मोठीच व महत्त्वाची गोष्ट ठरेल.
सर्व अमृतमंथन परिवाराच्या वतीने “आपल्या प्रयत्नांना ईश्वर यश देवो” अशी प्रामाणिक शुभेच्छा व्यक्त करतो.
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
This year GANESHOTSAV was conducted at CLIFFTON SHIVA MANDIR,
Mr gaikwaar is Pujari,
only thing is it’s only for the day,
then ARBEE SAMUDRAAT VISARJAN,
IT’S TIME, MR. RAMDASI OF MAHARASHTRA SNEH SANWARDHINI,
& BRIHAN MAHARASHTRA MANDAL TAKES SOME STEPS THROUGH MEA,
to help us establish contacts with them officially,
finally that’s the goal for them,
even C.M. Maharashtra must do the needful,
as contacts with that country are very tricky.
Will get back to you soon
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
ही त्रोटक असली तरीही महत्त्वाची माहिती आहे. पाकिस्तानातील गणेशोत्सवाबद्दल अधिक माहिती, छायाचित्रे मिळू शकतील का?
कराचीमधील मराठी माणसांचे एखादे मंडळ आहे का? त्यांचे संकेतस्थळ आहे का? तसे असल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधणे सोपे जावे. काहीतरी मार्ग शोधून काढला पाहिजे.
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
What I came to know from some people in Gujrath,is HINDU’S have terror time,and Marathi’s do not mix up with others,but there are even ladies working as Managers in good firms,I am expecting further details through,INTACH U.K.
but Maharashtra government must take lead and matter must surface at SAHITYA SAMMELAN.
प्रिय श्री० मायबोलीध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण विविध मार्गाने करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल कौतुक वाटते.
महाराष्ट्र राज्यशासनाकडून असले काहीही बिनफायद्याचे काम घडणे कठीण वाटते. पण शक्य असेल तर पहा.
साहित्य संमेलनात हा मुद्दा चर्चेला आणण्याचा विचारही चांगला आहे. ते कसे करायचे?
पाकिस्तानच्या भारतातील राजदूताच्या कार्यालयामधून काही माहिती मिळवणे शक्य आहे का?
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
You people in Maharashtra must take up the matter with UTTAM KAMBLE,PADMASHREE U.M.PATHAN could be contacted for cause,as he may have some contacts in that country.
At the same time i have seen one ad. by Marathi bride,in case if you have any known person having shaadi.com a/c,
you can request them to check further details.
Indian Embassy is worst,but you can try with FRO(SUPDT.OF POLICE)of your place as they will have this info,for that RTI may be needed,but SAHITYA SAMMELAN IS THE FIRST FIELD TO BLOW bhongaa.
Today I have sent msg. to Rotary & Lions international,to forward request to RI,LI DG’s in that country,
let’s see what is the outcome.
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पुढील पत्राची वाट पाहतो. आपण सर्वांनीच एकमेकांना शुभेच्छा देऊया.
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
There are 1200 Marathi speaking jews are confirmed by one web site run by jew lady.
reply is still awaited.
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण सातत्याने करीत असलेल्या पाठपुराव्याबद्दल कौतुकादर वाटतो.
हे १२०० मराठीभाषिक ज्यू म्हणजे महाराष्ट्रातील मूळचे बेणे इस्रायली का? ही संख्या केवळ कराचीमधील आहे की संपूर्ण पाकिस्तानातील?
क०लो०अ०
- अमृतयात्री गट
[...] [...]
Total number in that country,
and even some people from sindhudurg,who couldn’t return are in K, they have started some cultural progs,prior to 47..
Now I am trying to dig those roots.
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण हे एक नवीन व्रतच हाती घेतलेले दिसते आहे. आपल्या प्रकल्पासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.
अमृतमंथनावरील लाहोरविषयीचा खालील लेख वाचला का?
हिंदुस्थानी संगीताची आणि संस्कृतीची लाहोरी शोधकथा –} http://wp.me/pzBjo-zF
क०लो०अ०
- अमृतयात्री गट